ब्रिटन (Britain), या एकेकाळी भारतावर राज्य केलेल्या देशाचा पंतप्रधान हा आता भारतीय वंशाचा आहे. याशिवाय ब्रिटनमधील अनेक महत्त्वाच्या पदावर भारतीय विराजमान आहेत. तसेच तेथील अनेक उद्योगपतीही भारतीय आहेत. या भारतीयांसाठी गौरवास्पद ठरेल असा एक अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये (Britain) झालेल्या एका ऑनलाईन जनगणनेनुसार तेथील हिंदू हे सर्वाधिक आरोग्यसंपन्न आहेत. हिंदूंमध्ये आरोग्याच्या समस्या या कमी आहेत. तसेच ब्रिटनमध्ये सर्वाधिक घरं ही शिख समाजाची असल्याची माहितीही या अहवालातून पुढे आली आहे. हा अहवाल आल्यावर आपल्या भारतीय आहाराचे पुन्हा एकदा कौतुक सुरु आहे. कारण परदेशात राहून आरोग्यसंपन्न हा किताब जिंकणा-या ब्रिटनमधील (Britain) भारतीयांनी आपल्या पारंपारिक आहाराला अधिक पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

ब्रिटनमध्ये (Britain) नुकतीच राष्ट्रीय जनगणना करण्यात आली. ब्रिटनचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय यांनी ही ऑनलाइन जनगणना केली. यानुसार आलेल्या माहितीच्या आधारे एक अहवाल करण्यात आला आहे. या अहवालात ब्रिटनमधील हिंदू हे सर्वात आरोग्यसंपन्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या या अहवालानुसार जवळपास 87.8 टक्के ब्रिटनमध्ये राहणारे हिंदूंचे आरोग्य उत्तम आहे. ते खूप चांगले आणि चांगले या दोन गटात मोठ्याप्रमाणात आहेत. याशिवाय ब्रिटनमधील (Britain) हिंदूंमध्ये वारंवार आजारी पडण्याचे प्रमाणही कमी आहे. शिवाय अपंग असण्याचे प्रमाणही खूपच कमी अहे. गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या ‘रिलिजन बाय हाउसिंग, हेल्थ, एम्प्लॉयमेंट अँड एज्युकेशन’ या अहवालात ब्रिटनमध्ये राहणा-या विविध धर्माच्या नागरिकांची पाहणी करण्यात आली. त्यांची नोंद करुन राहणीमानाचा अंदाज काढण्यात आला. यामध्ये हिंदू धर्मिय नागरिक सर्वात अव्वल असल्याचे आढळून आले आहेत. तसेच हिंदू धर्मियांचे राहणीमानही कमालीचे सुधारले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून सर्वात निरोगी आणि संपन्न नागरिक म्हणून हिंदू धर्मियांची नोंद करण्यात आली आहे. ब्रिटनचे (Britain) हे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय देशाच्या लोकसंख्येची नोंद करताना विविध पातळ्यांवर माहिती गोळा करते. यामध्ये देशात किती धर्माचे लोक राहतात, त्यांची मालमत्ता, त्यांच्या घरात कोण राहते, त्यांचे शिक्षण, नोकरीचे स्थान, येणारी मिळकत, ब्रिटनमध्ये (Britain) त्यांची किती संपत्ती आहे, यामध्ये जमीन आणि घरं यांचाही नोंद करण्यात येते. तसेच ही मंडळी ब्रिटनमधील सरकारी दवाखान्यात आरोग्याच्या सुविधा घेतात की, अन्य दवाखान्यात आरोग्याची तपासणी करतात, याचीही माहिती या अहवालात घेण्यात येते. ही सर्व माहिती, ब्रिटनच्या (Britain) वास्तविक जनगणनेसाठी उपयुक्त ठरते. गेल्या वर्षी केलेल्या ब्रिटनच्या जनगणनेनुसार येथील मुळ नागरिकांची लोकसंख्या कमी होत असल्याचा धक्कादायक अहवाल जाहीर झाला होता. त्यानंतर ब्रिटन सरकारनं तेथे स्थायिक होणा-या अन्य देशातील नागरिकांवर काही अटीही घातल्या होत्या. लोकसंख्येसाठी विविध उपश्रेण्यांवरील अशी माहिती गोळा करुन जनगणनेचा व्यापक अहवाल प्रसिद्ध होतो. याचा फायदा स्थानिक प्रशासनाला होत आहे.
विशेष म्हणजे, जनगणना सर्वेक्षण संपूर्ण इंग्लंड आणि वेल्समध्ये झाले होते. यात 24 दशलक्षाहून अधिक कुटुंबांनी भाग घेतला. त्या सर्वेक्षणातील माहितीचे विश्लेषण केल्यानंतर ख्रिश्चन नागरिक ब्रिटनमध्ये (Britain) निम्म्या लोकसंख्येपेक्षा कमी झाले झाल्याचेही पुन्हा स्पष्ट झाले आहे. तसेच हिंदू, मुस्लिम आणि शीख नागरिकांमध्ये अल्प प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
=======
हे देखील वाचा : या पंडूलिपीमध्ये दडलंय काय…
=======
ब्रिटनमध्ये (Britain) भारतीयांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. सुमारे 1.4 दशलक्ष भारतीय ब्रिटनमध्ये आहेत. यातील अनेक भारतीय उच्चस्थानावर आहेत. तर काही व्यावसायिक आहेत. बहुसंख्य ब्रिटीश भारतीय पंजाबी, गुजराती, बंगाली आणि मल्याळी वंशाचे आहेत. तमिळ, तेलुगू, कोकणी आणि मराठी समुदायही ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. ब्रिटनचे (Britain) पंतप्रधानही भारतीय वंशाचे आहेत. तर ब्रिटनच्या (Britain) मंत्रीमंडळातील मान्यवर नेते भारतीय आहेत. ब्रिटनमध्ये मिनी पंजाब म्हणून मोठी सोसायटी आहे. येथे फिरल्यावर भारतात फिरत आहोत की काय, इतके भारतीय भेटतात. एकूण हा जनगणनेचा अहवाल आल्यावर चर्चा सुरु झाली आहे, ती भारतीय आहाराची. कारण परदेशात राहूनही आरोग्यसंपन्न असलेल्या भारतीयांच्या मागे भारतीय आहारशास्त्रच आहे, याची जाणीव सर्वांना आहे. शिवाय भारतीय कुठेही गेले तरी ते त्या देशाच्या प्रगतीसाठी सहाय्य करतात आणि शांततेनं राहतात, हेही स्पष्ट झाले आहे.
सई बने