Hollywood : चित्रपटसृष्टीत, खासकरून हॉलीवूडमध्ये, नाव हे केवळ ओळख नसते, तर एक ब्रँड असतो. काही कलाकारांचे मूळ नावे उच्चारायला कठीण असतात, तर काहींची नावे खूपच सामान्य किंवा विचित्र वाटतात. म्हणूनच प्रसिद्धी मिळण्याआधी अनेक कलाकारांनी आपली नावे बदलली आहेत. हे नाव बदलणे हे केवळ स्टाईलसाठी नसून, करिअरला चालना देण्यासाठी केलेलं एक धोरणात्मक पाऊल असते. जाणून घेऊया हॉलिवूडमधील अशा काही कलाकारांबद्दल ज्यांनी आपली नावे प्रसिद्धी मिळण्यापूर्वी बदलली आहेत.
टॉम क्रूज (Tom Cruise):

Hollywood
आपल्या अॅक्शन आणि मिशन इम्पॉसिबल मालिकेसाठी प्रसिद्ध असलेला टॉम क्रूज याचं खरं नाव आहे Thomas Cruise Mapother IV. हे नाव उच्चारायला आणि लक्षात ठेवायला कठीण असल्याने त्याने ‘Tom Cruise’ हे सोपं आणि आकर्षक नाव वापरणं पसंत केलं. हे नाव थेट, लक्षवेधी आणि ग्लॅमरस वाटतं.
मायली सायरस (Miley Cyrus):

Hollywood
‘Hannah Montana’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली आणि नंतर पॉप स्टार म्हणून ओळख निर्माण केलेली मायली सायरस हिचं मूळ नाव होतं Destiny Hope Cyrus. ती लहान असताना नेहमी हसत असल्यामुळे तिला ‘Smiley’ असं टोपणनाव दिलं गेलं होतं, आणि याचं पुढे रूपांतर ‘Miley’ मध्ये झालं. २००८ साली तिने अधिकृतपणे आपलं नाव बदलून Miley Ray Cyrus केलं.
निकी मीनाज (Nicki Minaj):

Hollywood
रॅप जगतातील बोल्ड आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असलेली निकी मीनाज हिचं खरं नाव आहे Onika Tanya Maraj. जेव्हा ती संगीत क्षेत्रात पदार्पण करत होती, तेव्हा तिच्या म्युझिक मॅनेजरने ‘Minaj’ हे आडनाव सुचवलं. सुरुवातीला तिला हे नाव नकोसं वाटलं, पण तेच पुढे तिचं स्टेज नेम आणि ओळख बनलं.(Hollywood)
ब्रुनो मार्स (Bruno Mars):

Hollywood
‘Just the Way You Are’, ‘Uptown Funk’ यांसारख्या हिट गाण्यांनी ओळखला जाणारा ब्रुनो मार्स याचं खरं नाव आहे Peter Gene Hernandez. त्याला वाटत होतं की, त्याच्या मूळ नावामुळे लोक त्याला फक्त लॅटिन गायक समजतील आणि त्याच्या गाण्यांची विविधता लक्षात घेणार नाहीत. म्हणून त्याने ‘Bruno’ हे त्याच्या लहानपणीच्या टोपणनावावरून आणि ‘Mars’ हे अंतराळाशी संबंधित, वेगळेपण दर्शवणाऱ्या शब्दावरून निवडलं.
नताली पोर्टमन (Natalie Portman):

Hollywood
ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री नताली पोर्टमन हिचं मूळ नाव आहे Natalie Hershlag. इस्रायली मूळ असलेल्या नतालीने हॉलीवूडमध्ये प्रवेश करताना वैयक्तिक आयुष्य आणि कौटुंबिक गोपनीयता राखण्यासाठी ‘Portman’ हे आजीच्या आडनावावरून स्टेज नेम म्हणून स्वीकारलं.
=========
हे देखील वाचा :
Smriti Irani : ‘क्योंकी सास भी कभी बहू थी 2’च्या एका भागासाठी स्मृती इराणी घेताय तब्बल ‘इतके’ पैसे
Alia Bhatt : आलिया भट्टला जवळच्या व्यक्तीनेच घातला तब्बल ७७ लाखांचा गंडा
Ramayan : ‘आदीपुरुष’चा डाग नितेश तिवारीचं ‘रामायण’ पुसून काढणार का ?
===========
कलाविश्वात नाव हे केवळ ओळख नसून, ते तुमचा प्रभाव, ब्रँड आणि पहिलं छाप पाडण्याचं माध्यम असतं. त्यामुळे अनेक कलाकारांनी प्रसारमाध्यमांमध्ये आणि चाहत्यांमध्ये सहज स्वीकारलं जावं म्हणून, किंवा स्वतःच्या आयुष्यात काही गोष्टी खाजगी ठेवण्यासाठी आपली मूळ नावे बदलली आहेत. ही नावे आज जगभर ओळखली जातात, पण त्यामागे लपलेली खरी नावे जाणून घेणं देखील तितकंच रंजक आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics