Home » Moonsoon Tips : पावसाळ्यात डोकेदुखी ठरणाऱ्या माशांसाठी रामबाण उपाय

Moonsoon Tips : पावसाळ्यात डोकेदुखी ठरणाऱ्या माशांसाठी रामबाण उपाय

by Jyotsna Kulkarni
0 comment
Moonsoon Tips
Share

पावसाळा म्हटले की सर्वत्र चैतन्य आणि आनंद असतो. अगदी मनुष्यापासून ते निसर्गापर्यंत सर्वच खुश असतात. उन्हाच्या झाला सोसल्यानंतर येणार पावसाळा सगळ्यांच्याच आवडीचा ऋतू आहे. पावसाळा जरी आनंदाची उधळण करणारा ऋतू असला तरी या ऋतूचे देखील अनेक तोटे आहेत. पावसाळ्यामध्ये आपल्याला अनेक त्रासदायक गोष्टींचा सामना करावा लागतो. घरात येणारा विचित्र कुबट वास, भरपूर डास, किडे यासोबतच आपली डोकेदुखी वाढवणारा अजून एक त्रास म्हणजे माशा. (Monnsoon Tips)

पावसाळ्याची सुरुवात होत नाही तोवर माशांचा त्रास होतो. या माशा घराबाहेर अनेक घाणेरड्या ठिकाणी बसतात आणि घरात देखील त्या अन्नपदार्थांवर बसून ते खराब करतात. अनेक आजार पसरवण्यात देखील माशा मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरतात. या माशा खराब आणि घाणेरड्याच घरात असतात असे नाही, स्वच्छ घरातही माशा फिरू लागतात. घोंगावणाऱ्या माश्या केवळ वाईटच दिसत नाहीत तर आरोग्यही बिघडवतात. मात्र आज आम्ही तुम्हाला घरातील माश्यांपासून मुक्त होण्याचे काही सोपे आणि प्रभावी मार्ग सांगणार आहोत जे करून तुम्ही नक्कीच घरातील माशा घालवू शकतात. (Marathi NEws)

कापूर
कापूरचा वापर माशांपासून सुटका करण्यासाठी लाभदायक ठरू शकतो. यासाठी १० ते १२ कापूर वड्या घेऊन त्याची बारीक पावडर बनवा. नंतर ती पावडर एक लिटर पाण्यात मिसळून हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरा. त्यानंतर घरात ज्या ठिकाणी माश्या जास्त दिसतात त्या ठिकाणी फवारा.

लवंग आणि लिंबू
माशा दूर करण्यासाठी, लवंग आणि लिंबाचे तुकडे पाण्यात उकळवा. हे मिश्रण थंड झाल्यानंतर स्प्रे बाटलीत गाळून भरून घ्या. जिथे जिथे माशा येतात त्या ठिकाणी याची फवारणी करा. (Todays Marathi Headline)

तुळस
घरातील माशा दूर करण्यासाठी तुळशीची पाने देखील लाभदायक आहेत. यासाठी तुळशीची पाने घेऊन त्याची बारीक वाटून पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीत भरा. या मिश्रणाची दिवसातून दोन वेळा घरामध्ये फवारणी करा.

 

Moonsoon Tips

लेमनग्रास तेल
घरातील माश्यांच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी पाण्यात लेमनग्रास तेलाचे काही थेंब मिसळा आणि घराभोवती फवारणी करा. लिंबूवर्गीय फळांच्या वासाने माशा पळून जातात. (Marathi Latest News)

मिरची स्प्रे
माशा घरात येत असतील तर, मिरची स्प्रेचा वापर करू शकता. २ ते ३ मिरचींची पावडर तयार करा. ही पावडर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून उन्हामध्ये ठेवून २ ते ३ दिवसानंतर पावडर पाण्यात मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरून घरामध्ये फवारा.

दालचिनी
माशांपासून सुटका मिळावण्यासाठी दालचिनीची बारीक करून त्याची पावडर तयार करा. ही पावडर घरात वेगवेगळ्या ठिकाणी टाका. (Marathi News)

मिठाचे पाणी
मीठाचे पाणी माशांपासून मुक्त करू शकते. यासाठी पाण्यात मीठ विरघळवून ते घरभर फवारावे. शक्य झाल्यास मिठाच्या पाण्याने संपूर्ण घर पुसावे.

मीठ आणि व्हिनेगर
मीठ आणि व्हिनेगर दोन्हीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म भरपूर असतात. हे दोन्ही पाण्यात मिसळायचे आणि नंतर संपूर्ण घर या पाण्याने पुसावे.

आलं
४ कप पाण्यामध्ये २ मोठे चमचे सुंठ पावडर किंवा आल्याची पेस्ट घाला आणि एकत्र करा. हे मिश्रण गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि ज्या ठिकाणी माशा येतात त्या ठिकाणी स्प्रे करा. (Marathi Trending News)

==============

हे देखील वाचा : The Story of Mana Village : भारतातील शेवटच्या गावाबद्दल माहितेय का ?

Blaise Metreweli : ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा कुठल्या महिलेच्या हातात ! 

==============

एसेन्शियल ऑइल
लवंग तेल, पेपरमिंट ऑइल, ओव्याचं तेल, लेमनग्रास ऑइल किंवा दालचिनीचं तेल या सारखे एसेन्शियल ऑइल देखील माशा पळवून लावण्यासाठी वापरता येऊ शकतात. २ कप पाणी २ कप व्हिनेगर आणि १० थेंब कोणतही वापरून स्प्रे तयार करा. स्प्रे बॉटलमध्ये भरून माशा येणाऱ्या ठिकाणी स्प्रे करा.

कडुलिंबाचे तेल
माशा दूर करण्यासाठी, पाण्यात कडुलिंबाचे तेल मिसळा आणि घराभोवती फवारणी करा. कडुलिंबाच्या तेलात नैसर्गिक कीटकनाशक गुणधर्म आहेत जे माश्या दूर करतात. (Social NEws)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.