इस्लामिक धर्मात मुहर्रमचे फार महत्व आहे. हा दिवस मुस्लिम बांधव हजरत इमाम हुसैन यांच्या बलिदानाची आठवण म्हणून साजरा केला जातो. ते पैगंबर मुहम्मद यांचे लहान पुत्र होते. यंदाचा वर्षी मुहर्रमची सुरुवात ३१ जुलैपासून झाली आहे. याच्या १० व्या तारखेला यौम-ए-आशूरा असे म्हटले जाते. या दिवशी इमाम हुसैन यांच्या बलिदानाची आठवण करत मुस्लिम समुदायाकडून दु:ख व्यक्त केले जाते. मुस्लिम बांधवांकडून मुहर्रम साजरा केला जातो हे आपण पाहतो. पण बिहार मधील असे एक गाव आहे जेथे हिंदू समुदायातील लोक सुद्धा मुहर्रम साजरा करतात आणि तो साजरा करण्याची परंपरा शंभर वर्षांपासून सुरु आहे.(Hindu celebrate muharram)
बिहार मधील कटिहार जिल्ह्यातील हसनगंज ठिकाण आहे. येथील महमदिया हरिपुर या गावात हिंदू-मुस्लिम समुदायाच्या एकता दिसून येते. येथील हिंदू समुदायातील लोक येथे मुहर्रम गेल्या काही दशकांपासून साजरा करत आले आहेत. यामागे एक कथा सुद्धा आहे. ग्रामस्थ असे सांगतात की, पूर्वजांची वचन पाळत ही परंपरा सुरु आहे. अशी अपेक्षा केली जाते की, येणारी पिढी सुद्धा हिच परंपरा पुढे कायम सुरु ठेवेल.
खरंतर या गावात याआधी वकील मिया नावाचे एक व्यक्ती राहत होते. ते आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर ते गाव सोडून निघून गेले. त्यांनी येथून जाण्यापूर्वी आपला मित्र छेदी याला गावात मुहर्रम साजरा करण्यास सांगितले होते. खरंतर या गावात हिंदू समुदायातील बहुतांश लोक राहतात आणि १२०० लोकसंख्या असलेल्या या गावात वकील मिया हे गेल्यानंतर कोणताही मुस्लिम परिवार येथे राहिला नाही. अशातच त्यांना दिलेले वचन पाळत या गावात हिंदूकडून मुहर्रम साजरा करण्यास सुरुवात झाली.(Hindu celebrate muharram)
हे देखील वाचा- नव्या इस्लामिक कॅलेंडरची सुरुवात मोहर्रम महिन्यापासूनच का होते?
महमदिया हरिपुर गावातील हिंदू समाजातील लोक मुस्लिम बांधवांप्रमाणचे मुहर्रम साजरा करतात. यावेळी मोठ्या संख्येने हिंदू महिला सुद्धा त्यामध्ये सहभागी होतात. त्याचसोबत हिंदू समाजातील लोक समाधीवर चादर चढवतात. इमाम हुसैन यांच्या बलिदानाची आठवण करत घोषणा सुद्धा करतात आणि फतिहाचे सुद्धा वाचन केले जाते. संपूर्ण गावात जुलूस ही काढला जातो. या गावातील लोकांचे असे म्हणणे आहे की, येथे आम्ही सर्व मिळून मिसळून मुहर्रम साजरा करतो. याची चर्चा दूरदूर पर्यंत केली जातो. येथे गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या स्थितीमुळे मोहर्रम अत्यंत साधेपणाने साजरा केला गेला. परंतु यंदा पारंपारिक पद्धतीने तो साजरा केला जाणार आहे.