Home » HMPV : अमेरिकेला नोरोव्हायरसचा विळखा तर चीनमध्येही नवी महामारी !

HMPV : अमेरिकेला नोरोव्हायरसचा विळखा तर चीनमध्येही नवी महामारी !

by Team Gajawaja
0 comment
HMPV
Share

जगातील दोन महासत्ता सध्या रोगाच्या विळख्यात सापडल्या आहेत. यातील पहिली महासत्ता अमेरिका असून या देशाला नोरोव्हायरसचा विळखा बसला आहे. संसर्गजन्य रोग असलेल्या नोरोव्हायरसचे अनेक रुग्ण अमेरिकेत दिसत आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच या नोरोव्हायरसचे रुग्ण अमेरिकेत वाढू लागले आहेत. हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोज असल्यामुळे काळजी व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे स्वतःला महासत्ता म्हणवून घेणा-या चीनमध्येही एका नव्या महामारीनं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. या विषाणुचे नाव HMPV आहे. कोरोनासारखीच या रोगाचीही लक्षणे आहेत. शिवाय हा रोगही संसर्गजन्य असल्यामुळे चीनमध्ये त्याचा झपाट्यांनं प्रचार होत आहे. या रोगांनी ग्रासलेल्यांची मोठी गर्दी चीनच्या रुग्णालयात झालेली आहे. पण एवढे होऊनही चीननं या सर्वांवर कुठलिही प्रतिक्रीय दिलेली ऩाही तसेच हा रोग किती घातक आहे, याचीही माहिती दिली नसल्यामुळे काही जाणकारांनी चिंता व्यक्त केली आहे. (HMPV)

यात काळजीचे कारण असे की, चीनच्या काही भागात आता मास्क सक्ती करण्यात आली असून या रोगांनी त्रस्त झालेल्या रुग्णांमध्ये मृत्युचे प्रमाण अधिक आहे. अमेरिका आणि चीन या दोन्हीही देशांना सध्या महामारीचा विळखा बसत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेत नोरोव्हायरस या रोगाची प्रकरणे वाढत आहेत. डिसेंबरपासून या विषाणूच्या 90 हून अधिक प्रकरणांची नोंद झाली असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नोरोव्हायरस हा एक रोगामुळे संक्रमण मोठ्या प्रमाणात होऊ शकते, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये नॉरोव्हायरसची प्रकरणे सतत वाढत असल्यानं संपूर्ण देशात या रोगाचा फैलाव झाल्याचा अंदाज आहे. नोरोव्हायरस हा लागण झाल्यावर पोट आणि आतड्यांवर परिणाम करतो. (Latest International News)

या कारणास्तव व्हायरसला गॅस्ट्रोएन्टेरिटिस देखील म्हणतात. या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये उलट्या, जुलाब, पोटदुखी यांसारखी प्राथमिक लक्षणे दिसून येतात. काही रुग्णांना डोकेदुखी आणि सतत थकवा येण्याची समस्या देखील जाणवते. नोरोव्हायरस झालेल्या रुग्णांना दोन ते तीन दिवस याचा त्रास जाणवतो. या रोगाची लक्षणे आठवड्यापर्यंत शरीरामध्ये रहातात. पण वृद्ध, लहान मुले आणि गर्भवती महिलांना हा रोग घातकही ठरु शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेत नोरोव्हायरस पसरत असतांना चीनध्ये अन्य एका रोगानं थैमान घातले आहे. या रोगाचे नाव HMPV असे ठेवण्यात आले आहे. या रोगामुळे जगावर पुन्हा महामारीचे संकट आले असल्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. कारण या रोगामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांनी चीनमधील सर्वच हॉस्पिटले फुल झाली आहेत. गंभीर म्हणजे, चीनच्या स्मशानभूमीमध्येही लांबच लांब रांगा लागल्या आहेत. (HMPV)

चीनमध्ये सध्या मास्क लावलेले नागरिक सर्वत्र दिसून येत आहेत. कोरोना व्हायरसनंतर चीनमध्ये पुन्हा मृत्यूच्या दरात वाढ झाली आहे. तब्बल दीड वर्षांनंतर चीनमध्ये आणखी एक विषाणू आला असून HMPV असे या व्हायरसचे नाव आहे. या विषाणूच्या साथीची भीती चीनमध्ये एवढी वाढली आहे की, हा विषाणू हवेतून चौपट गतीनं पसरत असल्याची बातमी चीनमध्ये पसरली आहे. HMPV ची लक्षणे अगदी कोरोना सारखीच असल्यानं चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊनची तयारी सुरु झाली आहे. चीनमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये या HMPV रोगाची लक्षणे दिसणा-यांसाठी विशेष कक्ष उघडण्यात आले आहेत. येथील सार्वजनिक ठिकाणी पुन्हा बंधने आणण्याबाबत सरकार विचार करत आहे. (Latest International News)

========

हे देखील वाचा : Crime Story : नरभक्षक राजा कोलंदर लोकांना मारून मेंदुच बनवायचा सूप

TAX : स्तनांपासून दाढीपर्यंत जगात लागू केलेले विचित्र TAX!

======

मात्र HMPV रोगाचा प्रसार होत असतांना चीननं कोरोनाप्रमाणे या विषूणाच्या प्रचारालाही जगापासून लपवण्याचा पहिला प्रयत्न सुरु केला आहे. कोरोनाने जगात हाहाकार माजवला आणि असंख्य लोकांचे प्राण घेतले, तेव्हा WHO ने कोरोनाला महामारी म्हणून घोषित केले होते. चीननं योग्यवेळी कोरोना संदर्भात माहिती दिली असती तर एवढी मनुष्यहानी झाली नसती. मात्र आताही चीन तिच चूक करत असल्याचे वैद्यकीय जाणकारांचे म्हणणे आहे. यावेळीही चीनने HMPV विषाणूच्या प्रसाराबाबत मौन बाळगले आहे. सध्या चीनच्या अनेक भागात अघोषित आणीबाणी लागू करण्यात आल्याचे वृत्त आहे. चीनच्या रुग्णालयात लागलेल्या रुग्णांच्या रांगा आणि स्मशानभूमीवर लागलेल्या रांगा पाहून जगाला पुन्हा एकदा आणखी एका महामारीचा तडाखा बसणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. (HMPV)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.