महिलांच्या आयुष्यातील सर्वाधिक महत्वाचा क्षण म्हणजे आई होणं. त्यादरम्यान एखाद्या महिलेकडून बाळाला जन्म देणे किंवा मुलं दत्तक घेणे या दोन्ही गोष्टी तिच्यासाठी खास असतात. अशातच सरकार कडून सुद्धा महिलांसाठी काही खास नियम तयार करण्यात आले आहेत. अशातच हिमाचल प्रदेशातील सरकारने या प्रकरणी एक अनोखा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेशातील सरकारने मुलं दत्तक घेणारी महिला कर्मचाऱ्यालला सहा महिन्यांची सुट्टी देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. अडॉप्शन लीव संदर्भात घेण्यात आलेला हा निर्णय फार महत्वाचा मानला जात आहे. जाणून घेऊयात अडॉप्शन लीव का महत्वाची आहे आणि त्यासंदर्भात अधिक. (Holiday on kids adoption)
अडॉप्शन लीव काय आहे?
अडॉप्शन लीव म्हणजे आई-वडिलांना मिळणारी सुट्टीच आहे. ज्यांनी मुलं दत्तक घेतले आहे त्यांना त्या दिवसापासून अडॉप्शन लीवसाठी अर्ज करु शकतो. हिमाचल प्रदेशातील नव्या नियमानुसार मुलं घरात आल्यानंतर ६ महिन्यानंतर पर्यंत मुलाचा आईला सुट्टीला असणार आहे. हिमाचल सरकारचा हा निर्णय अशा आई-वडिलांसाठी महत्वाचा आहे ज्यांनी मुलं दत्तक घेतलं आहे. अशाप्रकारच्या सुट्ट्यांची योजना प्रत्येक राज्यात अद्याप तरी नाही.
अडॉप्शन लीव का गरजेची आहे?
नैसर्गिकरित्या आई-वडिल बनवणाऱ्या लोकांप्रमाणेच मुलं दत्तक घेणाऱ्या पालकांसमोर ही आव्हान असतात. अशातच अडॉप्शन लीवच्या माध्यमातून त्यांना आपल्या नव्या जबाबदाऱ्यांसह चिमुकल्यासाठी उत्तम निर्णय घेण्याची सुविधा मिळते. मुलाचे पालनपोषण, नवे वातावरण त्याला देण्यासाठी ही सुट्टी फार महत्वाची भुमिका बजावते.(Holiday on kids adoption)
हे देखील वाचा- एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरतील ‘ही’ योगासन
‘या’ राज्यात सुद्धा मिळते अडॉप्शन लीव
हिमालच प्रदेश अडॉप्शन लीव संदर्भातील निर्णय घेणारे पहिलेच राज्य नव्हे. तर याआधी कर्नाटक राज्यात सुद्धा मुलं दत्तक घेणाऱ्या महिलांना १८० दिवसांसाठी सुट्टी दिली जाते. या व्यतिरिक्त आता जम्मू-कश्मीरने सुद्धा असा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत एका महिला जिची दोन मुलं आणि ती वैध पद्धतीने मुलं दत्तक घेतेयं आणि त्या मुलाचे वय एका वर्षापेक्षा कमी आहे तर तिला पूर्णपणे १८० दिवसांची चाइल्ड केअर लीव मिळू शकते.
खरंतर प्रत्येक काम करणाऱ्या महिलेला प्रग्नेसीमध्ये सुट्टी घेता येते. परंतु मुलं दत्तक घेतल्यानंतर सुट्टी घेण्याचा निर्णय हा फार महत्वाचा आणि पालकांसाठी आता फायद्याचा ठरणार आहे.