Home » Health :बद्धकोष्ठतेच्या त्रासाला कंटाळले आहेत…? मग ‘हे’ सोपे उपाय करून पाहाच

Health :बद्धकोष्ठतेच्या त्रासाला कंटाळले आहेत…? मग ‘हे’ सोपे उपाय करून पाहाच

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

आयुर्वेदात असे लिहिले आहे की, गंभीर आजारांची सुरुवात ही कायम पोटापासून होते. किंवा पोटच अनेक आजारांचे कारण असते. यासाठी आपले पोट कायम तंदरुस्त असणे आवश्यक आहे. मात्र आजच्या काळात इथेच तर सगळ्यांची समस्या होते. खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि जागरणांमुळे बहुतेक लोकांना पोटाच्या संबंधित तक्रारी निर्माण होताना दिसत आहेत. यातच सर्वाधिक वाढणारी समस्या म्हणजे बद्धकोष्ठ. (Health)

अर्थात पोट नीट साफ न होणे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वानाच ही समस्या भेडसावत आहे. पोट नीट साफ झाले नाही तर दिवस तर खराब जातोच सोबत पोटाचे विविध त्रास देखील सुरु होतात. उत्तम पोट हे उत्तम आरोग्याचे लक्षण असते. त्यामुळेच जेव्हा तुमचे पोट नीट साफ होत नसेल तेव्हा सुरुवातीलाच त्याकडे लक्ष देऊन उपाय करा आणि या समस्येतून मुक्ती मिळवा. पोट नीट साफ होण्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय देखील आहेत ते कोणते चला जाणून घेऊया. (Health Care)

त्रिफळा चूर्ण
औषधी गुणांनी परिपूर्ण असलेले त्रिफळा चूर्ण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनसंस्था देखील मजबूत होते. त्रिफळामध्ये असलेले ग्लायकोसाइड गुणधर्म पोट स्वच्छ करण्यास मदत करतात. त्रिफळा गरम पाण्यात मिसळून किंवा त्याचा चहा बनवून सेवन करता येते. या उपायाने जुनाट बद्धकोष्ठता देखील सहज बरी होते. (Top Stories)

हिरव्या भाज्या
हिरव्या भाज्या फायबर, पॉटेशियम, व्हिटॅमिन आणि अन्य पौष्टिक तत्वांनी परिपूर्ण असतात. त्यांच्या सेवनाने बद्धकोष्ठतेवर लगेचच आराम मिळतो. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक अतिशय लाभदायक असतो. यात फायबर, व्हिटॅमिन भरपूर असतात. त्याचबरोबर, केली, दुधी यासारख्या भाज्यादेखील या आजारात फायदेशीर आहेत. हिरव्या भाज्यासोबतच गाजर आणि टॉमेटोही सलाडमध्ये खाल्ल्यास लाभ होतात. (Marathi News)

Health

नारळाच्या तेलाचे सेवन
दररोज १ ते २ मोठे चमचे नारळाच्या तेलाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल. नारळाचे तेल आतड्यातील घाण खेचून काढते. त्यात अँटीऑक्सिडेंटची मात्रा उच्च असते. यामुळे बद्धकोष्ठतेसह कँन्सरसारख्या आजारांवरही हे तेल फायदेशीर ठरते. (Top Marathi Headline)

पपईचे सेवन
पपईचे सेवन पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. खासकरुन बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांसाठी लाभदायक आहेत. पपईत फायबर, व्हिटॅमिन आणि व्हिटॅमिन सी अधिक असते. जे लिव्हर डिटॉक्सचे काम करते आणि बद्धकोष्ठतेवर आराम देते. (Marathi News)

ओव्याचे पाणी
ओवा ही आपल्या आहारातील एक साधी पण अतिशय गुणकारी वनस्पती आहे. ओव्यामध्ये असणारे औषधी गुणधर्म पोटातील गॅस काढून टाकतात आणि पचनक्रियेला सुधारण्यासाठी मदत करतात. रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा ओवा मिसळून प्यायल्याने सकाळी गॅसची समस्या दूर होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. (Todays Marathi Headline)

इसबगोलचा वापर
बद्धकोष्ठतेसाठी इसबगोल म्हणजेच प्लांटेनसीड्सचा पावडर हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे जो प्रभावी ठरतो. इसबगोल पाण्यात मिसळल्यावर जेलसारखा होतो आणि आतड्यांना सौम्यतेने साफ करतो. रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा इसबगोल घालून प्यायल्यास सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. (Marathi Latest Headline)

मुलेठी
शरीराच्या अनेक समस्या मुलेठी सेवनाने सहज बरे होतात. ते सेवन करण्यासाठी मुलेठी पावडर बनवा. आता एक ग्लास गरम पाण्यात १ चमचा मुलेठी पावडर आणि गूळ मिसळून ते प्या. असे केल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि अपचन देखील बरे होते. (Top Marathi News)

मध
मध सेवन केल्याने बद्धकोष्ठता देखील सहज बरी होते. १ ग्लास पाण्यात १ चमचा मध मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्या. असे केल्याने सकाळी शौच करणे सोपे होईल आणि पचनसंस्था देखील मजबूत होईल. (Latest Marathi News)

========

Health : ब्रम्ह मुहूर्तावर उठण्याचे आरोग्याला होतात अनेक फायदे

========

सुखा आलुबुखारा
वाळलेले मनुके किंवा सुखा आलुबुखारा हा बद्धकोष्ठतेसाठी सर्वोत्तम नैसर्गिक उपाय आहे. हे मुलांसाठीही आरोग्यदायी आहे. त्यात भरपूर फायबर, सॉर्बिटॉल आणि फिनोलिक घटक असतात, जे बद्धकोष्ठतेवर किंवा पोटांच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी प्रभावी आहेत. 100 ग्रॅम आलुबुखाराचे सेवन रोज केल्याने त्वरित या समस्येत आराम मिळेल. (Top Trending News)

मेथीचे पाणी
मेथीचे दाणे हे पचनासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. रात्री एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ठेवून सकाळी ते पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. मेथीचे दाणे आतड्यांचे आरोग्य सुधारतात आणि पोटातील अडथळे दूर करतात. मेथीचे पाणी पचन सुधारते आणि गॅसची समस्या कमी होते. (Social News)

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करीत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.