भारताच्या राजकरणात इफ्तार पार्टीचे खास महत्व आहे. देशातील काही राजकीय नेते मंडळींनी रमजानच्या महिन्यात इफ्तार पार्टी देण्याची परंपरा सुरु केली होती. देशाचे पंतप्रधान ते राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या काळात अशा पार्टीचे आयोजन केले ज्याची नेहमीच चर्चा झाली. तर जाणून घेऊयात भारतीय राजकरणातील इफ्तार पार्टीच्या इतिहासाबद्दल अधिक.(History of Iftar Party)
स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी ७ जंतर-मंतर रोडवर पहिल्यांदा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. असे म्हटले जाते की, यामागील त्यांचा उद्देश हा मुस्लिम विभाजनाच्या दु:खातून वर येण्यासह त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा होता. मात्र लाल बाहदुर शास्री हे जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा ही इफ्तार पार्टी बंद केली. त्यानंतर नेहरु यांची मुलगी इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान झाल्यास तेव्हा त्यांनी पन्हा इफ्ताक पार्टीचे आयोजन केले. असे म्हटले जाते की, हा निर्णय मुस्लिमांना आधार वाटावार म्हणून घेतला होता.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील हेमवती नंदन बहुगुणा यांनी वर्ष १९७४ मध्ये मुख्यमंत्री असताना अधिकृतरुपात इफ्तार पार्टीची सुरुवात केली होती. युपीमधअये पुढे जाऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही परंपरा पुढे सुरु ठेवली गेली. सध्याचे युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात एक सुद्धा इफ्तार पार्टीचे आयोजन केलेले नाही. त्यांनी ही परंपरा मोडत कन्या पूजन केले. यापूर्वी युपीमध्ये खरंतर माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव. राजनाथ सिंह, कल्याण सिंह, मायावती आणि अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी दिली होती.(History of Iftar Party)
भाजप बद्दल बोलायचे झाल्यास त्यांचे प्रमुख नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा दोन वेळा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी त्यावेळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्याची जबाबदारी त्यावेळचे कॅबिनेट मंत्री शाहनवाज हुसैन यांना दिली होती. शाहनवाज यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत याची माहिती दिली होती. भाजपच्या अन्य नेत्यांबद्दल बोलायचे झाल्यास तर पार्टीचे अध्यक्ष राहिलेले मुरली मनोहर जोशी यांनी पक्षाची पहिली अधिकृत इफ्तार पार्टी दिली होती.
हे देखील वाचा- जनतेसाठी खुले होणार शिमला मधील १७३ वर्ष जुने राष्ट्रपती भवन
राष्ट्रपती भवनात सुद्धा इफ्तार पार्टीचे आयोजन केले जायचे. पण जेव्ही एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांनी त्याच्यावर बंदी घातली. ते पदावरुन गेल्यानंतर प्रणब मुखर्जी आणि प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपती भवनात पुन्हा इफ्तार पार्टी देण्याची परंपरा सुरु केली. २००१७ मध्ये राष्ट्रपतीच्या रुपात प्रणब मुखर्जी यांनी जेव्हा आपली अखेरची इफ्तार पार्टी ठेवली होते त्यावेळी मोदी मंत्रीमंडळाचे सर्व सदस्य त्यासाठी गेले नाहीत.