अवघ्या दोनच दिवसांवर रंगांची मुक्त उधळण होणारा होळीचा सण येऊन ठेपला आहे. सगळीकडे सध्या होळीची जोरदार तयारी चालू आहे. सगळ्यांचा उत्साह अगदी शिगेला पोहचला आहे. होळी म्हटले की रंग आपसूकच आलेच. रंगांशिवाय होळीची कोणीही कल्पनाच करू शकत नाही. भारतात तर होळी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. एकमेकांमध्ये राग, रुसवे, द्वेष सर्व वाईट गोष्टी दूर सारून रंग लावून पुन्हा नव्याने, आनंदाने त्या नात्याची सुरुवात केली जाते.(Holi)
पूर्वीच्या होळीमध्ये आणि आजच्या होळीमध्ये मोठा फरक आहे. आधी होळीसाठी वापरले जाणारे सर्व रंग नैसर्गिक असायचे. मात्र काळ बदलला तसं या रंगानी देखील नैसर्गिक ते केमिकल मिश्रित रंग असा प्रवास केला. हे केमिकल रंग दिसायला कितीही आकर्षक असले तरी त्याचे आपल्या त्वचेवर आणि केसांवर अनेक विपरीत परिणाम होतात. दुकानदार सांगायला जरी हे नैसर्गिक रंग आहे असे सांगत असले तरी देखील आपण यावर जास्त विश्वास ठेऊ शकत नाही. त्यामुळे होळी खेळताना रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून नेहमी आपण आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घ्यायला पाहिजे. यासाठी काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(Skin and hair Care during holi)
सनस्क्रीनचा वापर
सनस्क्रीन उन्हापासून त्वचेच संरक्षण करते. त्यामुळे होळीत रंग खेळण्याआधी चेहऱ्यावर सनब्लॉक अथवा सनस्क्रीन नक्की लावा. यामुळे चेहऱ्यावर रंग असला तरी देखील उन्हामुळे जळजळ होणार नाही. त्वचेच नुकसान होणार नाही.(Marathi Top Stories)
===============
हे देखील वाचा : Vanuatu : हा वानुआतु नावाचा देश नेमका आहे तरी कुठे..
===============
मॉइश्चरायझरचा वापर
रंग खेळण्याआधी आणि रंग खेळून झाल्यानंतर देखील आपल्या त्वचेवर मॉइश्चरायझर लावणं खूपच गरजेचं आहे. कारण रंगांमुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. मॉइश्चरायजर लावल्यावर आपल्या त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि त्वचा जास्त खराब होत नाही. (Marathi Latest News)
नारळाचे तेल किंवा पेट्रोलियम जेलीचा वापर
होळी खेळण्याआधी त्वचेवर नारळाचे तेल लावा. यातही तुमच्या शरीराचा उघड्या असलेल्या भागावर जसे की, चेहरा, मान, हात, पाय,कान यावर तर नारळाचे तेल लावले गेलेच पाहिजे. यामुळे त्वचेचा आणि रंगांचा थेट संबंध येत नाही. शिवाय रंग खेळून झाले की, शरीरावरील रंग काढणे देखील सोपे होते. तेल लावल्यामुळे हा रंग अगदी सहजपणे निघून जातो.(Skin and hair care tips)
लिपबाम
त्वचा आणि केसांकडे लक्ष देताना आपण आता आपल्या ओठांना विसरून चालणार नाही. होळीच्या रंगांमुळे ओठं कोरडे होतात आणि खरखरीत होतात. रंग खेळण्यापूर्वी आणि रंग खेळून झाल्यानंतरही ओठांना लिपबाम लावणे आवश्यक आहे. यामुळे ओठ मऊ राहतील.(Social News)
होळीदरम्यान केसांची काळजी कशी घ्यायची?
* होळी खेळायला जाण्याआधी केसांना भरपूर तेल लावावे. केसांना तेल लावल्यामुळे केसांचे नुकसान होणार नाही. केसांना तेल लावताना ते त्यांच्या मुळांपासून ते शेवटच्या टोकापर्यंत सगळीकडे व्यवस्थित लावावे.(Health tips)
* होळी खेळायला जाताना केस मोकळे सोडून जाऊ नये. यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. होळी खेळायला जाताना वेणी किंवा घट्ट अंबाडा बांधून जावे.(Health Care)
===============
हे देखील वाचा : Black Turmeric : भारताच्या काळ्या सोन्याला परदेशात मोठी मागणी !
America : अमेरिकेत जन्मलेल्या मुलांनाही देश सोडावा लागणार !
===============
* होळी खेळताना जर डोक्यावर कोणी रंग टाकला तर डोक्यावर लगेच पाणी टाकावे. यामुळे केसांमधील रंग लगेच निघून जाईल आणि केस आणि डोक्यावर परिणाम होणार नाही.(Marathi news)
* रंग खेळून आल्यानंतर केसांमधील रंग स्वच्छ करण्यासाठी शँम्पूचा जास्त वापर करू नये. शँम्पूच्या अतिवापरामुळे केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते.(Holi News)