प्लास्टिक सर्जरी का नाम सुना है… हा डायलॉग कोणत्या मुव्हीतला आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पण एका मराठी माणसामुळे जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी पार पडली होती असं म्हटलं तर…
१८१५ साली लंडनमधल्या जोसेफ कॉन्स्टन्टीन कार्प्यू या सर्जनकडे एक आर्मी ऑफिसर आला. ८ वर्ष तो काही कारणास्तव पाऱ्याची इंजेक्शन्स घेत होता. पारा म्हणजे मर्क्युरी… ते आपण डॉक्टरांकडे बघितलच असेल ब्लड प्रेशर चेक करतानाच्या वेळी. तर हा ऑफिसर इतके वर्ष इंजेक्शन्स घेत होता आणि त्यामुळे त्याचं नाक गळून पडलं होतं. त्या जागी फक्त हाड दिसत होती. त्यामुळे त्या सर्जनने ट्रिटमेंट सुरु केली. त्याच्या कपाळाची कातडी काढून ती नाकाच्या जागी लावली. त्यावेळी अनेस्थेशिया देत नव्हते… Direct ऑपरेशन सुरु… हे ऑपरेशन जास्त नाही पण फक्त १५ मिनिटंच चाललं. त्याच्या तोंडावर पट्टी वगेरे बांधण्यात आली. तीन दिवसांनी ती पट्टी त्याच्या तोंडावरून काढून टाकली. त्याचे मित्र शॉक… भाई आपल्या मित्राचं नाक परत आलं… आनंदात ते आरडाओरड करू लागले आणि अशी पार पडली जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी…
तर सुरुवातीला मी जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी जिला Rhinoplasty म्हणतात, ती कशी पार पडली, हे मी सांगितलं आणि यात मराठी माणूस नव्हता. तर पहिली गोष्ट म्हणजे ज्याने ही सर्जरी केली होती, तो सर्जन जोसेफ कॉन्स्टन्टीन कार्प्यू याला ही प्लास्टिक सर्जरीची विद्या काय युरोपमध्ये राहून सुचलेली नव्हती. तो काळ होता १७९५ चा… त्यावेळी भारतात ब्रिटिशांनी आपला चांगला जम बसवला होता. याच दरम्यान हा सर्जन जोसेफ कार्प्यू सुद्धा त्यावेळी भारतात आला होता. इथे येऊन त्याने भारतीय वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेदाचा अभ्यास केला होता. आणि त्याला हा अभ्यास का करावासा वाटला, हे बघुया…
तर त्यावेळी दक्षिण महाराष्ट्राच्या भागात एक कोसाजी नावाचा मराठी गाडीवान होता. गाडीवान म्हणजे जे आपापल्या बैलगाडीवर सामान हाकतात ती लोकं… तर हा कोसाजी एकदा टिपू सुलतान आणि ब्रिटीशांमध्ये झालेल्या तिसऱ्या अँग्लो-म्हैसूर युद्धात तो ब्रिटिशांचं सामान वाहून नेण्याचं काम करत होता. याच युद्धादरम्यान तो टिपू सुलतानच्या सैन्याच्या तावडीत सापडला. मग काय त्याचा एक हात कलम केला गेला आणि नाक छाटून टाकलं. नंतर तो ब्रिटीशांकडे आला. ब्रिटीश डॉक्टरांनी त्याच्या हाताला औषधपाणी केलं, जखम भरून आली. त्यांनी म्हटलं नाकाचे उपचार पण आम्हीच करतो.
पण त्याने नाकावर ऑपरेशन करायला साफ नकार दिला. तो म्हणाला की, माझ नाक परत आणण्याचं औषध फक्त पुण्यातच मिळू शकतं. ब्रिटिश लोकांना एवढं सांगून तो कर्नाटकवरून पुण्याला आला. त्यावेळी पुण्यात एक कुमार नावाचा वैद्यक होता. आयुर्वेदीय पद्धतीने ऑपरेशन करण्यात तो चांगलाच फेमस होता. कोसाजी त्याच्याकडे आला. त्या कुमार वैद्याने त्याच्या कपाळावरची चामडी काढून ती नाकाच्या जागेवर लावली. ऑपरेशन पूर्ण झालं आणि काही दिवसातच त्याचं नाक थोडं फार नाकासारखच दिसायला लागलं. तो बरा झाला. पुन्हा ब्रिटिशांकडे गेला तर ब्रिटीश त्याला बघून शॉकच झाले.
==============
हे देखील वाचा : The Lost Bomb : त्या बेटाजवळ अणूबॉम्ब हरवला जो कधीही…
==============
त्याचं असं होतं की, आम्ही तर अशा प्रकारच्या सर्जरीबद्दल ऐकलं होतं, पण त्या सक्सेसफुल होतात, हे पहिल्यांदाच पाहिलं. ते चाटच पडले. तेव्हा ब्रिटिशांनी या ऑपरेशनची सगळी माहिती गोळा केली आणि यासोबत कोसाजीचं एक portrait काढलं आणि ते सगळ इंग्लंडला पाठवलं.. इंग्लंडची लोकंही शॉक… ही गोष्ट इंग्लंडमध्ये वाऱ्यासारखी पसरली. इंग्लंडच्या जेन्टलमन्स मॅगझिनमध्ये ती छापून आली. आणि सर्जन जोसेफ कार्प्यू पर्यंत ही गोष्ट पोहोचली. त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याला राहवलं नाही आणि १७९५ साली तो थेट भारताकडे निघाला.
पुढे जवळपास २० वर्ष त्याने भारतातच पारंपारिक प्लास्टिक सर्जरीवर पूर्ण अभ्यास केला. हे सगळ शिकून घ्यायला त्याने खास कुमार वैद्य यांचीच भेट घेतली होती, असं सांगितलं जातं. पुढे १८१५ साली तो इंग्लंडला परतला आणि त्याच वर्षात त्याने एका सैन्य अधिकाऱ्याची यशस्वी सर्जरी केली. आता भारताकडे ही विद्या कशी आली, हे तर अनेकांना माहितच असेल. प्राचीन काळी भारतात एक महान ऋषी होऊन गेले होते, त्यांचं नाव महर्षी सुश्रुत…त्यांनाच फादर ऑफ प्लास्टिक सर्जरी म्हटलं जातं… त्यांनीच रचलेल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक ऑपरेशन्सचे उल्लेख आहेत. इथूनच पुढे ऑपरेशनची आणि प्लास्टिक सर्जरीची परंपरा भारताच्या काही भागांमध्ये सुरूच होती.
सर्जन जोसेफ कार्प्यू यांनी केलेल्या ऑपरेशनचा लिखित पुरावा कोसाजी या मराठी गाडीवानाच्या पोट्रेटसह आजही लंडनच्या ब्रिटीश म्युझियममध्ये पाहायला मिळतो. तर अशी ही होती ही एका मराठी माणसामुळे जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी झाल्याची स्टोरी !
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics