Home » Mumbai : या सुट्ट्यांमध्ये भेट द्या मुंबईतील या ऐतिहासिक किल्ल्यांना

Mumbai : या सुट्ट्यांमध्ये भेट द्या मुंबईतील या ऐतिहासिक किल्ल्यांना

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mumbai
Share

सध्या सगळीकडे मस्त सुट्टीचे वातावरण आहे. मुलांच्या शाळा बंद झाल्या आणि त्यांना सुट्ट्या लागल्या आहे. त्यामुळे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आणि अभ्यासाच्या टेन्शनमधून रिलॅक्स होण्यासाठी मुलं पालकांकडे बाहेर फिरायला जाण्याचा मागणी वजा हट्ट करताना दिसत आहे. पालकांना देखील आपले ऑफिस मॅनेज करून मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी एक उत्तम, चांगले ठिकाण शोधावे लागत आहे. मात्र आज आम्ही तुमचा हा प्रश्न सोडवणार आहोत. (Mumbai)

मुलांचा हट्टही पूर्ण करता येईल, तुमच्या ऑफिसची सुट्टी देखील वाचेल आणि मुलांना आपल्या इतिहासाबद्दल माहिती देखील होईल. आता तुम्ही म्हणाल हे सर्व कसे शक्य आहे? आहे सर्व शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला मुंबईतलेच अतिशय जुने किल्ले सांगणार आहोत. जे कदाचित खूप लोकांना माहित नसतील. मुंबई म्हटले की, लोकांना वाटते फक्त मारिन लाइन, चौपाटी, समुद्र, वांद्रे सी फेस, सुपरस्टार्सची घरं आणि यासोबतच भरमसाठ शॉपिंगची ठिकाणं. (Marathi Top NEws)

मात्र याच हाय फाय मुंबईमध्ये आपल्या अतिशय जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारे अनेक जुने किल्ले आहेत. ज्यांना मोठा इतिहास देखील आहेत. मुमबीत राहूनही अनेक लोकं याबद्दल अनभिज्ञ असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला याच किल्ल्यांबद्दल सांगणार आहोत. जिथे जाऊन तुम्ही तुमची आणि तुमच्या मुलांची सुट्टी नक्कीच सत्कारणी लावू शकता. (Social News)

कॅस्टेला डी अगुआडा उर्फ वांद्रे किल्ला (Bandra Fort)
मुंबईत असलेल्या कॅस्टेला डी अगुआडा या किल्ल्याला वांद्रेचा किल्ला असेही म्हटले जाते. मुंबईतील अतिशय पॉश आणि मोठमोठ्या कलाकारांच्या राहण्याचे ठिकाण म्हणून म्हणून वांद्रे हा परिसर ओळ्खला जातो. याच भागावर एकेकाळी पोर्तुगीजांचे राज्य होते. तेव्हाच पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला होता. हा किल्ला समुद्रसपाटीपासून २४ मीटर उंचीवर आहे. या किल्ल्यावर अनेक चित्रपटांचे शूटिंग देखील झाले आहे. अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या किल्ल्याला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता.

Mumbai

वरळीचा किल्ला (Varali Fort)
वरळीचा किल्ला किल्ला मुंबईचे ऐतिहासिक ठिकाण समजले जाते. मात्र दुर्दैवाने फारच कमी मुंबईकरांना आणि इतर लोकांना याबद्दल माहिती आहे. हा किल्ला इंग्रजांनी टेकडीच्या माथ्यावर बांधला होता, जेणेकरून शत्रूच्या जहाजांवर आणि समुद्री चोरांवर त्यांना नीट पाळख ठेवता येईल. माहितीनुसार, हा किल्ला पूर्ण आठवडा खुला असतो. या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर तुम्ही पहाटे ५ ते संध्याकाळी ७ या वेळेत जाऊ शकता.

Mumbai

एरमित्री किल्ला (Irrmitri Fort)
हा किल्ला डोंगरी किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला मराठा राजवटीत बांधला गेला होता. या किल्ल्याभोवती एक अतिशय विलोभनीय दृश्य आहे, जिथून तुम्ही 360 डिग्रीचे दृश्य पाहू शकता. हा किल्ला समुद्रकिनारी वसलेला असून, उत्तरेला वसईचा किल्ला, पूर्वेला बोरिवली राष्ट्रीय उद्यान, दक्षिणेला एस्सेल वर्ल्ड आणि वॉटर किंगडम आहे. या किल्ल्यावर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला किल्ल्यासोबतच इतरही अनेक ठिकाणं एक्सलपोर करता येतील.

Mumbai

क्रॉस बेट किल्ला (Cross island Fort)
हा किल्ला एक जलदुर्ग असून, तो मुंबईच्या समुद्रात बांधलेला आहे. हा किल्ला मुंबईच्या बंदरात असून, येथे तुम्हाला तेल रिफायनरी, मोठ्या गॅस टाक्या यांचे ऐतिहासिक अवशेष देखील पाहायला मिळतील. येथे जाण्यासाठी स्पीड बोटचा देखील वापर करता येतो.

Mumbai

बेसिन फोर्ट (वसई किल्ला) (Besin Fort)
मुंबईजवळच काही अंतरावर वसई येथे बेसिन किल्ला आहे. याच किल्ल्याला वसई किल्ला देखील म्हटले जाते. हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला असून सुमारे ११० एकरांवर पसरलेला आहे. हा किल्ला इतका मोठा आहे की त्यात ६ चर्च, तीन कॉन्व्हेंटसह अनेक इमारती होत्या. पण आता हा किल्ला भग्नावस्थेत आहे. या ठिकाणी अनेक मालिका आणि चित्रपटांची शुटींग देखील होते.

Mumbai


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.