Home » Holika Dahan : नात्यांमधील प्रेम आणि आपुलकी वाढवणाऱ्या होळीच्या सणाचे महत्त्व

Holika Dahan : नात्यांमधील प्रेम आणि आपुलकी वाढवणाऱ्या होळीच्या सणाचे महत्त्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Holika Dahan
Share

भारत हा सणांचा देश आहे. आपल्या देशात प्रत्येक महिन्यात किमान २/३ सण साजरे केले जातात म्हणजे जातातच. याच सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे ‘होळी’. होळी ही फाल्गुन महिन्यात साजरी केली जाते. मुख्य म्हणजे फाल्गुन हा मराठी महिन्यातला शेवटचा महिना आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होळीचा सण साजरा होतो. होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन आदी अनेक नावांनी ओळखले जाते. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीचे सामाजिक महत्त्व म्हटले जाते. या सणाच्या दिवशी लोक एकमेकांमधील मतभेद विसरून एकत्र येतात. असे मानले जाते की या दिवशी लोकांमधील आपापसातील सर्व प्रकारचे मतभेद दूर होतात. (Holika Dahan)

फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत साजरा होणारा होळीचा सण म्हणजे दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन हे सर्व होळीमध्ये दहन करून चांगली वृत्ती, चांगले विचार आणण्याचा संदेश देणारा सण. या दिवशी माणसं एकमेकांमधील राग रुसवे, द्वेष सर्व विसरून पुन्हा नव्याने त्यांच्या नात्याची सुरुवात करतात. या सणाच्या दिवशी लाकडं, गोवऱ्या गोळा केल्या जातात. आजकाल शहरामध्ये तर हे सर्व विकत घ्यावे लागते, गावात सहज सर्व उपलब्ध होते, असो. (Marathi)

जिथे होळी पेटवायची आहे तिथे मध्ये एक मोठी एरंडाच्या झाडाची फांदी उभी केली जाते. त्याच्या भोवती लाकडं, गोवऱ्या रचतात. त्यावर साखरेची माळ बांधली जाते. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. महिला या होळीची पूजा करतात, तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. या होळीच्या अग्नीत नारळ टाकले जाते. असे म्हणतात की, या अग्नीमध्ये भाजलेले पदार्थ जर आपण खाल्ले तर आपण निरोगी राहतो. शिवाय अनेक ठिकाणी मान्यता आहे की, होळीच्या दुसऱ्या दिवशी जर होळीतून निर्माण झालेली राख थंड झाल्यानंतर सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात. (Todays Marathi Headline)

Holika Dahan

होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते. होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते. होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते. शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेला समर्पित करण्यात येते. पूजेनंतर एक कलश पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते. नवीन धान्याचा अंश जसे, गहू, चणे इत्यादींच्या लोंबी यांचीही आहुती देण्यात येते. (Top Marathi News)

होळी साजरी करण्यामागे जसे आपले धार्मिक कारण आहे, तसेच होळीचा सण साजरे करण्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. होळी हा सण हा वसंत ऋतूच्या सुरुवातीला येतो. याकाळात हिवाळा संपून उन्हाळा नुकताच सुरु होत असतो. आपला निसर्ग देखील थंडाव्याकडून दाहकतेकडे जात असतो. थंडीमुळे आपले शरीर सुस्त झालेले असते. त्याला पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी शरीराला उष्णतेची गरज असते. वसंत ऋतूमुळे आपसूकच वातावरणात हळूहळू उष्णता वाढू लागते. तेव्हा होळीचा हा सण किंवा होळीमुळे निर्माण झालेला अग्नी मानवी शरीराला उष्णता देतो. ही उष्णता मनुष्याला पुन्हा नवीन ऊर्जा देते आणि तो नव्याने काम करण्यासाठी तयार होतो. (Latest Marathi Headline)

होळीची कहाणी
हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. (Top Stories)

========

Grahan : होळीच्याच दिवशी होणार २०२६ सालातले पहिले चंद्रग्रहण

========

राजाने होलिकेला भक्त प्रह्लादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की, तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रह्लादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले. (Social NEws)

(टीप : येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे दिलेली आहे.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.