Home » Historical Buildings : भारतातील महिला शासकांनी बांधलेल्या ऐतिहासिक वास्तू

Historical Buildings : भारतातील महिला शासकांनी बांधलेल्या ऐतिहासिक वास्तू

by Jyotsna Kulkarni
0 comment
Historical Buildings
Share

आजवर आपण इतिहासात डोकावले तर अनेक मोठमोठे राजे, महाराजे होऊन गेले. या सर्वच राजांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहासात आपले नाव अजरामर केले. मात्र इथे हे विसरून चालणार नाही, की याच इतिहासात अनेक स्त्रिया देखील शासक म्हणून गादीवर बसल्या आणि त्यांनी देखील आपल्या काळात अनेक महान गोष्टी केल्या. आज जेव्हा आपण एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी जातो तेव्हा ऐकतो की, अमुक गोष्ट या राजाने बांधली, किंवा या राजाच्या कार्यकाळात बांधली गेली. तमुक गोष्ट या राजाने आपल्या जवळच्या व्यक्तीच्या स्मरणार्थ बांधली.(Historical Buildings)

मात्र आज आपण पाहिले तर जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या स्त्रियांनी बांधल्या, किंवा त्यांच्या कार्यकाळात बांधल्या गेल्या. दूर का जायचे आपल्या भारतातच अशा अनेक ऐतिहासिक प्रसिद्ध वास्तू आहेत, ज्या स्त्री राज्यकर्त्यांनी बांधल्या. तुम्ही या वस्तूंची नावे ऐकली असतील, मात्र त्या कोणी बांधल्या याबद्दल माहिती नसेल. मग आज आपण अशाच काही देशातील वस्तूंबद्दल जाणून घेऊ, ज्या स्त्री शासकांनी त्यांच्या काळात बांधल्या. (Marathi Top News)

हुमायू मकबरा, दिल्ली (Humayun’s Tomb)

दिल्लीतील हुमायूंचा मकबरा जगप्रसिद्ध वास्तू आहे. ती पाहण्यासाठी जगभरातून लोकं दिल्लीमध्ये येतात. हे दिल्लीचे प्रसिद्ध स्मारक आहे. असे मानले जाते की हे स्मारक मुघल सम्राट हुमायूनची मुख्य पत्नी बेगा बेगम यांनी बांधले आहे. हे स्मारक १५६५ मध्ये तिने तिच्या दिवंगत पतीला श्रद्धांजली वाहण्यासाठी बांधले होते. हे स्मारक पहिल्यांनंतर इथे असलेले अंडरग्राउंड अर्थात भूमिगत संग्रहालयाल देखील बघण्यासारखे आहे. येथे मुघल सम्राट हुमायूनच्या जीवनावरील ७०० हून अधिक कलाकृती आणि पाच मोठ्या गॅलरी पाहायला मिळतील.(Latest Marathi News)

=========

हे देखील वाचा : Hanuman Jayanti : हनुमान जयंतीचे महत्व आणि माहिती

==========

Historical Buildings

ताज-उल-मसाजिद, भोपाळ (Taj-ul-Masajid)

आशियातील सर्वात मोठी आणि जगातील तिसरी सर्वात मोठी मशीद मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आहे. या मशिदीचे नाव ताज-उल-मसाजिद आहे. ही मशीद कोणत्याही राजाने नाही, तर १९ व्या शतकात भोपाळच्या प्रमुख महिला शासक असणाऱ्या बेगम शाहजहान यांच्या राजवटीत बांधली गेली आहे. या गुलाबी रंगाच्या मशिदीमध्ये दोन पांढरे घुमट असलेले मिनार आहेत, ज्याचा वापर मदरसा म्हणून केला जातो. रिपोर्ट्सनुसार, मशिदीमध्ये १ लाख ७५ हजार नमाज एकाच वेळी नमाज अदा केले जाऊ शकतात.(Top Stories)

Historical Buildings

राणी की वाव, गुजरात (Rani Ki Vav)

भारतातील गुजरात राज्यातील पाटण येथे स्थित ‘राणी की वाव’ ही एक प्रसिद्ध विहीर आहे. ही वास्तू पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक या ठिकाणी येतात. राणी की वाव ही विहीर कोणत्याही राजाने बांधली नसून राणी उदयमतीने तिचा पती राजा भीम यांच्या स्मरणार्थ बांधली होती. राणी की वाव सरस्वती नदीच्या काठावर बांधलेली असून ती दिसायला अतिशय सुंदर आहे. या प्रसिद्ध विहिरीचे चित्र १०० रुपयांच्या नोटेवर देखील आपल्याला पाहायला मिळते. (Historical NEws in Marathi )

Historical Buildings
विरुपाक्ष मंदिर, पट्टडकल कर्नाटक (Shri Virupaksha Temple (Pattadakallu))

आपल्या देशात अनेक अतिशय सुंदर, आकर्षक प्राचीन मंदिरं आहेत. यातलेच एक मंदिर म्हणजे कर्नाटकातील पट्टडकल येथे असलेले विरुपाक्ष मंदिर. हे मंदिर ८ व्या शतकात राणी लोकमहादेवीने त्यांचे पती राजा विक्रमादित्य द्वितीय याने पल्लवांवर केलेल्या विजयाच्या स्मरणार्थ बांधले होते. हे मंदिर चालुक्य स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे आणि आजही ते एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. मुख्य म्हणजे या मंदिराचे नाव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामील करण्यात आले आहे. (Trending News in Marathi )

Historical Buildings

दक्षिणेश्वर मंदिर, कोलकाता (Dakshineswar Kali Temple)

दक्षिणेश्वर मंदिर हे कोलकात्यातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. हुगळी नदीच्या काठावर असलेले हे मंदिर ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. या मंदिरावर भाविकांची मोठी श्रद्धा आहे. या मंदिराची स्थापना १९ व्या शतकात देवी कालीची भक्त असलेल्या राणी रश्मोनी यांनी केली होती. (Social News)

=========

हे देखील वाचा : China : भूकंपाच्या छायेत चीन !

==========

Historical Buildings


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.