Home » HMPV व्हायरस भारतात पोहोचला, कोविडसारखी परिस्थिती होणार ?

HMPV व्हायरस भारतात पोहोचला, कोविडसारखी परिस्थिती होणार ?

by Team Gajawaja
0 comment
Share

कोरोना म्हणजेच COVID-19 या व्हायरसने २०२० साली संपूर्ण जगच थांबवलं होत. या व्हायरसमुळे लाखो लोकांच्या मृत्यु झाला. सगळी प्रणाली रिकव्हर व्हायला तब्बल २ वर्ष लागली. त्यांनतर आता कुठे जग सुरळीत चाललं आहे. पण अशाच एका व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. चीनमध्ये तर त्याने थैमान घातलच आहे, पण या व्हायरसने आता भारतातसुद्धा प्रवेश केला आहे, तो व्हायरस म्हणजे HMPV ! सध्या News Channels पासून सोशल मिडीयावर त्याचीच चर्चा सुरु आहे. राज्य सरकारांकडून आणि आरोग्य मंत्रालयाकडून अनेक निर्देश दिले जात आहेत. पण हा आजार भारताला संकटात पाडू शकतो का ? हा व्हायरस किती घातक आहे, जाणून घेऊ.

HMPV म्हणजे ह्युमन मेटान्यूमो व्हायरस… सध्या चीनमध्ये हा व्हायरस पसरल्याच्या अनेक बातम्या आपल्याला ऐकायला मिळत आहेत. यासोबतच हा व्हायरस भारतातही पोहोचला असून याचे कर्नाटकात याचे दोन रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं सोशल मीडियावर दिली. लागण झालेल्या दोन्ही चिमुकल्याच असून दोघांचं वय १ वर्षांपेक्षा कमी आहे. पण या दोन लहान बाळापैकी कुणीही (International travel) केलेला नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. हा आजार संसर्गजन्यच आहे. ज्या कोविडशी संबंधित कॉमन गोष्टी होत्या, तशाच या आजाराच्या संदर्भात आहेत, ज्यामुळे हा व्हायरस पसरतो, असं म्हटलं जातंय.

तसा हा चीनमधून पसरला आहे, पण सायन्स डायरेक्टच्या माहितीनुसार, या व्हायरसची उत्पत्ती जवळपास ५०० वर्षांपूर्वी चिमणीद्वारे झाली होती. काही लोकांच्या मते हा Common Flu आहे. अमेरिका सरकारच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार २००१ मध्ये याबाबत सर्वात पहिली माहिती मिळाली होती. म्हणजे याचा संसर्ग मानवाला होऊ शकतो, हे समोर आलं होत. पहिल्यांदा २००१ सालीच नेदरलँडमध्ये हा व्हायरस आढळला. याचा संसर्ग सर्वच वयोगटातल्या लोकांना होऊ शकतो. आणि यामुळे रुग्णाला ताप, खोकला, नाक सर्दीने बंद होण, श्वास घ्यायला त्रास होण असे symptoms दिसायला लागतात.

पण तरीही डॉक्टरांच्या मते, हा एक गंभीर आजार नाही. या व्हायरसला तोंड देण्यासाठी देशभरातली रुग्णालये पूर्णपणे सज्ज आहेत. १९५८ सालीही हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला होता. महाराष्ट्रात अद्याप एचएमपीव्ही व्हायरसचा एकही रुग्ण आढळलेला नाही. पण तरीही सर्वांनी खबरदारी घ्यावी आणि सावध रहा, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मुळात हा हंगामी व्हायरस आहे. म्हणजेच थंडीच्या सीजनमध्ये जास्त पसरतो. त्यामुळं श्वसन संसर्ग आणि सर्दीसारखा त्रास होतो. याबाबत वीस वर्षांपासून माहिती उपलब्ध असल्यामुळे कोणालाही तारेवरची कसरत करायची गरज भासली नाही.

मुळात चीनमध्ये या व्हायरसमुळे कोणाचा मृत्यू झाला, अशी बातमी अद्यापतरी आलेली नाही. पण या व्हायरसची लक्षण दिसल्यावर दुर्लक्ष केलं, तर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मुळातच या व्हायरसमुळे भारताला फारसा धोका नाही, असं अनेक तज्ञांचं म्हणण आहे. सध्या चीनमधील लोक मास्क घालून फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र, चीनमध्ये प्रदूषणाची समस्या असल्याने तेथील लोक नेहमीच मास्क घालून फिरतात. त्यामुळे भारतीयांना घाबरण्याचे कारण नाही. एचएमपीव्ही व्हायरस हा अत्यंत साधा आहे. तो अगदी कमी किंवा खूप जास्त वय असलेल्या व्यक्तींनाच होतो. याच कारणाने भारतातल्या दोन लहान चीमुकल्यांमध्ये तो आढळून आला आहे.

पण चीनमध्ये जे लहान मुलांचे फोटो व्हायरल होत आहेत, त्याचं काय? तर चीनमध्ये कोरोनाच्या काळात झिरो कोव्हिड पॉलिसी होती. या काळात जी लहान मुले जन्माला आली, ती फारशी घराबाहेर पडलीच नाहीत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ही मुल घरातच म्हणजे Quarantine होती. मुळात मुलं जन्माला आल्यानंतर सहा महिने आईच दूध पितात. हे दूध बंद झाल्यानंतर पुढची सहा महिने मुलांसाठी महत्त्वाची असतात. या काळात लहान मुलं आजारांचा सामना कसा करावा, हे शिकतात आणि त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती तयार होते.

=============

हे देखील वाचा : Google Map : बायको सोबत भांडण झालं आणि त्याने गूगल मॅप तयार केलं!

=============

मात्र, चीनमध्ये उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. चीनमधील मुलं गेल्या दोन-तीन वर्षांपासून घराबाहेर न पडल्यामुळेच त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती विकसित झालेली नाही. त्यामुळे या मुलांना HMPV व्हायरस झाल्यानंतर to लगेच बरा होत नाहीये. आणि त्यामुळेच त्यांना गंभीर आजार होत आहेत. हा आजार लहान मुलांपासून प्रौढानपर्यंत येण्याची शक्यता खूप कमी आहे. तसच हा आजार कोविडइतका शक्तीशाली नसून तो जगभरात पसरू शकत नाही, असं तज्ञांचं म्हणण आहे.

आता याचे symptoms दिसल्यावर काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊया. साधारण ५ ते १० दिवसांत हा आजार पूर्णपणे बरा होतो. व्यवस्थित विश्रांती व इतर काही अँटीबायोटीक्स घेतली तर व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ शकते. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका, कारण हा आजार कोविडसारखा मुळीच नाही. चीनमध्ये असलेल्या काही भारतीय नागरिकांच्या HMPV संदर्भात व्हिडिओदेखील व्हायरल झाल्या होत्या. त्यात त्यांचं असं म्हणण होत की, चीनमध्ये अशाप्रकारचा कोणताही आजार पसरलेला नाही. हा साधा फ्लू आहे. त्यामुळे आपण भारतीयांनीही याबाबत कुठेही चुकीची माहिती पसरवली जाऊ नये, याचीही काळजी घ्यावी आणि स्वतःची ही  काळजी घ्यावी.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.