फाल्गुन पौर्णिमेनंतर वसंतोत्सवाला वा वसंत ऋतूला सुरुवात होते. यंदा २०२६ मध्ये ३ मार्च रोजी होळी असून ४ मार्च रोजी धुलीवंदन साजरे होणार आहे. भारतामध्ये होळीचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण देशामध्ये हा सण साजरा केला जातो. मुख्य म्हणजे या सांची नवे देखील वेगवेगळी आहेत. होळी सण उत्तर भारतामध्ये विशेष उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला ‘होळी पौर्णिमा’ असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड आणि रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते. फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात देखील होळी साजरी करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. कोकणातील होळी उत्सव हा संपूर्ण देशामध्ये कायमच चर्चेचा विषय असतो. (Shimga)
कोकणात हा सण साजरा करण्याची पद्धत थोडी हटके आहे. कोकणात होलिका शिमगा नावाने ओळखले जाते. होळीचा सण हा कोकणामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. शिमगा उत्सवासाठी मुंबईतून लोक गावाकडे म्हणजे कोकणात जातात. शिमगा हा कोकणातील एक परंपरागत लोकउत्सव आहे, जो फाल्गुन महिन्यात म्हणजेच मार्चच्या सुमारास होळीच्या सणाच्या आसपास साजरा केला जातो. हा उत्सव साधारणतः पाच ते सात दिवस चालतो आणि कोकणातील लोकसंस्कृती, परंपरा आणि भक्तीभावाचे दर्शन घडवतो. हा उत्सव साजरा करण्यामागे विविध रुढी परंपरा आहे. या काळात कोकणात होळीला पालखी नाचवण्याची परंपरा आहे, ही परंपरा नक्की कोणती आणि यामागे काय इतिहास आहे? जाणून घेऊया. (Holi)
कोकणातील होळीचे प्रमुख आकर्षण म्हणजे संकासूर आणि पालखी. संकासूराच्या वेशात पेटलेल्या होळीच्या पाच फेऱ्या मारणारा आणि आगीतून धावणारा एक माणूस कोकणातील शिमग्याचे एक प्रमुख आकर्षण आहे. कोकणातील होळी उत्सवादरम्यान समाज आणि स्थानिक मंदिराच्या कल्याणासाठी देणग्या गोळा करण्यासाठी लोक ‘संकासूर’सारखे कपडे घालतात. ही कोकणातील पिढ्यानपिढ्या सुरु असलेली परंपरा आहे. कोकणातील शिमगा म्हणजे १० दिवसाआधीपासून सुरू होणारे होलिका दहन आणि त्यानंतर होम आणि पालखीची मजा. पालखी खांद्यावर घेऊन नाचण्याची मजा फक्त कोकणातच येते. खरं तर कोकणात होळीला एक वेगळाच उत्साह असतो. मुंबईतील चाकरमानी पालखीच स्वागत करण्यासाठी कोकणात जातात. गणेशोत्सवानंतरचा मोठा सण म्हणून होळीला ओळखले जाते. (Marathi)

गावागावातील ग्रामस्थ जंगलात जाऊन होळीसाठी झाड निश्चित करतात. काही ठिकाणी शेवरी तर काही ठिकाणी आंब्याचे झाड, काही ठिकाणी सुरमाड तर काही ठिकाणी पोफळीचे झाड होळीसाठी आणले जाते. जंगलात गेलेली ही मंडळी निश्चित केलेल्या झाडाचे पूजन करतात. मग हे झाड कोकणचे पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल ताशांच्या गजरात नाचवतच गावात आणले जाते. गावात वर्षानुवर्षाच्या निश्चित केलेल्या जागेवर हे झाड उभारलं जातं. हे ठिकाण कधीही बदलत नाही. होळी उभारल्यानंतर होळीची पूजा केली जाते. होळीच्या वेळी फाका मारल्या जातात म्हणजेच बोंब ठोकली जाते. होळी पेटवल्यानंतर होम पेटवला जातो. शिमग्याची ही परंपरा गेली अनेक वर्ष अखंड सुरू आहे. नवीन पिढीही ती आपल्या परीनं जपण्याचा प्रयत्न करत आहे. (Todays Marathi Headline)
होळी पेटवल्यानंतर काही गावांमध्ये होम झाल्यानंतरही गावात पालख्या फिरत राहतात अशी प्रथा आहे. यादरम्यान ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे(देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणली जाते. सहाण म्हणजे गावातील चावडी. कोकणात प्रत्येक गावानुसार पालखीची प्रथाही बदले. अनेक गावांतील गावदेवीचे (ग्राम देवता) मंदिर दूर जंगलात, कडेकपारीत असते. या देवळातून पालखी सजवून ढोल ताशांच्या, पारंपारिक वाद्यांच्या गजरात सहाणेवर होळीच्या आधल्या दिवशी आणली जाते. त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरु होतो. गावाच्या चावडीवर अनेक गावकरी रात्र जागवत पालख्या नाचवतात. (Marathi News)
होळीच्या या काळात ग्रामदेवतेची पालखी घरोघरी नाचवली जाते. गाऱ्हाण घातलं जातं. दरवर्षी एका कुटुंबाला या पालखीचा मान दिला जातो. ग्रामदेवतेची पालखी मानकरी आणि ग्रामस्थ मंदिरातून बाहेर काढून ढोल ताश्याच्या गजरात घरोघरी नेतात. याला ‘खेला पालखी’ असे म्हणतात. काहीजण खाद्यांवर तर काही जण डोक्यावर पालखी घेऊन नाचतात. पण काही झालं तरी ही पालखी खाली ठेवली जात नाही. ही पालखी घेऊन नाचण्याची पद्धत ही तशीच विशेष आहे. (Top Marathi Headline)
पालखी प्रत्येक घरात गेल्यानंतर तिथे देवाला गाऱ्हाण घातलं जातं आणि रितसर नैवेद्य देखील अर्पण केला जातो. अनेक ठिकाणी धुलिवंदनाच्या दिवशी होलिकादहन केले जाते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तिसऱ्या दिवशी बोंबाट’ साजरा केला जातो. या दिवशी गुरूचा नाद, शंकासुर यांसारखी सोंग देखील नाचवली जातात. पंचमीलाच म्हणजे शिमग्याच्या शेवटच्या दिवशी दशावताराचा कार्यक्रम आयोजित केला जातो. घरोघरी जाऊन रोभय म्हणजेच पैसे मागण्याचा खेळ लहान मुलं करतात. काही छिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून शिमग्याचा शेवट करतात. तळकोकणात ही पालखी परंपरा तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. होळी साजरी करण्याची पद्धत सगळीकडे वेगळी असली तरी हा केवळ सण नसून कोकणवासीयांच्या एकजुटीचं आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचं मोठं माध्यम आहे. (Social Updates)

या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते. वर्षानुवर्ष ठरवलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणचाराला येतात असं कोकणात मानलं जातं. घरोघरी ग्रामदेवता घरात येणार याचा आनंद काही औरच असतो. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पूजा केली जाते. घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात. गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचवणे हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो. हा उत्सव पाहण्यासाठी देशविदेशातील पाहुणेमंडळी देखील कोकणात येतात. कारण पालखी नाचवताना पाहणे हा डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण असतो. यासाठी अनुभवी ग्रामस्थ डोक्यावर पालखी घेऊन बेभान होऊन नाचतात. (Top Trending News)
गावाच्या वेशीवर आजूबाजूच्या गावातील ग्रामदेवता एकमेकींना भेटण्यासाठी येतात. यावेळी पालखी नाचवताना त्या एकमेकींची ओटी भरतात असं म्हटलं जातं. यासाठी पालखी नाचवताना पालख्यांमधील ओटीचे खण-नारळ बदलण्यात येतात. पालखी नाचवण्याचा प्रकार प्रत्येक गावाच्या परंपरेनुसार निरनिराळा असतो. त्यामुळे पालखी नाचवताना पाहण्यासाठी प्रत्येक गावचे ग्रामस्थ इतर गावांमध्येदेखील जातात. काही ठिकाणी या निमित्ताने दशावतार, सिनेमा, भजन-कीर्तन अशा मनोरंजक गोष्टींचे आयोजन केले जाते. ग्रामदैवतापासून निघालेली पालखी गावाला प्रदक्षिणा घालून पुन्हा ग्रामदैवतापाशीच येते. (Latest Marathi Headline)
कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिथे शतकानुशतके राहणारे कोळी बांधव शिमगोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी होडीवर जायचा मान घरातील स्त्रियांना दिला जातो. या दिवशी पूजेचे सामान, फळे, खाद्यपदार्थ असे सगळे सामान सोबत घेऊन पारंपरिक वेशात कोळी बांधव होडीवर जातात. पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदाचा उत्सव यावेळी साजरा केला जातो. (Top Stories)
=========
Braj Holi Vrindavan : फुलांच्या होळीसाठी वृंदावन सजू लागले
Masan Holi : काशीमध्ये जगप्रसिद्ध मशान होळीची तयारी सुरू
याकाळात आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा आजही शिमगोत्सवात भरवल्या जातात. होळीच्या दिवसात ‘जती’च्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो. धुलिवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजच्या काळातही सुरू आहे. शिमगा उत्सवात नृत्याचे सादरीकरण हमखास केले जाते. वेगवेगळी सोंगे धारण करून कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुषमंडळीनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यांसारखी सोंगे, असे विविध प्रकार यादरम्यान सादर केले जातात. (Social Media)
(टीपः हा लेख केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. आम्ही यातील तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
