Home » Holi : धूलिवंदन आणि रंगपंचमीमधला नेमका फरक काय?

Holi : धूलिवंदन आणि रंगपंचमीमधला नेमका फरक काय?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Holi
Share

सध्या सर्वत्र होळीची जोरदार तयारी होताना दिसत आहे. होलिका दहनापासून ते धुळवड आणि रंगपंचमीपर्यंत होळीचा पाच दिवस मोठा जल्लोष पाहायला मिळतो. होळी दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धूलिवंदन आणि पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. होळी अर्थात रंगांचा उत्सव. संपूर्ण भारतामध्ये मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो. विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या होळीला महाराष्ट्र्रातील कोकणात ‘शिमगा’ म्हटले जाते. होळीचा सण हा फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत असा पाच दिवस साजरा केला जातो. (Holi)

मात्र आजच्या आधुनिक काळात होळी म्हणजे फक्त रंग खेळणे एवढेच समीकरण झाले आहे. फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळीकडे धूलिवंदन साजरे केले जाते. धुलीवंदनलाच काही ठिकाणी धुळवड देखील म्हटले जाते. होळी हा सण रंगांसाठी आता ओळखला जातो. पण होळी म्हणजे होलिका दहन, धूलिवंदन म्हणजे होळीची राख अंगाला लावणे आणि रंगपंचमी म्हणजे रंग खेळणे अशा क्रमाने हा सण साजरा केला जातो. कॅलेंडरमध्ये आपल्याला होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी असे वेगवेगळ्या दिवशी हे सण असल्याचे आपल्याला दिसते. मात्र जर धुलिवंदनलाच रंग खेळले जातात तर रंगपंचमी का आणि कोण साजरी करते? आज आपण या लेखातून धूलिवंदन आणि रंगपंचमी या दोन सणांमधील फरक जाणून घेणार आहोत. (Marathi)

प्रल्हादने त्याची भगवान विष्णुबद्दल असलेली भक्ती सिद्ध करण्यासाठी त्याच्या वडिलांनी केलेल्या अनेक शिक्षा बिनबोभाट सहन केल्या. प्रत्येक परीक्षेतून तो अधिक दृश्य आणि अधिक ताकदीने आपली भक्ती सिद्ध करत होता. जेव्हा हिरण्यकश्यपूने त्याची बहीण होलिकेला तिला मिळालेल्या वरदानाचा वापर करत प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसण्यास सांगितले तेव्हा ती तयार झाली. तिने स्वतःला पेटवून घेतले मात्र प्रल्हादाची भक्ती आणि नामस्मरण अजिबातच खंडले नाही की, तो भयभीत झाला नाही. विष्णूच्या आशीर्वादाने प्रल्हादाचे रक्षण झाले आणि होलिका भस्म झाली. याच वाईट प्रवृत्तीचा विजय साजरा करण्याच्या हेतूने होलिका दहन केले जाते. (Todays Marathi Headline)

Holi

होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी धुळवड किंवा धूलिवंदन साजरे होते. आजकाल अनेकांना या दिवसाचे महत्व, माहिती किंवा इतिहासच माहित नाही. म्हणूनच धुलिवंदनाचाच दिवशी अनेक ठिकाणी रंग खेळाला जातो. खरं तर उत्तर भारतात होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रंग खेळाला जातो. हीच पद्धत आता महाराष्ट्रात देखील चालू झाली आहे. तसे पाहिले तर महाराष्ट्रात रंग पंचमीला रंग खेळाला जातो. मात्र आता असे होताना दिसत नाही. (Top Trending News)

महाराष्ट्रातील रंग पंचमीला रंग खेळण्याची परंपरा आधुनिक काळात मागे पडताना दिसत आहे. धुलीवंदनाच्या दिवशी महाराष्ट्रात रात्री होळी पेटवल्यानंतर सकाळी होळी काहीशी थंड झालेली असते. जी राख उरलेली असते ती एकमेकांना लावली जाते. यासोबतच ही राख पाण्यात मिसळून त्या पाण्याने अंघोळ देखील केली जाते. राख एकमेकांच्या अंगाला फासून धुळवड खेळून नंतर आंघोळ केली जाते. (Latest Marathi Headline)

काही ठिकाणी संपूर्ण जाळून गेलेल्या होळीचा विस्तव पेटत असतो. त्यावर पाणी ठेऊन त्या तापलेल्या पाण्याने अंघोळ केली जाते. असे म्हटले जाते की यामुळे येणार उन्हाळा बाधत नाही. यासोबत संध्याकाळी आजही अनेक गावात शहरात विविध वेशभूषा करून मुले, तरुण जमतात आणि त्यांची मिरवणूक काढली जाते. याला ‘वीरांची मिरवणूक’ किंवा ‘वीरांचा पाडवा’ असं म्हणतात. अशा पद्धतीने धुलिकावंदन, धुलिवंदन किंवा धुळवडचा दिवस साजरा केला जातो. (Top Stories)

=======

Ekadshi : भगवान शिवांना समर्पित असलेल्या एकमेव अशा रंगभरी एकादशीचे महात्म्य

=======

रंगपंचमी ही होळीच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. आजच्या आधुनिक काळात सर्वच मराठी लोकं आपली संस्कृती आणि परंपरा विसरून गेल्याचे दिसते. सर्वच जणं सर्रासपणे उत्तर भारतीय संस्कृतीचे अनुकरण करत आहेत. त्यामुळे आजकाल महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळला जात आहे. रंगपंचमीला रंग खेळून गुलालाची उधळण करून हा दिवस साजरा करतात. नाशिक शहरात रंगपंचमीच्या दिवशी रहाडी परंपरा झोपासली जाते, पेशवेकाळापासून असणाऱ्या या रहाडीची ही परंपरा रंगपंचमीचे वैशिष्ट्य आहे. नाशिकसोबतच महाराष्ट्रातील इतर अनेक शहरांमध्ये, गावांमध्ये रंगपंचमीलाच रंग खेळले जातात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.