Home Remedies for Dandruff : केसांच्या स्कॅल्पची स्वच्छता राहणे अत्यंत महत्वाचे आहे. याकडे लक्ष न दिल्यास स्कॅल्प इंफेक्शन ते केसात कोंडा होण्याची शक्यता वाढली जाऊ शकते. यामुळे चारचौघांमध्ये जाण्यास लाज वाटते. काहीजणांना थंडीच्या दिवसातही कोंड्याची समस्या उद्भवते. पण काहींना वर्षभर केसात कोंडा होण्याची समस्या असते. खरंतर, केसांत कोंडा फंगसच्या कारणामुळेही होऊ शकतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पुढील काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. जाणून घेऊया केसातील कोंडा दूर करण्यासाठी कोणत्या सोप्या ट्रिक्स फॉलो कराव्यात.
योग्य शॅम्पूची निवड
केसातील कोंड्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही झिंक पाइरिथियोन, सॅलिसिलिक अॅसिड, सल्फर, सेलेनियम सल्फाइड, केटोकोनाजोलयुक्त शॅम्पूचा वापर करू शकता. याच्या वापरामुळे केसांच्या स्कॅल्पवरील फंगस दूर होत कोंड्याची समस्या कमी होईल.
केसांची काळजी घ्या
केसात कोंड्याची समस्या होऊ नये म्हणून केसांची काळजी घ्या. केस वेळोवेळी धुण्यासह स्कॅल्पसाठी अँटी-ड्रँडफ शॅम्पूचा वापर करावा.
दही लावा
कोंड्याची समस्या दूर होण्यासाठी दह्याचा वापर करू शता. दही केसांसाठी पॅकप्रमाणे लावू शकता. यासाठी दही फेटून केसांच्या मूळांना व्यवस्थितीत लावा. एक तास दही केसांना लावून ठेवल्यानंतर माइल्ड शॅम्पूने धुवा.
कडुलिंबाच्या पानांचा लेप
कडुलिंबाची पाने केसांसाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. कोंड्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या शॅम्पूचा वापर करू शकता.
लिंबाचा रस आणि नारळाचे तेल
केसातील कोंडा दूर करण्यासाठी लिंबाचा रस आणि नाराळाचे तेल मिक्स करुन केसांना लावा. यामुळे कोंडा दूर होईल. यासाठी दोन चमचे लिंबाच्या रसात तीन चमचे नारळाचे तेल मिक्स करा. 20 मिनिटे तेल केसांना लावून ठेवल्यानंतर केस धुवा. (Home Remedies for Dandruff)
अंड्याचा वापर
अंड्यामध्ये बायोटिन असते. हे एक प्रकारचे व्हिटॅमिन असून केसातील कोंडा दूर करण्यास मदत करते. याचा पॅक केसांना लावल्याने कोंड्याच्या समस्येपासून दूर राहू शकता. यासाठी एका अंड्याचा पिवळा भाग वाटीत घेऊन त्यामध्ये थोडे नारळाचे तेल मिक्स करा. हे मिश्रण केसांना एक तास लावून ठेवा. यानंतर कोणत्याही माइल्ड शॅम्पूच्या मदतीने केस धुवा.