Home » Wedding : नववधू गृहप्रवेश करताना का ओलांडते तांदळाने भरलेले माप?

Wedding : नववधू गृहप्रवेश करताना का ओलांडते तांदळाने भरलेले माप?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Wedding
Share

हिंदू धर्मामध्ये लग्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मात लग्न हा केवळ एक सोहळा नसून तो एक संस्कार आहे. हिंदू धर्मामध्ये विवाह हा १६ विधींपैकी एक आहे, जो अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो. शिवाय या लग्नांमध्ये अनेक प्रकारचे विधी देखील होतात. या सर्व लग्नाआधी, लग्नादरम्यान आणि लग्नानंतर होणाऱ्या विधींना मोठे महत्त्व आहे. प्रत्येक विधी मागे एक मोठा मतितार्थ लपलेला असतो. आजच्या आधुनिक काळात अनेकांना असे मोठे विधियुक्त लग्न करायला फारसे आवडत नाही, मात्र या विधींमागचा अर्थ जर आपण समजून घेतला तर नक्कीच आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. लग्न झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा वधू आपल्या सासरी येते तेव्हा ती घराचा उंबरठा ओलांडताना आधी तांदुळाने भरलेले माप पायाने पडते आणि मग घरात प्रवेश करते. जिथे आपण अन्नाला देवाची उपमा देतो, त्याच अन्नाला पाय लावणे योग्य नाही असे अनेकांना वाटते मात्र असे नाहीये. यामागे देखील एक सुंदर विचार आहे. (Hindu Wedding)

भारतीय संस्कृतीत नववधू लग्नानंतर पहिल्यांदाच सासरच्या घरी प्रवेश करते तेव्हा तिच्या स्वागतासाठी एक विशेष विधी असतो. या विधीमध्ये वधू उजव्या पायाने दाराजवळ ठेवलेले तांदळाने भरलेले माप ओलांडते. अन्नाला पायाने स्पर्श करणे अन्नाचा अपमान होणारे कृत्य आणि अतिशय अशुभ समजले जाते. मग नववधू सासरच्या घरात प्रवेश करताना तांदळाला पायाने स्पर्श करणे कसे योग्य असते? (Marathi)

Wedding

धार्मिक मान्यतेनुसार, लग्नानंतर घरात येणाऱ्या नव्या नवरीला साक्षात देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते. असे सांगितले जाते की, नववधूच्या स्वागतासाठी दारात ठेवलेल्या कलशातील तांदूळ जेव्हा ती तिच्या पावलांनी घरात विखुरते तेव्हा तिचे सासर सदैव सुख, समृद्धीने संपन्न राहते. त्यामुळेच लग्नानंतर हा महत्त्वाचा विधी पार पाडला जातो. परंपरेनुसार, या विधीत तांदूळ आणि भांडे हे समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक मानले गेले आहेत. ज्या घरात नवीन वधू असा माप ओलांडून प्रवेश करते त्या घरात कधीही अन्न, संपत्ती, समृद्धी आणि आनंदाची कमतरता भासत नाही. अशाप्रकारे, तांदळाचे माप ओलांडणे हा केवळ एक विधी नाही तर वधूच्या गृहलक्ष्मी रूपाचा सन्मान करण्याचा आणि समृद्धीच्या आगमनाचे शुभ प्रतीक मानले जाते. (Marathi News)

हिंदू धर्मामध्ये तांदुळाला धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठे महत्त्व देण्यात आले आहे. देवाला अक्षता वाहण्यापासून ते लग्नांत वधूवरावर अक्षता टाकण्यापर्यंत तांदुळाचा मोठा वापर केला जातो. याचे कारण म्हणजे तांदुळ हे एक असे धान्य आहे की जे आतून कधीच किडत नाही, म्हणजेच ते आतून शुद्ध आहे. म्हणून तर शुद्ध चारित्र्याला धुतलेल्या तांदळाची उपमा दिली जाते. तांदूळ हे धान्य एकदल धान्य आहे याचे दोन भाग होत नाहीत किंवा ते दुभंगत नाही. लग्नात जेव्हा वधूवरावर अक्षता टाकल्या जातात यामागे देखील एक सुंदर अर्थ आहे. आयुष्याचा संसार सुद्धा दुभंगू नये ही त्यामागे भावना असते. (Top Trending News)

======

Datta Jayanti : दत्तात्रेय महाराजांनी केले होते २४ गुरु; प्रत्येक गुरूकडून घेतला होता एक गुण

======

तांदूळ पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावावे लागते, तेव्हा ते खरे बहरते. त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे, आणि नंतर ती दुसऱ्याच्या घरी जाते आणि तेथे बहरते. म्हणूनही अक्षता मांगल्यरूपी मानली जाते. असेच मुलीने बहरावे म्हणून अक्षता वापरल्या जातात. तसचं तांदळाला सुखाचे आणि सौभाग्य प्रतिक मानले जाते आणि त्यामुळे नवरा-बायकोवर अक्षता म्हणून तांदूळ टाकले जातात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.