Home » Beauty Tips : काखेतील काळेपणामुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ उपाय करून पाहाच

Beauty Tips : काखेतील काळेपणामुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ उपाय करून पाहाच

by Jyotsna Kulkarni
0 comment
Beauty Tips
Share

महिलांना कायम आपल्या दिसण्याबाबत सजग राहावे लागते. प्रत्येक महिलेला अनेक नानाविध प्रकारच्या समस्या कायमच भेडसावत असतात. यातलीच एक महत्वाची आणि सर्वच महिलांची डोकेदुखी ठरणारी समस्या म्हणजे काखेतील काळेपणा आणि तिथून येणारा दुर्गंध. ऋतू कोणताही असला तरी आपल्या शरीरातील काही भागांमध्ये कायमच घाम येत असतो. हीच एक जागा म्हणजे आपली काख. अनेक स्त्रियांना बाराही महिने काखेत घाम येण्याची आणि वास येण्याची समस्या असते. (Beauty Care Tips)

यामुळे काखेत काळेपणा देखील खूप येतो. यावर अनेक उपाय करून देखील अपेक्षित परिणाम होत नाही. अनेक मोठमोठ्या पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट करून देखील त्या या समस्येवर जास्त काळ परिणाम देऊ शकत नाही. यामुळे महिलांचा आत्मविश्वास देखील कमी होतो आणि त्यामुळे महिला कायम स्लिव्हलेस ड्रेस घालण्यास देखील टाळाटाळ करतात. काख स्वच्छ न ठेवणे,काखेतील केस क्लीन न करणे, चुकीचे डिओ किंवा परफ्युम्स वापरणे, घट्ट कपडे घालणे, इन्फेक्शन, स्मोकिंग, जास्त घाम येणे, हेअर रिमूव्ह क्रीमचा वापर आदी कारणांमुळे काखेत काळेपणा येतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोपे आणि साधे घरगुती उपाय सांगणार आहोत जे करून तुम्हाला नक्कीच या समस्येपासून सुटका मिळेल. (Marathi News)

काखेतील काळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय

> काखेत काळेपणा कमी करण्यासाठी घरगुती आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर करणे लाभदायक असते. काखेतील काळेपणा कमी करण्यासाठी एक पॅक खूपच फायदेशीर आहे. हा पॅक तयार करण्यासाठी एक चमचा मध, अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा छोटा चमचा गुलाबपाणी घेऊन मिक्स करून घ्यावे. हे मिश्रण काखेतील काळ्या भागावर लावून घ्या. २० मिनिटं हे मिश्रण ठेवून त्यानंतर अंडरआर्म्स पाण्याने स्वच्छ धुवावे. हा उपाय काही दिवस सतत केल्यास तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल. (Todays Marathi HEadline)

Beauty Tips

> काखेतील काळेपणा घालवण्याचा अजून एक उपाय म्हणजे, पाण्यामध्ये तुरटीचा बारीक तुकडा टाकून अंघोळ झाल्यानंतर तो तुकडा काखेत फिरवा. यामुळे काख स्वच्छ होईल आणि काखेतील काळेपणा कमी होण्यास मदत होईल. त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी तुरटी अतिशय प्रभावी आहे. (Trending Marathi News)

> लिंबाच्या रसात असलेले सायट्रिक ऍसिड काखेतला काळेपणा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी तुम्ही एका बाऊलमध्ये तुरटीची पावडर घेऊन त्यात लिंबाचा रस मिक्स करावा. आता हे मिश्रण काखेत असलेल्या काळेपणावर लावावे. त्यानंतर लिंबाच्या साली घेऊन त्याने काख हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे डेड स्किन निघून जाते आणि काख उजळ होते. (Latest Marathi News)

> एका बाऊलमध्ये १ चमचा टूथपेस्ट, १ चमचा तांदळाचे पीठ, अर्धा चमचा बेकिंग सोडा, १ चमचा दही आणि १ चमचा टोमॅटोचा रस घेऊन याची चांगली घट्ट पेस्ट तयार करावी. ही पेस्ट अंडरआर्मवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. ५ मिनिट असेच राहू द्या त्यानंतर ओल्या कापडाने हळूहळू चोळत त्वचा स्वच्छ करावी. संपूर्ण पेस्ट निघाल्यानंतर आता स्वच्छ पाण्याने काख धुवून घ्या. (Top Marathi News)

> एका वाटीत थोडी हळद आणि चमचाभर तुरटीचे पाणी मिसळून एक पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट काखेत लावा आणि १०–१५ मिनिटांनी धुवून टाका. हा उपाय सतत केल्यास त्वचा उजळण्यास मदत होते. हळद असल्यामुळे कोणतीही इन्फेक्शनची शक्यता राहत नाही. (Top Stories)

> एक चमचा दही आणि अर्धा चमचा तुरटी पावडर एकत्र करून पेस्ट तयार करावी आता ही पेस्ट काखेत लावून १५ मिनिटांनी धुवून टाका. हा उपाय खासकरून कोरड्या आणि डाग पडलेल्या त्वचा असणाऱ्यांसाठी लाभदायक आहे. (Social Updates)

=========

हे देखील वाचा :

Health Care : शरीरातील रक्त वाढीसाठी लोहयुक्त गोळ्यांचे सेवन करता? लक्षात ठेवा या गोष्टी

Health Care : ब्रम्ह मुहूर्तावर उठण्याचे आरोग्यदायी फायदे, मनं आणि तनं राहिल शांत

=========

> काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी बटाट्याचा वापर देखील उत्तम आहे. यामुळे काख स्वच्छ होईल. यासाठी एक बटाटा घेऊन त्याला आपल्या काखेत चोळावे थोडा वेळ चोळल्यानंतर काख स्वच्छ धुऊन घ्यावी.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.