रणी निघता शूर न पाहे माघारे… संत तुकोबारायांचा हा अभंग प्रत्येक देशाच्या सैनिकाला तंतोतंत लागू होतो. जपानचा एक सैनिक या अभंगाप्रमाणेच युद्धभूमीवर गेला आणि युद्ध संपलं तरीही तो २९ वर्ष एकटा शत्रूंशी लढत राहिला. कारण त्याला सांगितलं गेलं होतं की, काहीही झालं तरी सरेंडर करायचं नाही, आत्महत्या करायची नाही. आणि मग काय, सैन्याच्या कंमांडरने दिलेल्या या आदेशाचं पालन त्याने युद्ध संपल्यानंतर तब्बल २९ वर्षं केलं. तरीसुद्धा तो सरेंडर झाला नाही. शेवटी, रिटायर झालेल्या त्या आदेश देणाऱ्या कंमांडरला त्या सैनिकाला परत बोलवण्यासाठी जावं लागलं. त्या सैनिकाची पूर्ण स्टोरी जाणून घेऊ. (Hiroo Onoda)
साल १९४४, दुसरं विश्व महायुद्ध जोरात सुरू होतं. जपानने अमेरिकेशी लढण्यासाठी त्यांच्या सैन्याची माहिती गोळा करण्यासाठी २६ डिसेंबर १९४४ रोजी, जपानच्या काही सैनिकांना फिलिपिन्समधील लुबांग बेटावर सोडलं. या जपानी सैनिकांना या बेटावर पाठवण्याआधी त्यांना आदेश देण्यात आले. “काहीही झालं तरी सरेंडर करायचं नाही, आत्महत्या करायची नाही. आम्ही तुम्हाला घ्यायला येऊ १० दिवस, एक वर्ष, पाच वर्ष लागले तरी आम्ही येऊ. तुम्ही लपून रहायचं, आणि शत्रूची माहिती गोळा करत राहायची आणि त्यांच्या हालचालींमध्ये अडथळा आणत राहायचा.”
हा आदेश मनात घेऊन बेटावर उतरलेल्या सैनिकांमध्ये एक २३ वर्षांचा सैनिक होता, नाव हिरू ओनोडा. या बेटावर उरतल्यानंतर हिरू ओनोडा आणि इतर जपानी सैनिक तिथे आधीच असलेल्या दुसऱ्या सैनिक तुकडीला भेटले. ज्यांनी आधीच त्या बेटावर जंगलात बंकर वगैरे बांधले होते. फेब्रुवारी १९४५ मध्ये अमेरिकेने संपूर्ण ताकदीने हल्ला केला आणि बेट ताब्यात घेतलं. जपानी सेनेने अमेरिकन सैन्याशी अधिक काळ लढा देता यावा आणि नुकसान कमी होण्यासाठी लहान-लहान गटांमध्ये विभागणी केली. हिरो ओनोडा आपल्या चार लोकांच्या गटात सर्वात सीनियर होते. त्यांच्या गटातील इतर तीन साथी होते. किंशिची कोझुका, यूची अकाटसु आणि शोईची शिमाडा. अमेरिकेन सैन्याने बेट पिंजायला सुरुवात केली होती. जो जपानी सैनिक दिसेल, त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केलं जात होतं. त्यामुळे अनेक जपानी सैनिक मारले गेले आणि काहींनी सरेंडर केलं.(Hiroo Onoda)
पण हिरू ओनोडा आणि त्यांचे ३ साथीदार जंगलात लपून राहिले. जंगलात लपून त्यांनी अमेरिकन सैन्यावर गनिमी कावा सुरूच ठेवला. ते कधी त्यांच्या सैन्य तुकड्यांवर, कधी त्यांच्या सप्लाई चैनवर हल्ला करत राहिले. काही महिन्यांनी अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ले केले. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४५ रोजी जपानने युद्धातून माघार घेऊन आत्मसमर्पण करण्याची घोषणा केली. काही दिवसांनी दुसरं महायुद्ध समाप्त झालं.
पण याची काहीच कल्पना हिरू ओनोडा आणि त्याच्या साथीदारांना नव्हती. तो काही इंटरनेट स्मार्टफोनचा जमाना नव्हता. त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवणं खूपच कठीण होतं. त्यावेळी जगाच्या अनेक काना कोपऱ्यात पराभूत झालेल्या देशांचे सैनिक आत्मसमर्पण करत नव्हते. अशा सैनिकांमध्ये सर्वाधिक संख्या जपानी सैनिकांची होती. (Hiroo Onoda)
हे सैनिक युद्ध संपल्यानंतर सुद्धा आपल्या देशासाठी लढतच होते. त्या सैनिकांचे अमेरिकेने, जपानने फिलिपिन्सच्या जंगलात हजारो Pamphlets टाकले, ज्यामध्ये युद्ध संपल्याचं घोषित करण्यात आलं होतं. आणि लिहिलं होतं की लपलेल्या सैनिकांनी बाहेर यावं. हिरू ओनाडा आणि त्याच्या साथीदारांना सुद्धा हे Pamphlets मिळाले. पण त्यांना वाटलं की हा अमेरिकेचा डाव आहे. म्हणून ते Pamphlets जाळून हिरो आणि त्यांचे साथीदार लपून हल्ले करत राहिले.
असं होतं पाच वर्षे उलटली तरी सुद्धा हिरू आणि साथीदारांना असं वाटत होतं की युद्ध सुरू आहे. लुबांग बेटावरून बऱ्याच प्रमाणात अमेरिकन सैन्य परतलं होतं. फिलिपिन्सचे स्थानिक लोक त्यांच्या त्यांच्या शेती व्यवसायाच्या कामाला लागले होते. हिरू ओनोडा आणि त्याची टीम युद्धाच्या मोडमध्येच होती. ते फिलिपिन्सच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर स्थानिकांवर हल्ला करून लूटमार करून परत जंगलात लपत होते. वैतागून फिलिपिन्स सरकारने पुन्हा नवीन Pamphlets छापले. त्यामध्ये लिहिलं बाहेर या, युद्ध संपले आहे, तुम्ही हरला आहात.” पण पुन्हा यावर विश्वास न ठेवता हिरो ओनीडा आणि यांच्या टीमने हल्ले सुरूच ठेवले.
युद्ध समाप्तीच्या ७ वर्षांनंतर १९५२ मध्ये, एक अंतिम प्रयत्न केला गेला लपलेले सैनिक बाहेर काढण्याचा. यावेळी, त्या सैनिकांच्या कुटुंबाचे फोटो असलेलं Pamphlets छापले आणि जंगलात टाकले. पण त्याकडे सुद्धा त्या सैनिकांनी दुर्लक्ष केलं. काही वर्षे गेली आणि त्या सैनिकांच्या दहशतीने घाबरलेल्या फिलिपिन्सच्या स्थानिक लोकांनी स्वत: शस्त्र उचलेले. १९५९ पर्यंत, हिरो ओनीडाच्या एका साथीदाराने आत्मसमर्पण केलं, एक जण मरणं पावला. त्यानंतर, एका दशकानंतर, हिरो ओनीडाचा शेवटचा साथीदार स्थानिक पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला.(Hiroo Onoda)
आता दुसरं महायुद्ध संपून २५ वर्षं झाली होती. तरी सुद्धा हिरो ओनीडा यांनी युद्ध संपवलं नव्हतं आणि आत्मसमर्पण केलं नव्हतं. कारण कमांडर कडून युद्ध थांबवण्याचे आदेश मिळाले नाहीत. ते त्या आदेशासोबत आले होते की, आत्मसमर्पण करायचं नाही आणि शत्रूला शक्य तितका जास्त धोका देत राहायचं, ज्यामुळे जपान अमेरिकन हल्ल्यातून सुरक्षित राहील.
===============
हे देखील वाचा : Shalivahan Shake : जाणून घ्या शालिवाहन शके म्हणजे काय?
===============
हिरू ओनीडा, या माणसाने त्या आदेशाचं पालन करत आपलं आर्ध आयुष्य लुबांगच्या जंगलात घालवलं. आता ते पूर्णपणे एकटे होते. पण ते युद्धातून मागे हटायला तयार नव्हते. कशातरी प्रकारे ही बातमी जपान सरकारपर्यंत पोहचली की त्यांचा एक सैनिक अजूनही तिथे आहे. तेव्हा जपानी सरकारने लगेच लुबांगच्या जंगलात शोध मोहीम सुरू केली. खुप दिवसांच्या शोध मोहिमेनंतर हिरू ओनीडा सापडले, पण स्पष्टपणे सांगितलं की त्याला सरेंडर न करण्याचे आदेश मिळाले होते. तो त्या आदेशाचं पालन करतो आहे. शोध मोहिमेवर असलेल्या लोकांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला. हिरू ओनीडा सरेंडर करण्यास नकारच देत राहिले. शेवटी जपानला जाऊन ज्या कमांडरने हिरू ओनीडाला आदेश दिले होते. त्यांना बोलवण्यात आलं जे आत रिटायर झाले होते. ते सुद्धा हे ऐकून आश्चर्यचकित झाले आणि ते हिरू ओनीडा परत आणण्यासाठी फिलीपींसला लुबांगला पोहचले. (Hiroo Onoda)
आणि १९७४ ला अखेर दुसर महायुद्ध संपल्यानंतर २९ वर्षांनी हिरू ओनीडा यांनी सरेंडर केलं. जेव्हा ते लुबांग बेटावर गेले होते तेव्हा ते २३ वर्षांचे होते जेव्हा त्यांनी सरेंडर केलं तेव्हा ते ५२ वर्षांचे होते. त्यांनी फिलीपींसच्या पोलिसां समोर सरेंडर केलं. युद्धांच्या नियमांनुसार त्यांना जपानच्या हवाली सुपूर्द करण्यात आलं. जेव्हा ते जपानला परतले तेव्हा एखाद्या सेलेब्रिटी सारख त्यांचं स्वागत करण्यात आलं. ते जपानचे हीरो बनले होते. पुढे त्यांनी स्वत:च्या आयुष्यावर no surrender : my thirty year war हे पुस्तक लिहिलं, जे बेस्ट सेलर ठरलं. २०१४ साली वयाच्या ९१व्या वर्षी या जपानच्या शूर वीराने अखेरचा श्वास घेतला.