पुढच्या महिन्यापासून मुलांच्या सुट्ट्या सुरु होत आहे. त्यामुळे सगळे लोकं या सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करताना दिसत आहे. अनेक लोकं त्यांच्या ऑफिसेसमुळे जवळपास कुठे फिरायला जाता येईल की, यावर विचार करत तसे ठिकाणं शोधताना दिसत आहे. आज आम्ही तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. अतिशय उत्तम, बजेट फ्रेंडली आणि निसर्गरम्य ठिकाणी तुम्हाला तुमच्या सुट्ट्या घालवायच्या असतील तर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक मस्त पर्याय. (Nashik)
कायमच मुंबई, पुण्यानंतर तिसरे नाव येते ते नाशिकचे. महाराष्ट्रातील अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सुवर्ण त्रिकोणातील नाशिक या शहराला एक वेगळेच वलय आणि महत्व प्राप्त आहे. अध्यात्मासोबतच, आल्हादायक वातावरण, उत्तम जेवण, आकर्षक आणि रम्य निसर्ग असलेले नाशिक सगळ्यांनाच माहित आहे. नाशिक केवळ प्रभू रामचंद्र किंवा वायनाइरीज एवढेच सीमित नाहीये. यासोबत नाशिकची अजून वेगळी आणि मोठी ओळख आहे. याच नाशिकमध्ये अनेक पर्यटनाची ठिकाणं देखील आहेत. (Marathi News)
आजही नाशिक म्हटले की, डोळ्यासमोर येते ते मिसळ, रामकुंड, पंचवटी. मात्र याव्यतिरिक्त देखील नाशिक खूप मोठे आणि सुंदर शहर आहे. या शहरामध्ये तुम्ही आरामशीर फिरू शकता आणि तुमची सुट्टी सत्कारणी देखील लावू शकता. चला मग जाणून घेऊया नाशिकमधील पर्यटनाची ठिकाणं. (Marathi Latest News)
स्वामीनारायण मंदिर (Swaminarayan Temple)
नाशिकच्या वैभवात स्वामी नारायण मंदिरामुळे मोठी भर पडली आहे. स्वामी नारायण मंदिर १४० फूट लांब, ५५ फूट रुंद आणि ७८ फूट उंच मंदिर आहे. यात ८० हजार घनफूट गुलाबी आणि १५ हजार घनफूट लाल दगडांचा मंदिर बनवण्यासाठी वापर करण्यात आलेला आहे. मंदिरावरील नक्षीकाम अतिशय बारकाईने केलेले आहे. सुबक आणि आकर्षक नक्षीकाम आहे. स्वामी नारायण मंदिराला एकूण पाच शिखर आहेत. तीन मुख्य शिखर आणि दोन प्रासाद पुत्र शिखर आहेत. (Top News)
==========
हे देखील वाचा : Mumbai : या सुट्ट्यांमध्ये भेट द्या मुंबईतील या ऐतिहासिक किल्ल्यांना
===========
पांडवलेणी (Pandavleni Caves)
नाशिकमधील पांडवलेणी या जुन्या लेणी देखील पाहण्यासारख्या आहेत. एका मोठ्या टेकडीवर असलेल्या या प्राचीन लेण्या जवळजवळ दोन हजार वर्षे जुन्या असाव्या असे जाणकारांकडून सांगितले जाते. या लेण्यामध्ये मुख्य चोविस लेणी असून त्यामध्ये बुद्धस्तूप, भिक्षूंची निवासस्थाने अनेक देवदेवतांच्या मुर्ती आढळतात. या लेण्यांच्या ठिकाणावरून नाशिकचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते. (Marathi Top News)
मुक्तीधाम (Muktidham)
मुक्तीधाम हे नाशिकरोड रेल्वे स्टेशनजवळ असलेलं एक भव्य आणि अतिशय सुरेख असे दिव्य मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम पांढऱ्या रंगाच्या मकराणा संगमरवरी दगडांत केलेले असून हे मंदीर स्वच्छता, पवित्रता आणि शांतीचे प्रतिक मानले जाते. या मंदिरात बारा ज्योर्तिलिंग देखील पाहायला मिळतात. शिवाय या मंदीराच्या भिंतीवर गीतेचे श्लोक देखील कोरण्यात आलेले आहेत. (Marathi Trending News)
सप्तश्रुंगी मंदिर (Saptashrungi)
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असे नाशिक जिल्हात वणी येथे सप्तश्रृंगी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. पौराणिक कथांमध्ये १०८ शक्तिपीठांचा उल्लेख आहे. त्यापैकीच एक सप्तश्रृंगी हे अर्धे शक्तिपीठ आहे. नांदुरी गावाजवळील वणी गडावर वसलेली ही देवी अनेक घराण्यांची कुलदैवता आहे. सप्तश्रुंगी हे आदिशक्तीचे मुळ रूप मानले जाते. या मंदिरातील देवीची मुर्ती स्वयंभू असून तिच्या गाभाऱ्याला शक्तिहार, सुर्यहार आणि चंद्रहार असे तीन दरवाजे आहेत. अनेक पायऱ्या चढून वर जावे लागते आणि मग देवीचे दर्शन मिळते. (Social News)
जैन मंदिर
शुद्ध पांढऱ्या संगमरवरी आणि गुलाबी वाळूपासून बनवलेली एक प्रचंड आध्यात्मिक रचना जैन मंदिर हे एक आनंददायी ठिकाण आहे. मंदिराचे सुंदर बांधकाम, निर्मळ स्वच्छ परिसर आणि ताज्या हवेने मन प्रसन्न होते. मंदिराच्या आत सुमारे बारा टन वजनाची जैन तीर्थंकरांची विशाल मूर्ती आहे. नाशिकचे जैन मंदिर हे धर्मचक्र प्रभाव मंत्राधिराज चौमुक्ती पार्श्वनाथ म्हणूनही ओळखले जाते. (Top Marathi News)
सोमेश्वर धबधबा
दूधसागर धबधबा म्हणूनही ओळखले जाणारे, हे ठिकाण त्याच्या सभोवतालली असलेल्या विहंगम दृश्याने डोळ्यांचे पारणे फेडते. सोमेश्वर धबधबा सोमेश्वर मंदिरापासून २ किलोमीटर अंतरावर आहे आणि पावसाळ्यात नाशिकमध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानला जातो.
रामशेज किल्ला
नाशिकमधील पाहण्याजोग्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक रामशेज किल्ला हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे. हा किल्ला मुघल, ब्रिटीश आणि हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या राज्यकर्त्यांच्या उत्तराधिकाराची कथा सांगतो.
सुला वाईनयार्ड्स
नाशिकमधील सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळांपैकी एक असलेले सुला विनयार्ड्स नाशिकमधील वाईनरी आणि द्राक्षांची बाग आहे जी नाशिकला भारताची वाईन कॅपिटल बनवते. सुला विनयार्ड्सची स्थापना राजीव सामंत यांनी १९९८ मध्ये केली होती आणि तेव्हापासून ते देशभरातील लोकांसाठी एक प्रसिद्ध पर्यटक आकर्षण बनले आहे. येथे तुम्हाला विविध द्राक्षांच्या वाइनचे प्रकार पाहायला आणि टेस्टिंग करायला मिळतील.
अंजनेरी हिल्स
अंजनेरी टेकड्या हे भगवान हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते आणि ते नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या डोंगर रांगेत वसलेले आहे. हे नाशिकमधील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. येथे गेल्यास तुम्ही अंजनेरी किल्ल्याला देखील भेट देऊ शकता.
=========
हे देखील वाचा : Chaar Dhaam : चारधाम यात्रेसाठी भाविकांचा महापूर !
=========
कपालेश्वर मंदिर
काळाराम मंदिराच्या अगदी जवळ स्थित, हे नाशिकमधील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे जे भगवान शिवाला समर्पित आहे. मुख्य म्हणजे हे जगातील एकमेव असे शिव मंदिर आहे जिथे नंदी नाहीये. यामागे देखील एक पौराणिक कथा आहे.
याव्यतिरिक्त रामकुंड, पंचवटी, विविध प्रकारच्या मिसळ, गंगापूर डॅम, गंगापूर बॅक वॉटर, त्रंबकेश्वर, काळाराम मंदिर, विविध प्रकारच्या वाइनरीज, अनेक लहान मोठी मंदिरं आदी अनेक गोष्टी देखील नाशिकमध्ये पाहायला मिळतील.