Home » बाबा विश्वनाथांची होळी….

बाबा विश्वनाथांची होळी….

by Team Gajawaja
0 comment
Baba Vishwanath
Share

फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला रंगभरी एकादशी म्हणतात.  या एकादशीपासून बाबा विश्वनाथांच्या (Baba Vishwanath) काशीमध्ये होळीची सुरुवात होते. अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावात सुरु झालेली ही होळी रंगपंचमीपर्यंत चालते. या सर्व दरम्यान बाबा विश्वनाथांची (Baba Vishwanath) भव्य मिरवणूक देवी पार्वतीची माहेरची पालखी..अशा सर्व कार्यक्रमांनी काशी नगरी रंगून जाते. एकादशीच्या निमित्तानं काशीमध्ये बाबा विश्वनाथांची विशेष सजावट केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीचा विवाह झाल्यानंतर फाल्गुन शुक्ल एकादशीला बाबा विश्वनाथ गणांसोबत परत काशीला आले. शिवपार्वती परत आल्यानिमित्त होणा-या या उत्सवात काशी नगरीत गुलाल उधळण्यात येतो.  

होळीच्या आधी येणारी एकादशी रंगभरी एकादशी म्हणूनही साजरी केली जाते. उत्तर भारतात याचे खूप महत्त्व आहे. विशेषतः काशीमध्ये या एकादशीचा सोहळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्तांची गर्दी होते. या दिवशी माता पार्वती पालखीवर स्वार होऊन सासरी जातात. त्यानंतर बाबा विश्वनाथ (Baba Vishwanath) माता गौराला निरोप देऊन श्रीकाशी विश्वनाथ मंदिरात विराजमान होतात. यावेळी महंतांच्या निवासस्थानापासून ते मंदिर परिसरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत रंगाची उधळण होते. यासाठी खास मथुरेहून रंग येतात. त्यामध्ये भाज्यांपासून बनवलेले रंग, गुलाल यांचा समावेश होतो. या रंगांनी होळी खेळली जाते. रंगपंचमीपर्यंत हा सोहळा साजरा होतो. काशीमधील हरिश्चंद्र घाट,  मणिकर्णिका घाट येथे चिता-भस्माची जगप्रसिद्ध आणि अद्भुत अशी होळी खेळली जाते. यावेळी जळणारी राख अंगावर उडवून घेतात.  रंगभरी एकादशी म्हणजे बाबा विश्वनाथ आणि माता पार्वतीच्या  नृत्याचा शेवटचा दिवस असतो. याची सुरुवात आधी दोन दिवस होतो.  त्याला गणरायाचा कार्यक्रम म्हणतात. यावेळी भोलेनाथ शंकर भगवान आपल्या सासरच्या घरी,  म्हणजेच महंतांचे निवासस्थान,  येथे सर्व सहका-यांसह येऊन बसतात. यावेळी या वराती मंडळींचा चांगलीच आवभगत केली जाते. अगदी फळे, मेवा, थंडाई आदींनी या वरातींचे स्वागत केले जाते. गौण कार्यक्रमाला सुरुवात ही खूप छान होते.  पाहाटेचे साडेतीन वाजता बाबा विश्वनाथांचे (Baba Vishwanath) स्नान आणि पूजन करण्यात येते.  बाबा विश्वनाथ आणि माता पार्वतीच्या चांदीच्या हलत्या मूर्तींना पंचगव्य आणि पंचामृत स्नान केल्यानंतर रुद्राभिषेक करण्यात येतो.  त्यानंतर बाबा विश्वनाथांची शाही सजावट करण्यात येते. शाही पगडी बाबा विश्वनाथ परिधान करतात, सोबत माता पार्वतीही मुकूट आणि शाही वेश परिधान करतात. यावेळी माता पार्वतींना मथुरेहून आणलेल्या खास कपडंयानी सजवले जाते. खास पोशाखांनी तयार झालेल्या भगवान शंकर आणि माता पार्वती यांना मग भोग दाखवण्यात येतो. त्यानंतर त्यांची आरती होते. यावेळी सर्व शिभक्तांना त्यांचे दर्शन घेता येते. यासर्वात आसपासचा सर्व मौहोल शिवभजनात रंगलेला असतो.  यावेळी खास शिवांजली संगीत महोत्सव होणार आहे. गायक अमित त्रिवेदी यांचा रुद्रनाथ बँड विशेष गाणी सादर करणार आहे.  हा सर्व सोहळा दुस-यादिवशी पहाटेपर्यंत चालेल.  त्यानंतर पहाटे चार वाजता माता पार्वतींना पालखीत बसवून बाबा काशी विश्वनाथ मंदिराकडे प्रस्थान करतील. तेथे भोग आरतीनंतर झाल्यानंतर शिवविवाहाचा कार्यक्रम संपन्न होईल.

===========

हे देखील वाचा : जगातील ‘या’ गावात कधीच पडत नाही पाऊस

===========

या सर्व कार्यक्रमासाठी काशी नगरी सजवण्यात आली आहे.  काशीमध्ये पर्यटकांची वर्दळ वाढली आहे.  गेल्या काही वर्षापासून काशीत खेळल्या जाणा-या होळीसाठी परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येनं येत आहेत.  यावर्षीही परदेशी पर्यटक मोठ्या संख्येनं काशीत पोहोचले आहेत.  यासर्व पर्यचकांना आणि शिवभक्तांना हरिश्चंद्र घाट आणि मणिकर्णिका घाटावर होणारी भस्म होळी प्रमुख आकर्षण असते.  धर्मग्रंथानुसार बाबा विश्वनाथ (Baba Vishwanath) स्नानानंतर शिवगणांसह चितेच्या जळत्या राखेसह होळी खेळतात. हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आहे.  ही होळी बघतांना शिवभक्त देहभान हरवून जातात. रंगभरणी एकादशीला काशीच्या मणिकर्णिका स्मशानभूमीत चितेच्या राखेने होळी खेळण्याची परंपरा सुमारे 350 वर्षांपासून सुरू आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी मणिकर्णिका घाटावर चिताभस्माची होळी खेळली जाते. असे मानले जाते की या दिवशी बाबा विश्वनाथ स्वतः भक्तांसोबत होळी खेळतात. या दिवशी महंतांच्या निवासस्थानापासून चांदीच्या पालखीत बाबा विश्वनाथांची मिरवणूक काढण्यात येते.  रंगभरी एकादशीला बाबा विश्वनाथांच्या (Baba Vishwanath) अस्थिकलशाची होळी खेळल्यानंतरच काशीमध्ये होळी उत्सवाला सुरुवात होते. या दिवसापासून धुळवडीपर्यंत बनारसमध्ये होळी साजरी केली जाते. शिवमंदिरांमध्ये फुले आणि अबीर गुलालाची होळीही खेळण्यात येते.  जवळपास दहा दिवस चालणा-या होळी महोत्सवात आता बाबा विश्वनाथांची काशी नगरी रंगून जाणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.