Home » दुबई, अमेरिकेसह ‘या’ देशांमध्ये हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी हे आहेत कायदे

दुबई, अमेरिकेसह ‘या’ देशांमध्ये हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी हे आहेत कायदे

केंद्र सरकारने हिट अॅण्ड रन प्रकरणातील कायदे कठोर केले आहेत. नव्या कायद्यानुसार चालक हिट अॅण्ड रन प्रकरणात दोषी आढळल्यास त्याला 10 वर्षांचा तुरूंगवास आणि सात लाख रूपयांचा दंड होऊ शकतो. अशातच जगभरात यासंबंधित काय नियम आहेत हे जाणून घेऊयात.

by Team Gajawaja
0 comment
Hit And Run Law
Share

Hit And Run Law :  केंद्र सरकारने हिट अॅन्ड  रन प्रकरणातील कायदे अधिक कठोर केले आहेत. यामधील काही तरतूदींचा विरोध करत ट्रक, टॅक्सी आणि बस चालकांनी संप पुकारला आहे. हिट अॅण्ड रन प्रकरणातील नवा कायदा सर्व वाहन चालकांसाठी लागू होणार आहे. यामुळे या प्रकरणातील व्यक्ती दोषी आढळल्यास त्याला 10 वर्षांचा तुरूंगवास आणि सात लाख रूपयांचा दंड होऊ शकतो. पण तुम्हाला जगातील अन्य ठिकाणी या संबंधित काय आहेत माहितेयत का?

युएई
संयुक्त अरब अमीरात म्हणजेच युएईमध्ये (UAE) कायद्यांबाबत कठोरता आहे. येथे हिट अॅण् रन प्रकरणी कलम 5(1) नुसार, चालकाला गाडी संबंधित कागदपत्रे पोलिसांना द्यावे लागतात. जर घटनास्थळी पोलीस नसतील तर घटनेच्या सहा तासांमध्ये त्या दुर्घटनेची माहिती पोलीस स्थानकात द्यावी लागते. याशिवाय दुर्घटनेची माहिती उशिराने दिल्यास त्यामागील कारण देखील सांगावे लागते.

युएईमध्ये हिट अॅण्ड रन प्रकरणी एखादा व्यक्ती जखमी किंवा त्याचा मृत्यू झाल्यास चालकाला अटक केली जाते. दोषी आढळल्यास त्याला तुरूंगवास किंवा 25 हजार दिरहम म्हणजेच 56 लाख रूपयांहून अधिक दंड ठोठावला जाऊ शकतो. तसेच अल्कोहोल पिऊन गाडी चालवली असल्यास दंडाची रक्कम वाढली जाऊ शकते.

सौदी अरब
सौदी अरबमध्ये वेळोवेळी हिट अॅण्ड रन प्रकरणी मार्गदर्शन सूचना जारी केल्या जातात. येथील कायदा असे सांगतो की, अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास चालकाला चार वर्षांची शिक्षा किंवा 44,44,353 रूपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. सौदी अरबमधील ट्रॅफिक रेग्युलेशन अमेंडमेंट असे म्हणतो की, जर अपघातामुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास आणि त्याला रूग्णालयात दाखल केल्यास दोषी चालकाला दोन वर्षांचा तुरूंगवास आणि 22 हजार रूपयांचा दंड ठोठावला जाईल. (Hit And Run Law)

कॅनडा
कॅनडातील कलम Sec. 252 (1) सांगतो की, एखादा व्यक्ती अपघातात जखमी झाल्यास दोषी चालकाला पाच वर्षांचा तुरूंगवास होईल. याशिवाय अपघातातील व्यक्तीचा मृत्यू ढाल्यास दंड आणि शिक्षेत वाढ केली जाईल. तसेच हिट अॅण्ड रन प्रकरणी चालकाची चूक असेल आणि याची माहिती त्याने संबंधित अधिकाऱ्यांना न दिल्यास त्याला दंडासह दहा वर्षांचा तुरूंगवास होऊ शकतो.

ब्रिटेन
ब्रिटेनध्ये अपघाताप्रकरणी चालक घटनास्थळी आहे किंवा त्याने घटनास्थळावरून पळ काढला आहे, यावरून त्याची शिक्षा ठरवली जाते. दोषीकडून अनलिमिडेट दंड वसूल केला जाऊ शकतो. याशिवाय सहा महिन्यांचा तुरूंगवास देखील होऊ शकतो. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पाच ते दहा पेनल्टी पॉइंट्स ठरवले जातात. यानुसार कमी-अधिक शिक्षा सुनावली जाते.


आणखी वाचा:  कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांना आयलँन्डवर पार्टी करण्यासाठी मागावी लागली होती माफी

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.