होळी हा रंगांचा उत्सव आहे. होळीच्या दिवशी अर्थात धुलिवंदनाच्या किंवा धुळवडच्या दिवशी आपल्याकडे रंग खेळाला जातो. प्राचीन हिंदू परंपरेत या सणाचा उद्देश चांगल्याचा वाईटावर विजय आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा जल्लोष असा आहे. होळीच्या दिवशी रंग खेळताना विविध प्रकारचे पेय पिण्याची देखील खूपच जुनी परंपरा आहे. होळीच्या दिवशी बहुतकरून थंडाई प्यायली जाते. अनेक ठिकाणी थंडाईमध्ये भांग घालून देखील पितात तर काही ठिकाणी साधी थंडाई पिण्याची पद्धत आहे. आपण थंडाई मालिका, चित्रपटांमध्ये अनेकदा पाहिली आहे. मात्र थंडाई कशी बनवतात? याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसेल. आज आपण याच थंडाईची आणि सोबतच होळीच्या दिवशी प्यायल्या जाणाऱ्या विविध पेयांची साधी रेसिपी जाणून घेऊया. (Thandai)
थंडाई
साहित्य
पाव वाटी बदाम, पाव वाटी काजू आणि पिस्ता, दोन टेबल स्पून मगज बी तिची पावडर करून घ्याची आहे. बडीशोप, पांढरे तीळ, काळी मिरी,खसखस, वेलची आणि जायफळ पूड हे सर्व साहित्य दोन टेबल स्पून घायचं आहे. केसर, सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, पाव वाटी मिल्क पावडर एवढं साहित्य लागेल.
कृती
सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी काजू, पिस्ता, मगज बी, बडीशोप, पांढरे तीळ, काळी मिरी, खसखस, वेलची आणि जायफळची पूड, केसर आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून रवाळ असे वाटून घ्या. दुसरीकडे बदाम ४-५ तास भिजत घाला. त्यानंतर त्याचे वरचे सालं काढून घ्यायचे आणि आणि त्यामध्ये थोडीशी पिठीसाखर आणि पाव वाटी मिल्क पावडर घालून ते मिक्सरमधून वाटून घ्यावे. थंडाई तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये तयार केलेला मसाला टाकावा. त्यामध्ये दूध टाकून तयार केलेले मिश्रण दोन तास तसेच मुरू द्या. आता जेवढी थंडाई बनवायची आहे त्यानुसार थंड दूध घ्या. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दुध टाकून त्यात मसाल्याचे आणि बदामाचे मिश्रण टाका. त्यामध्ये थोडासा बर्फ देखील टाका आणि तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढे त्यानुसार साखर टाका. हे सर्व छान एकजीव फिरवून घ्या. आता तयार झालेली थंडाई सर्व्ह करायची. (Top Trending Headline)

थंडाई रेसिपी – २
साहित्य
चिरलेले ड्रायफ्रूट्स काजू, बदाम, पिस्ता, खसखस – २ टीस्पून, वेलची, दालचिनी, काळी मिरी – १ टीस्पून, म्हशीचे दूध – १ लीटर, साखर – दीड वाटी, गुलाबाच्या पाकळ्या – आवडीनुसार, केशर
कृती
एका बाउलमध्ये बदाम, काजू, पिस्ता, खसखस, वेलची, दालचिनी आणि काळी मिरी मिसळा. हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवा. एका पातेल्यात दूध घ्या आणि ते उकळवा. उकळत्या दुधात साखर घाला. आता दुधात बारीक केलेली मसाला पावडर मिसळा. थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. नंतर ते एका ग्लासमध्ये ओता. ड्रायफ्रूट्स आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा. थंडगार सर्व्ह करा. (Top Stories)
पान गुलकंद शॉट्स
साहित्य
६ ते ७ विड्याची पानं, बडीशेप, सुके खोबरे, अर्धा चमचा वेलची पावडर, आवश्यकतेनुसार बर्फाचे तुकडे, गुलकंद, आवश्यक असल्यास खाण्याचा हिरवा रंग, चवीनुसार पिठीसाखर.
कृती
प्रथम, ६ ते ७ विड्याची पाने घ्या, ती नीट धुवा आणि चिरून घ्या. मिक्सरच्या भांड्यात टाका. आता मिक्सरमध्ये दीड चमचा बडीशेप, ३-४ बर्फाचे तुकडे, २ चमचे सुके खोबरे आणि सर्व साहित्य बारीक करा. हे सर्व साहित्य थोडेसे बारीक झाल्यावर त्यात गुलकंद आणि थोडासा हिरवा फूड रंग टाका आणि पुन्हा बारीक करून एक गुळगुळीत पेस्ट बनवा. ही पेस्ट हवाबंद डब्यात ठेवा आणि तुम्हाला हवे तेव्हा त्यापासून थंडगार चविष्ट पेय बनवा. एका ग्लासमध्ये एक ते दोन चमचे विड्याच्या पानांची पेस्ट, गोडवा येण्यासाठी आवश्यकतेनुसार पीठी साखर, थंड दूध आणि क्रीम टाका. ते हँड ब्लेंडरने ब्लेंड करा किंवा चमच्याने चांगले मिक्स करा. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
