केस आपल्या सौंदर्यात कायमच भर घालण्याचे काम करत असतात. प्रत्येक व्यक्तीला मग ती स्त्री असो किंवा पुरुष आपले केस प्रिय असतात. नेहमीच आपल्या केसांना जपण्यासाठी त्यांच्या सौंदर्यामध्ये वाढ करण्यासाठी सर्वच प्रयत्नशील असतात. केसांकडे सगळ्यांचेच विशेष लक्ष तर असतेच मात्र केसावर प्रेम देखील अधिकच असते. अशा या केसांच्या लहान मोठ्या समस्या अनेकांना सतावत असतात. कोंडा होणे, केस गळणे, केस निस्तेज होणे आदी अनेक समस्या केसांच्या असतात. यातलीच एक सामान्य मात्र त्रासदायी समस्या म्हणजे, केसांमध्ये सतत खाज येणे. केस ओलसर असल्यास, केसांमध्ये कोंडा किंवा उवा असल्यास केसांना खाज येते. मात्र असा कोणताही त्रास नसला तरी अनेकांना सतत डोक्यात खाज येते. मग ही खाज येण्याचे नक्की कारण कोणते आणि यावर काही घरगुती उपाय कोणते जाणून घेऊया. (Hair Care)
डोक्यात खाज येण्याची कारणे
डोक्याला खाज सुटणे ही तशी सामान्य समस्या आहे. डोक्यातील कोरडेपणा, कोंडा, अॅलर्जी किंवा संसर्ग यामुळे खाज येऊ शकते.डोक्यातील अस्वच्छेतेमुळे डोक्यात खाज येऊ शकते. याशिवाय डोक्यात कोंडेंचे प्रमाण वाढल्यास खाज येऊ शकते. कोंडा वाढल्यास डोक्यात फोड होऊ शकतात, आणि मग त्यांनी डोक्यात वेगळा आजार होऊ शकतो आणि खाज येऊ शकते. काहीवेळा तणावामुळे किंवा केस कोरडी झाल्याने डोक्यात खाज येऊ येते. किंवा डोक्याच्या त्वचेला सूज आल्यास खाज येऊ शकते. किंवा केसवाढीसाठी तेल जास्त प्रमाणत वापरल्यास डोक्यात खाज येऊ शकते. डोक्यात कोणत्याही प्रकारचे इन्फेशन झाल्यास खाज येऊ शकते. केसांखाली असलेल्या त्वचेची स्वच्छता न राखणे या कारणांमुळे केसांना तसेच केसांखाली असलेल्या त्वचेला खाज येते. (Marathi)
डोक्याची खाज घालवण्याचे उपाय
मोहरीचे तेल आणि दह्याचा मास्क
दह्यामध्ये असलेले प्रथिने आणि लॅक्टिक ऍसिड टाळूच्या त्वचेच्या पेशी स्वच्छ करून केस दाट होण्यास मदत करतात.हा हेअर मास्क डोक्यातील कोंडा,खाज आणि बुरशीजन्य संसर्ग दूर करेल आणि केस मजबूत करेल. या मास्कसाठी एका भांड्यात अर्धा कप दही घेऊन त्यात २ चमचे मोहरीचे तेल घालावे. यानंतर त्यामध्ये टी ट्री हेअर ऑइलचे काही थेंब मिसळावे. शॅम्पू केल्यानंतर, हा हेअर मास्क केसांना लावा आणि २० ते २५ मिनिटे राहू द्या. यानंतर, टाळूची चांगली मालिश करा आणि कोमट पाण्याने डोके धुवा. (Marathi News)

नारळ तेल आणि लिंबाचा रस
नारळ तेलात लिंबाचा रस मिसळून डोक्यावर लावा. हे मिश्रण डोक्यावरील कोरडी त्वचा मुलायम बनवते आणि कोंडा दूर करते. नारळ तेल केसांना पोषण देते, तर लिंबाचा रस डोक्याचा संसर्ग दूर करतो. याचा नियमित वापर केल्यास डोक्यातील खाज पूर्णपणे बंद होऊ शकते. (Top Marathi Stories)
अॅपल सायडर व्हिनेगर
अॅपल सायडर व्हिनेगर केसांच्या मुळाशी लावून १५ ते २० मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. हा घरगुती उपाय डोक्याची त्वचा स्वच्छ ठेवतो आणि खाज कमी करतो. यामुळे डोक्यातील बॅक्टेरिया आणि बुरशी नष्ट होते. तसेच, केस मऊ आणि मजबूत होतात. (Social Updates)
कोरफडीचा गर आणि तेल
बऱ्याच वेळेला डोक्याची त्वचा कोरडी पडल्यामुळे खाज येत असते. अशावेळी खोबऱ्याचे तेल किंचित गरम करून त्याने मालीश करावी. खोबऱ्याचे तेल उत्कृष्ट मॉइश्चरायझर आहे. त्याचा प्रभाव थंड असतो. ज्यामुळे खाजेपासून मुक्तता मिळते. कोरफडीच्या गराचा वापर केस सुंदर, मजबूत तसेच डॅंड्रफ फ्री करण्यासाठी केला जातो. डोक्याला येणारी खाज थांबवण्यासाठी केसांच्या मुळापाशी कोरफडीचा गर लावून हलक्या हाताने चोळा. असे केल्याने कोंडा नाहीसा होऊन खाज येणे बंद होईल. (Marathi News)
जास्वंदी फुल आणि दही
५ ते ६ जास्वंदीचे फूलं आणि पानं यांची पेस्ट तयार करा. त्यामध्ये २ ते ३ छोटे चमचे दही, थोडासा लिंबाचा रस त्या मिश्रणात टाका. हे मिश्रण डोक्यावर लावा. १५ ते २० मिनिटांनंतर डोकं आणि केस स्वच्छ धुवून घ्या. (Top Marathi NEws)
ऑलिव्ह तेलचा वापर
केसांखालच्या त्वचेवर कोमट ऑलिव्ह तेल लावल्याने केसांखालची स्कीन नरम पडते. यासाठी ऑलिव्ह तेल हातावर घेऊन हलक्या हातांनी डोक्यावरील त्वचेची मालीश करा. मालीश केल्यानंतर ऑलिव्ह तेल डोक्यावर काही तासांसाठी तसेच ठेवा. नंतर हर्बल शॅम्पूने केस धुवून घ्या. (Latest Marathi Headline )
टि ट्री ऑइल
टिट्री ऑइलमध्ये अँटी-फंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे कोंडा दूर होण्यास मदत होते. टिट्रीचे तेल रोज वापरल्याने खाज येण्याच्या समस्येपासून सुटका मिळते. यासाठी तुमच्या शॅम्पूमध्ये टी ट्री ऑइलचे काही थेंब घाला आणि आठवड्यातून दोनदा केस धुवा. यामुळे कोंडा आणि खाज येण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. (Top Trending News)
========
Skin Care : प्रेग्नेंसीवेळी स्किन केअर ते मेकअप करताना या गोष्टींची घ्या काळजी
========
कडुलिंबाची पाने
कडुलिंबाची पाने टाळूवरील बुरशीजन्य संसर्गापासून मुक्त होण्यास मदत करतात. टाळूची खाज सुटण्यासाठी काही कडुलिंबाची पाने पाण्यात उकळवा. नंतर थंड होऊ द्या. आता या पाण्याने केस धुवा. तसेच कडुलिंबाच्या तेलाने टाळूची मालिश करू शकता. (Top sTories)
कांद्याचा रस
कांद्याचा रस केसांसाठी खूप फायदेशीर आहे. टाळूवर लावल्याने डोक्याची खाज सुटते. यासाठी कांद्याचा रस काढा. त्यानंतर हा रस कापसाच्या मदतीने डोक्याला लावा. ते लावल्यानंतर, २० मिनिटे असेच राहू द्या. नंतर केस पाण्याने धुवा. यामुळे तुमचे केसही मुलायम आणि चमकदार होतील. यासोबतच केसगळतीही कमी होईल. (Social News)
(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
