45
पुरुष असो किंवा स्त्री आपण सुंदर दिसाव,आकर्षक दिसाव अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि या सागळ्यात आपण कोणते कपडे घालतो हे सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात.फॅशनच्या या जमान्यात स्त्रिया कोणत्याही प्रकारचे कपडे घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत.त्यामुळे आता स्लीव्हलेस घालणे सामान्य झाले आहे. अनेकदा महिलांना पार्टीला जाताना स्लीव्हलेस ड्रेस घालायला आवडतं. मात्र काही महिलांना डार्क अंडरआर्म्समुळे इच्छा असूनही स्लीव्हलेस ड्रेस घालता येत नाही. विशेषत: उन्हाळ्यात त्यांना कितीही वाटल तरी त्या स्लीव्हलेस घालायला लाजतात. जास्त घाम येणे, शेव्हिंग करणे आणि विशिष्ट डिओडोरंट वापरणे यासह अंडरआर्म्स काळे होण्याची अनेक कारणे असू शकतात. त्वचेच्या इतर भागांपेक्षा अंडरआर्म्सचा रंग थोडा गडद असतो. आणि हे एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण नाही, परंतु कधीकधी ते लाजिरवाणे होते. विशेषत: जेव्हा एखादी मुलगी स्लीव्हलेस कपडे घालण्याचा विचार करते. तुम्हालाही डार्क अंडरआर्म्सची समस्या असेल तर काळजी करू नका कारण सुदैवाने डार्क अंडरआर्म्स कमी करण्यासाठी आपण घरगुती उपचार करू शकता आणि टेक घरगुती उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.(Home Remedies for Dark Underarms)
डार्क अंडरआर्म्ससाठी घरगुती उपाय
– अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर केला जाऊ शकतो. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार एरंडेल तेल त्वचेची घाण साफ करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे ती काळ्या पडलेल्या त्वचेचा रंग हलका होण्यास मदत होते.
– लिंबू एक नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे. हे गडद डाग हलके करण्याचे काम करते. अंघोळीपूर्वी 2 ते 3 मिनिटे अंडरआर्म भागावर लिंबाचा रस लावा. तिथे लिंबाच्या सालीने १ मिनिट चोळा. यानंतर आंघोळ करून मॉइश्चरायझर लावा. 7 ते 10 दिवसात नक्कीच तुम्हाला फरक दिसेल.
– कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामुळे अंडरआर्म्सचा काळेपणा ही दूर होऊ शकतो. खरंतर, कोरफडमध्ये असलेले अॅलोसिन पिग्मेंटेशन सुधारू शकते, ज्याद्वारे काळ्यापणाच्या समस्येवर मात केली जाऊ शकते.यासाठी कोरफड चा आतला भाग अंडरआर्म्सवर काही मिनिटे चोळा आणि नंतर धुवून टाका. तुम्ही हे रात्री लावत असाल तर रात्रभर ही तसेच ठेऊ शकता.
==================================
हे देखील वाचा: Best Time to Workout: कोणत्या वेळेस वर्कआउट करणे आहे फायदेशीर? सकाळी की संध्याकाळी?
==================================
– अॅपल साइडर व्हिनेगर मध्ये अमिनो आणि लॅक्टिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते जे त्वचेच्या मृत पेशी नष्ट करण्यास मदत करते. यात असे गुणधर्म आहेत जे आपल्या त्वचेची छिद्रे बंद करतात आणि काळ्या अंडरआर्म्सचा रंग हलका करतात. यासाठी कापसात थोडे से अॅपल साइडर व्हिनेगर घ्या आणि ते आपल्या अंडरआर्म्समध्ये हलकेसे लावा आणि नंतर ते कोरडे होऊ द्या. एकदा कोरडे झाल्यावर ते धुवून टाका, चांगल्या परिणामांसाठी दररोज ही प्रक्रिया पुन्हा करा.
– काकडीमध्ये कूलिंग असते आणि त्यात ब्लिचिंग एजंट्स असतात जे आपल्याला गडद अंडरआर्म्सचा रंग हलका करण्यास मदत करतात. ते वापरण्यासाठी प्रथम ते बारीक करून त्याचा रस काढावा, रसात कापसाचा तुकडा बुडवून आपल्या अंडरआर्म्सवर लावावा.आणि नंतर धुवून टाका.
(डिस्क्लेमर: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे यातील कोणताही उपाय करण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. )