जर तुम्ही नवं घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी गृहकर्ज (Home Loan) घेतले असेल तर त्यासाठी भरावा ईएमआय हा वेळोवेळी भरावा लागतो. त्यामुळेच प्रत्येकाला असे वाटत असते की, घेतलेले गृहकर्ज हे लवकरात लवकर संपवावे. गृहकर्ज संपल्यानंतर तुम्हाला एक मोठी रक्कम बँकेला देण्याची अजिबात गरज नसते. तुमच्याजवळ येणाऱ्या भविष्यासाठी अधिक पैशांची बचत होण्यास सुरुवात होऊ लागते. अशातच तुम्ही टेंन्शन फ्री होता की, तुम्हाला आता कोणालाही पैसे द्यायचे नाहीत. परंतु स्वत:चे घर झाल्याचा आनंद होतोच. मात्र जरी तुमचे गृहकर्ज संपले असले तरीही काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक असते.
प्रॉपर्टीचे मूळ पेपर्स जरुर ताब्याब घ्या
जेव्हा तुम्ही नव्या घरासाठी गृहकर्ज घेता तेव्हा तुम्हाला घराची कागदपत्र ही बँकेकडे जमा करावी लागतात. म्हणजेच घर गहाण ठेवले जाते. जेव्हा तुम्ही कर्ज फेडता तेव्हा बँकेकडून जरुर मूळ घराची कागदपत्र आपल्या ताब्यात घेण्यास विसरु नका. त्याचसोबत कागदपत्र मिळाल्यानंतर त्यामध्ये प्रत्येक पान हे आधी होते तसेच आहे का ते सुद्धा तपासून पाहण्यास विसरु नका.
नो-ड्यू सर्टिफिकेट घेण्यास विसरु नका
हे सर्टिफिकेट असे स्पष्ट करते की, जेव्हा तुमच्यावर बँकेला कोणत्याही प्रकारचे देणे लागत नाही. तुम्ही कर्जाची परतफेड केली आहे. त्याचसोबत त्यावर असे ही लिहिलेले असते की, कर्जदाराच्या प्रॉपर्टीवर आता कोणताही क्लेम नाही. ही कागदपत्र व्यवस्थितीत तपासून पहा आणि तेथे तुमचे नाव, पत्ता आणि अन्य महत्वाची माहिती योग्य लिहीली आहे की नाही ते सुद्धा पहा. (Home Loan)
हे देखील वाचा- नवं घर खरेदी करताना ‘ही’ महत्वाची कागदपत्र जरुर तपासून पहा
प्रॉपर्टीवरील लीन (Lien) आवश्यक हटवा
गृहकर्ज फेडेपर्यंत एखाद्याची प्रॉपर्टी आपल्याकडे ठेवण्याच्या अधिकाराला लीन असे म्हटले जाते. काही कर्जदार प्रॉपर्टीवर लीन लावतात. त्यामुळे कर्ज फेडल्यानंतर आठवणीने ते प्रॉपर्टीवरुन हटवावे. लीन हटवल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीशिवाय कोणत्याही समस्येपासून बचाव करु शकता.
दरम्यान तुमच्यावर आधीच जर एखादे गृहकर्ज असेल आणि त्यामध्ये दुसरे घर खरेदी करण्याचा विचार करत असाल हे प्लॅनिंग तुम्हाला काही वेळेस टॅक्स बेनिफिट देऊ शकते. त्याचसोबत दुसऱ्या गृहकर्जावर तुम्हाला पाच वर्षांसाठी टॅक्स बेनिफिट मिळतो. मात्र तुम्हाला दुसऱ्या होम लोनच्या नियमांनुसार आपल्या गुंतवणूकीचा प्लॅन तयार करावा लागणार आहे.