Home » हॉलिवूडमधील हे 5 सिनेमे कधीच एकट्यात पाहू नका, अन्यथा…

हॉलिवूडमधील हे 5 सिनेमे कधीच एकट्यात पाहू नका, अन्यथा…

बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये काही हॉरर सिनेमे तयार करण्यात आले आहेत. पण तुम्ही कधी ऐकट्याने एखादा हॉरर सिनेमा पूर्णपणे पाहिलाय का? खरंतर काही हॉरर सिनेमे तुम्ही एकट्यात कधीच पाहू शकत नाहीत.

by Team Gajawaja
0 comment
Hollywood Horror Movies
Share

Hollywood Horror Movies :  प्रत्येक वर्षी चित्रपटगृहांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमे प्रदर्शित होतात. काही सिनेमे तुम्हाला हसवतात, घाबरवतात किंवा रडवतातही. पण तुम्हाला हॉरर सिनेमे पाहायला आवडतात का? अशातच सिनेसृष्टीत असे काही सिनेमे आहेत जे तुम्ही कधीच एकट्याने पाहू शकत नाहीत. जाणून घेऊया याबद्दलच अधिक….

द एक्सॉर्सिस्ट
द एक्सॉर्सिस्ट सिनेमा वर्ष 1973 मध्ये प्रदर्शित झाला होता. हॉलिवूडमधील हा सिनेमा सर्वाधिक हॉरर सिनेमांपैकी एक आहे. तुमच्यापैकी अनेकांनी हा सिनेमा पाहिला असेल. पण विल्यियम फ्रेडकन यांचा हा सिनेमा जेव्हा जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुमचा मेंदू सुन्न पडला असेल ना? खरंतर सिनेमाच्या कथेतील एका मुलीला भूताने पछाडलेले आहे. या मुलीची आई तिला या समस्येपासून सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करते.

पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी
तुम्हाला कधीतरी आजीने एखादी भूताची गोष्ट सांगितली असेलच ना. पण काहीजण या गोष्टींवर विश्वास ठेवतात. अशातच वर्ष 2007 मध्ये पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला ऑरेन पेलीने दिग्दर्शन केले आहे. या सिनेमातील कपलला घरात सुपरनॅच्युरल अॅक्टिव्हिटीचा अनुभव करतात आणि अशा स्थितीपासून पळ काढण्याऐवजी त्याचा सामना करण्याचा निर्णय घेतात. घरात त्या कपल सोबत ज्या काही घटना घडतात त्या पाहून तुमचा थरकाप नक्कीच उडेल. (Hollywood Horror Movies)

साइलेंट हाउस 
या लिस्टमध्ये तिसरा सिनेमा म्हणजे साइलेंट हाउस. हा सिनेमा एलिजाबेथ ओल्सेन यांचा डेब्यू सिनेमा आहे. तुम्ही जर पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी सिनेमा पाहिला असेल तर हा सिनेमादेखील नक्की पाहा. या सिनेमाची कथा एका महिलेची असून जी एका घरात अडकली जाते. तिच्यासोबत अशा काही गोष्टी घडतात ज्या पाहून तुमचा थरकाप नक्कीच उडेल.

द शाइनिंग
वर्ष 1980 मध्ये प्रदर्शित झालेला द शाइनिंग सिनेमा तुम्ही पाहिलाय का? कारण हा सिनेमा ऐवढा हॉरर आहे की, तुम्ही तो एकट्याने पाहण्याचे धाडस करू शकत नाहीच. या सिनेमाची कथा एका परिवाराची असून जे हिवाळ्याच्या दिवसात अज्ञात ठिकाणच्या हॉटेलमध्ये थांबतात. यापासूनच सिनेमाची पुढची कथा सुरू होते.

हॅलोवीन
हॅलोवीन सिनेमा वर्ष 1978 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये एक व्यक्ती पांढऱ्या रंगाचा मुखवटा घालून फिरताना दिसून येत आहे. सिनेमातील दृष्ट म्युझिकमुळे अधिक भीतीदायक वाटतात. हा सिनेमा ऐवढा हॉरर आहे की, एकटा व्यक्ती हॅलोवीन सिनेमा एकट्यात पाहू शकणार नाही.


आणखी वाचा :
बॉलिवूड मधील ‘हे’ कलाकार आहेत प्युअर व्हेजिटेरियन
साऊथ स्टार नागा चैतन्य याच्या ‘या’ घड्याळ्याचा किंमतीत येईल आलिशान फ्लॅट
सनी देओलच्या अफेरच्या अफवांमुळे त्रस्त असायची पत्नी, अभिनेत्याने केला खुलासा

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.