Home » HMPV : चीनच्या व्हायरसचा भारताला किती धोका !

HMPV : चीनच्या व्हायरसचा भारताला किती धोका !

by Team Gajawaja
0 comment
HMPV
Share

चीनमध्ये HMPV या विषाणुनं उद्रेक केला आहे. कोविड-19 नंतर चीनमध्ये पुन्हा एकदा विषाणुनं दहशत निर्माण केली आहे. चीननं यावेळीही या रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्यापासून त्याला लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र चीनची परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर जगभरातील सोशल मिडियामध्ये चीनमधील हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल होऊ लागले. मास्क लावलेले हजारो चीनी नागरिक रुग्णालयामध्ये औषधोपचारासाठी गर्दी करत असल्याचे हो फोटो पाहून जगभर चिंता व्यक्त होऊ लागली. त्यापाठोपाठ चीनमधील स्मशानभूमीमध्ये लागलेल्या रांगा पाहून पुन्हा कोविडसारखी महामारी येणार, अशी शंका व्यक्त होऊ लागली. चीनमधील हा व्हायरस जगातील अनेक देशात पसरल्याच्या बातम्या आल्या. याचवेळी भारतातही या HMPV विषाणु बाधित रुग्णांची नोंद झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. (HMPV)

बेंगळुरू येथील रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलीमध्ये हा विषाणु आढळून आला आहे. त्यासोबत आणखी एका लहान मुलाला या विषाणुची बाधा झाल्याची माहिती आहे. शिवाय गुजरातमध्येही HMPV बाधित रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आल्यामुळे या रोगामुळे कोरोनासारखी परिस्थिती निर्माण होणार का अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या मते HMPV हा सर्दीजन्य आजार आहे. HMPV ची लक्षणे सहसा इतर श्वसन संक्रमणांसारखी असतात. या रोगाला घाबरुन न जाता योग्य प्रकारे काळजी घेणे गरजेचे असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. कोविडमध्ये जी काळजी घेतली होती, तशीच स्वच्छतेची काळजी या HMPV विषाणुच्या बाबत घेणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे. (Latest Updates)

चीनमध्ये HMPV या व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. आता या रोगानं भारतामध्येही प्रवेश केल्यानं खळबळ उडाली आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस विषाणूमुळे चीनमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चीनमध्ये अशाप्रकारे रुग्ण हिवाळ्याच्या ऋतुमध्ये दिसून येतात. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला की चीनमध्ये या रोगाचे रुग्ण दिसून येत होते. मात्र यावर्षी हा आकडा अनेक पटीनं वाढल्यानं चीनमध्ये खळबळ उडाली. आता भारतातील बेंगळुर आणि गुजरातमध्ये या रोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एचएमपीव्ही व्हायरसची लक्षणे जाणून त्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. HMPV चा संसर्ग झाला आहे का, हे कसे ओळखावे, याबाबत आरोग्य खात्यानं काही सूचन दिल्या आहेत. भारतातील आरोग्य विभाग या संदर्भातील सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन आहे. HMPV ची लक्षणे COVID-19 सारखीच आहेत. यावर कोणतेच ठोस औषध नाही. (HMPV)

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस बाधित रुग्णाला सुरुवातीला सामान्य सर्दी होते. HMPV हा एक हंगामी विषाणू मानला जातो. सामान्यपणे हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीस वाढलेला हा रोग नंतर आटोक्यात येतो. 2001 मध्ये पहिल्यांदा या विषाणुची ओळख करण्यात आली तरी 1958 पासून हा विषाणु असल्याची माहिती आहे. सामान्य सर्दीपासून सुरुवात झाल्यावर खोकला, ताप, अनुनासिक रक्तसंचय, श्वास लागणे, घसा खवखवणे अशी या रोगाची लक्षणे आहेत. गंभीर प्रकरणांमध्ये, विशेषत: लहान मुले, वृद्ध किंवा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांमध्ये या संसर्गामुळे ब्रॉन्कायलाइटिस किंवा न्यूमोनिया होण्याची शक्यता आहे. सध्यातरी HMPV साठी कोणतीही लस किंवा अँटीव्हायरल उपचार उपलब्ध नाही. (Latest Updates)

========

हे देखील वाचा : Char Dham : हिवाळी चार धाम यात्रा सुरु !

HMPV व्हायरस भारतात पोहोचला, कोविडसारखी परिस्थिती होणार ?

======

या रोगापासून दूर रहाण्यासाठी वारंवार हात धुणे, आजारी व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळणे, शिंकताना रुमालाचा वापर करणे, नाक, तोड झाकेल असे मास्क वापरणे हे उपाय असल्याचे सांगण्यात येत आहे. या रोगाची काही लक्षणे दिसल्यास किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास वैद्यकीय सल्ला घेण्याचा सल्लाही सरकारतर्फे करण्यात आला आहे. ज्या नागरिकांना सर्दी असेल त्यांनी डॉक्टरी उपाय करणे गरजेचे असून संबंधितांनी आराम करा आणि हायड्रेटेड रहा असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. प्रधान सचिव आणि आरोग्य विभाग आयुक्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग कर्नाटक, हर्ष गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार ‘मुलामध्ये HMPV आढळणे असामान्य नाही. यापूर्वीही आपण अनेक रुग्णांमध्ये एचएमपीव्हीशी संबंधित प्रकरणे पाहिली आहेत. यात काळजी करण्यासारखे काही नाही, घाबरण्यापेक्षा काळजी घेण्याचे आवाहन गुप्त यांनी केले आहे. (HMPV)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.