Home » केस गळती रोखण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या घरगुती टिप्स

केस गळती रोखण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या घरगुती टिप्स

0 comment
Home Remedies for Hair Fall
Share

हल्ली केस गळण्याची समस्या अनेकांना भेडसावत आहे. त्याची कारणे कोणतीही असू शकतात जसे, आजकालची जीवनशैली, जेनेटिक, प्रदूषण, केमिकल, तणाव अशी असंख्य कारणे केस गळतीच्या मागे असू शकतात. आधी काही समस्या या केवळ वृद्ध झाल्यावर किंवा थोडे अधिक वय झाल्यावर होतात अस म्हटलं जायच आणि त्यात  केस गळण्याच्या समस्येचा ही समावेश होता. पण आता तस राहिलेल नाही अगदी शाळेत जाणाऱ्या मुलींपासून ते अगदी तिशीतल्या आतील मुलींना केस गळण्याची समस्या अधिक भेडसावत आहे. आणि ही समस्या केवळ महिलांपूर्तीच मर्यादित राहिलेली नसून अनेक पुरुषांना सुद्धा या समस्येचा सामना करावा लागत आहे.(Home Remedies for Hair Fall)


पण समस्या आहे म्हणून लगेच डॉक्टरकडे जाऊन औषध घेणे हाच यावर उपाय नसू शकतो बरोबर ना? अगदी घरच्या घरी तुम्ही सोप्या टिप्स वापरून तुमची ही समस्या कायमची दूर करू शकता. हो, तुम्हाला तुमच्या वेळेनुसार शक्य होतील अशा काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहोत ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.तेव्हा है लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Home Remedies for Hair Fall
Home Remedies for Hair Fall

चला तर पाहूया केस गळतीच्या समस्येवर सोपे घरगुती उपाय 

थोडे नारळाचे तेल घ्या त्यामध्ये त्याच्या अर्ध्या मापने आवल्याचे तेल घ्या आणि त्यात एक चमचा लिंबू रस घाला हे चांगले मिक्स करा आणि केसांच्या मुळाशी लावा. हे तेल किमान २० ते ३० मिनिटे केसांवर तसेच राहुदया आणि त्यानंतर पाण्याने धुवून टाका. यामुळे तुमच्या केस गळतीच्या समस्ये बरोबर जर तुम्हाला कोंडा असेल तर तो ही नाहीसा होण्यास मदत होईल. हे तेल तुमच्या केसांना आवश्यकत पोषण देण्यास मदत करेल. 


– मेथीचे काही दाणे घ्या आणि ते नारळाच्या तेलात थोडे गरम करा. ते मिश्रण थंड झाले की ते हळूहळू केसांच्या मुळांना लावा. अर्ध्या तासानंतर केस धुवून टाका. हे आठवड्यात किमान दोन वेळा करा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.(Home Remedies for Hair Fall)


– दही आणि बेसन चा लेप तुमच्या केस गळतीच्या समस्येवर काम करेल. यासाठी केस धुण्याच्या आधी अर्धा तास ३ -४ चमचे दही घ्या आणि त्यात दोन चमचे बेसनाचे पीठ घाला हे मिश्रण चांगले एकत्र करा आणि ते तुमच्या केसांच्या मुळांसह केसांच्या टोकांना लावले तरीही चालेल कारण दही केस गळतीच्या समसयबरोबर केसांना चमक आणण्यासाठी ही मदत करते. हे मिश्रण लावल्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवून टाका.हे आठवड्यात किमान एकदा करा.  

Home Remedies for Hair Fall
Home Remedies for Hair Fall


– एक आवळा घ्या त्याचे तुकडे करुन ते नारळाच्या तेलात चांगले उकळवा.हे तेल थंड झाल्यावर ते एक बाटलीत भरून ठेवा. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही केस धुता त्या आधी अर्धा तास शक्य असल्यास आदल्या रात्री केसांच्या मुळांना लावून ठेवा नंतर धुवून टाका. हे आठवड्यातून किमान दोनदा करा.  

============================

हे देखील वाचा: वजन कमी करण्यापासून ते तणाव कमी करण्यापर्यंत सूर्यनमस्कार करण्याचे आहेत अनेक आश्चर्यचकित करणारे फायदे

============================


– केस गळतीच्या समस्येवर पेरुची पाने ही अतिशय गुणकारी आहेत. पेरू फळाच्या हंगामात काही पेरूची पाने घेऊन किमान १ लिटर पाण्यात उकळून घ्या. पाण्याचा रंग काळा होईपर्यंत उकळत रहा. आता या पाण्याने डोक्याला मसाज करा.असे केल्याने केसांची मुळं मजबूत होतात आणि केसगळती मोठ्या प्रमाणात कमीहोण्यास मदत होते.
वरील उपायांबरोबर आठवड्यातून किमान तीन दिवस आवळा, भाजलेल्या भोपळ्याच्या बिया, आक्रोड याचे सेवन करणे ही तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.(Home Remedies for Hair Fall)


(Disclaimer: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहला गेला आहे आम्ही या सर्व गोष्टी खऱ्या असण्याचा कोणताही दावा करत नाही. यातील कोणताही उपाय करण्यापूर्वी योग्य तो सल्ला घ्यावा) 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.