बहुतांश घरं ही नवऱ्याच्या कमाईवर चालतात. अशातच एखाद्या कारणास्तव नवऱ्याची नोकरी गेली किंवा व्यवसायात तोटा झाला तर घर चालवणे फार मुश्किल होते. नवऱ्याची नोकरी नसल्याने खुप टेंन्शन येतेच पण पार्टनरच्या वागण्यामुळे ही फार चिडचिड होते. कारण तो पैसे कमावून आणण्यास आता असमर्थ असल्याने बायकोला घर चालवताना फार समस्यांचा सामना करावा लागतो. काही वेळेस बायको अधिक संतप्त होत नवऱ्याला समजून घेण्याऐवजी त्याच्यासोबत तावातावाने भांडके. अशातच त्याच्यावर नोकरी लवकरात लवकर कशी मिळेल याचा अधिक ताण येतो. तुम्ही सुद्धा अशा स्थितीतून जात असाल तर तुमची जबाबदारी आहे या स्थितीत घाबरुन जाऊ नये. पुढील काही टीप्सने तुम्ही तुमचे घर अगदी व्यवस्थितीत सांभाळा. (Home manage tips)
नवऱ्याला प्रोत्साहन द्या
एखाद्या कारणास्तव नवऱ्याची नोकरी गेल्यानंतर तुमची जबाबदारी आहे की, त्याला प्रोत्साहन देणे. बहुतांश महिला या स्थितीत ही चुक करतात की, नवऱ्यासोबत त्या भांडतात. ऐवढेच नव्हे तर नवऱ्याला इमोशनल ब्लॅकमेल ही करतात. या परिस्थितीत तुम्ही अशी चुक कधीच करु नका. तर बायको असल्याच्या नात्याने त्याला प्रोत्साहन करा, त्याला असे फिल करुन द्या की, त्याच्याकडे करण्यासारखे खुप काही आहे. तो आयुष्यात खुप काही गोष्टी उत्तमपणे करु शकतो.
खर्चात कपात करा
जेव्हा नवऱ्याची नोकरी जाईल तेव्हा आपल्या खर्चावर थोडं नियंत्रण ठेवले पाहिजे. गरजेशिवाय शॉपिंग करण्यापासून दूर रहावे. नवऱ्यावर खर्चासाठी दबाव टाकू नये. तसेच विचार न करता तुम्ही जी सेविंग केली आहे ती यावेळी खर्च करु नका. तसेच लहान मोठ्या गोष्टींमध्ये बचत करण्याची सवय लावा. तुम्ही अशा स्थितीत ही व्यवस्थितीत घर चालवू शकता.
आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करा
या स्थितीत घराची स्थिती बिघडली जाते. त्यावेळी सेविंग केलेल्या पैशांतून तुम्ही नवऱ्याची मदत करु शकता. जेणेकरुन त्याला सुद्धा तुमचा आधार मिळेल.
घरातील वातावरण पॉझिटिव्ह ठेवा
हे सर्वात महत्वाचे आहे की, घरातील वातावरण पॉझिटिव्ह ठेवणे. नेहमीच असे पाहिले जाते की, जेव्हा नवऱ्याची नोकरी जाते तेव्हा घरातील सर्वजण टेंन्शनमध्ये येतात. ऐवढेच नव्हे तर घरातील मुलं काही मागतात तेव्हा त्यांच्यावर राग निघतो. असे करण्यापासून नेहमीच दूर रहा. (Home manage tips)
हेही वाचा- महिलांना ‘या’ सवयी बनवतील Emotionally Strong
इनकम सोर्स शोधा
जर तुम्ही सुद्धा अशा स्थितीतून जात असाल तर इनकम सोर्स शोधा. ज्यामुळे तुम्ही नवऱ्याची आर्थिक मदत करु शकता. बाहेर जाऊन नोकरी करण्याऐवजी तुम्ही घरातूनच लहान-मोठे काम सुरु करुन त्यामधून पैसे कमवू शकता.