प्रत्येक व्यक्तीसाठी आपली त्वचा खूपच खास असते. आज मार्केटमध्ये आपल्या स्किनची काळजी घेण्यासाठी विविध प्रोडक्टस आहेत. तेलकट त्वचा, कोरडी त्वचा अशा वेगळ्या त्वचानुरूप हे प्रोडक्ट आपण आपल्या आवडीने निवडू शकतो. मात्र आपण पाहिले तर त्वचेचे अनेक विकार आहेत. यातलाच एक महत्वाचा, त्रासदायक आणि गंभीर आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन. (Fungal Infection )
पावसाळा सुरु झाला की, वेगवेगळे आज डोके वर काढतात. यातच फंगल इन्फेक्शन देखील एक आहे. हे फंगल इन्फेक्शन बहुतकरून पावसाळ्यात जास्त होताना दिसते. कारण या दिवसात जास्त आर्द्रता असल्याने त्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळेच पावसाळ्यात त्वचेशी संबंधित आजार मोठ्या प्रमाणावर होताना दिसतात. यात फंगल इंफेक्शनचा धोका जास्त असतो. ओलसर आणि दमट वातावरणामुळे, सोबतच ओलसर कपड्यांमुळे हे फंगल इंफेक्शन वाढत जाते. संपूर्ण शरीरावर देखील ते पसरण्याची दाट शक्यता असते.
बुरशीजन्य संसर्ग अनेकदा उष्णता, आर्द्रता आणि घाण यामुळे होतो. पावसाळ्यात आपल्या शरीराला, आजूबाजूच्या परिसराला स्वच्छ ठेवण्याचा आणि कोरडे ठेवण्याचा प्रयत्न जास्त केला जातो. याचे कारणच हा बुरशीजन्य आजार होऊ नये हे एक असते. कारण ओलावा आणि घाणीत संसर्ग झपाट्याने पसरतो. हे बुरशीजन्य संसर्ग रॅशेस, एथलीट्स फूट, रिंगवॉर्म, जोक इच या नावांनी ओळखले जातात. या आजारावर काही घरगुती सोपे उपाय आहेत ते आपण या लेखातून जाणून घेऊया.
- दररोज भरपूर आणि पुरेसे पाणी प्या. असे केल्याने आपली त्वचा निरोगी राहून तिला शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहारामुळे प्रतिकारशक्ती मजबूत होऊन आपले शरीर फंगल इन्फेक्शन प्रतिरोधक होईल.
- जास्त ओलाव्यामुळे त्वचेवर बुरशीची वाढ होऊ शकते. पावसात भिजून आल्यानंतर लगेच आपली संपूर्ण त्वचा पुसून कोरडी करा . बुरशीचा धोका हाताखाली, पायांच्या जांघांमध्ये, स्तन आणि पायांची बोटे यांच्यामध्ये जास्त असतो, म्हणून हे भाग चांगले पुसून कोरडे करा.
- पावसाळ्यात अस्वच्छ पाण्यामुळे पाय खराब झाले असतील किंवा इन्फेक्शन झाले असेल एका टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यात दोन चमचे मीठ घालून त्यात पाय बुडवून बसा. अर्ध्या तासासाठी पाया मीठाच्या पाण्यातच ठेवावे. बोटांच्या मधील जागाही नीट टिपून कोरडी करा. मीठ हे अँटी-बॅक्टेरिअल असते, त्यामुळे सूज आणि इन्फ्केशन कमी होण्यास मदत होते.
- लसणाच्या पाकळ्या ठेचून त्यात ऑलिव्ह ऑईल मिक्स करा. फंगल इंफेक्शन असलेल्या भागावर हे लावा. सुमारे ३० मिनिटांनंतर ते स्वच्छ करा.
- खासकरून पावसाळ्यात टॉवेल, कपडे, शूज यांसारख्या वैयक्तिक वस्तू कोणाला वापरायला देऊ नका आणि कोणाच्या वापरुही नका. कारण यामुळे बुरशीजन्य आजाराचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरण्याचा धोका यामुळे वाढू शकतो.
- पावसाळ्यात सैल सुती कपडे घालावे, जेणेकरुन ते लवकर सुकतील. तसेच ज्यांना फंगल इंफेक्शनचा त्रास आहे त्यांनी पावसाळ्यात डेनिमचे कपडे घालणे टाळावे.
====================
हे देखील वाचा : आरोग्यासाठी कोणते मीठ चांगले?
====================
- अॅपल सायडर व्हिनेगर वापरा. त्यात अँटी फंगल गुणधर्म असतात. दोन चमचे व्हिनेगर कोमट पाण्यात मिसळून प्या. किंवा कापसाचा गोळा बुडवून बुरशीजन्य भागावर लावा.
- खोबरेल तेल गरम करून फिन्गल इन्फेक्शन झालेल्या भागावर दिवसातून दोन ते तीन वेळा लावा. यामुळे देखील या संसर्गावर लाभ मिळू शकतो.
- पाण्यात सेंद्रिय हळद बारीक करून पेस्ट बनवा. नंतर इन्फेक्शन झालेल्या भागावर लावा. हे कोरडे झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे शरीरात होणारे फंगल इंफेक्शन कमी होण्यास मदत होईल. (Fungal Infection )