EMI Calculator : घर घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं, पण ते पूर्ण करताना 20 ते 30 वर्षांचं गृहकर्ज (Home Loan) घ्यावं लागतं. सुरुवातीला EMI परवडणारी वाटते, मात्र काळ जसजसा पुढे जातो तसतसा व्याजाचा बोजा आणि दीर्घकालीन बांधिलकी मानसिक ताण वाढवते. EMI Calculator पाहिल्यावर अनेकांना जाणवतं की एकूण परतफेडीत मूळ कर्जापेक्षा व्याजाची रक्कमच जास्त आहे. मात्र योग्य नियोजन, शिस्तबद्ध आर्थिक निर्णय आणि काही स्मार्ट उपाय वापरल्यास 30 वर्षांच्या कर्जातून लवकर मुक्ती मिळवणं शक्य आहे, असं तज्ज्ञ सांगतात. (EMI Calculator)
सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे EMI परवडणारी ठेवणे आणि शक्य असल्यास जास्त EMI भरणे. पगार वाढल्यानंतर EMI तशीच ठेवण्याऐवजी थोडी वाढवली, तर कर्जाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. उदाहरणार्थ, दरमहा केवळ 2-3 हजार रुपये जास्त भरले तरी 30 वर्षांचं कर्ज 20-22 वर्षांत संपुष्टात येऊ शकतं. EMI Calculator च्या मदतीने वाढीव EMI चा नेमका फायदा किती होईल, हे आधीच तपासता येतं. (EMI Calculator)

EMI Calculator
दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे दरवर्षी अंशतः परतफेड (Part Prepayment). बोनस, इन्क्रिमेंट, इन्सेंटिव्ह किंवा अतिरिक्त बचत यापैकी काही रक्कम थेट कर्जात भरल्यास मूळ रक्कम (Principal) लवकर कमी होते. एकदा Principal कमी झाला की पुढील व्याज आपोआप घटतं. विशेषतः कर्जाच्या सुरुवातीच्या 8-10 वर्षांत प्रीपेमेंट केल्यास त्याचा फायदा जास्त होतो, कारण याच काळात व्याजाचा वाटा सर्वाधिक असतो. (EMI Calculator)
तिसरी टिप म्हणजे कर्जाचा व्याजदर (Interest Rate) वेळोवेळी तपासणे आणि गरज असल्यास बँक बदलणे. आजकाल अनेक बँका फ्लोटिंग रेटवर गृहकर्ज देतात. बाजारात व्याजदर कमी झाल्यावर तुम्ही तुमचं कर्ज दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर (Balance Transfer) करू शकता. थोडं प्रक्रिया शुल्क लागलं, तरी दीर्घकाळात लाखो रुपयांचं व्याज वाचू शकतं. मात्र निर्णय घेण्याआधी EMI Calculator वापरून एकूण बचत किती होईल, याचा अंदाज घेणं आवश्यक आहे.
चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालावधी कमी करण्यावर भर देणे. EMI कमी ठेवून कालावधी वाढवण्यापेक्षा EMI थोडी जास्त ठेवून लोन टेन्युअर कमी करणं जास्त फायदेशीर ठरतं. 30 वर्षांऐवजी 20 किंवा 15 वर्षांत कर्ज फेडल्यास व्याजाचा बोजा मोठ्या प्रमाणात कमी होतो. यासोबतच अनावश्यक खर्च कमी करून, बजेट आखून नियमित बचत केली तर कर्जफेड अधिक सोपी होते. (EMI Calculator)
================
हे देखील वाचा :
Gratuity Calculator: ग्रॅच्युइटी म्हणजे काय? 30 हजार पगारावर एका वर्षात किती रक्कम मिळते?
EMI चा सापळा: हप्त्यांच्या मोहात अडकण्याआधी जाणून घ्या आर्थिक सत्य!
नो-कॉस्ट EMI च्या नावाखाली कापला जातोय तुमचा खिसा
=================
पाचवी ते सातवी टिप म्हणजे इन्शुरन्स, करसवलत आणि शिस्त. गृहकर्जावर मिळणाऱ्या करसवलतींचा योग्य वापर करा, पण केवळ करबचतीसाठी कर्ज लांबवू नका. लोन प्रोटेक्शन इन्शुरन्समुळे अनपेक्षित परिस्थितीत कुटुंबावर ओझं येत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे EMI चुकवू नये आणि आर्थिक शिस्त पाळावी. नियमित पुनरावलोकन आणि योग्य नियोजन केल्यास 30 वर्षांचं गृहकर्जही अपेक्षेपेक्षा खूप आधी संपवता येतं. (EMI Calculator)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
