अदानी ग्रुप संदर्भात एक धमाकेदार रिपोर्ट जारी करणारी अमेरिकेतील शॉर्ट-सेलक कंपनी हिंनबर्ग रिसर्चने अरबो डॉलरची गुंतवणूक करणाऱ्यांच्या पैशांबद्द काही खुलासे केले. आता पुन्हा एक नवा रिपोर्ट ते घेऊन आले आहेत. कोणतीही माहिती न देता शॉर्ट-सेलर यांनी असे म्हटले की, नवा रिपोर्ट एक मोठा रिपोर्ट आहे. लवकरच जारी केला जाईल. यामुळे आता असा प्रश्न उपस्थितीत होत आहे की, हिंडनबर्ग अदानी नंतर आता कोणाचा खुलासा करणार? (Hindenburg Report)
अशातच आता हिंडनबर्ग रिसर्चने टेक्नॉलॉजी फर्म ब्लॉक इंक यांना निशाण्यावर धरले आहे. याबद्दल एक रिपोर्ट ही जारी करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये आरोप असा लावण्यात आला आहे की, ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सी यांच्या नेतृत्वाखालील मोबाईल पेमेंट कंपनी ब्लॉक इंकने बनावट पद्धतीने आपल्या युजर्सची संख्या वाढवली. त्याचसोबत कंपनीने नव्या ग्राहकांना जोडण्यासाठीचा खर्च हा फार कमी करुन सांगितला आहे. या बातमीनंतर आता अमेरिकेतील बाजारात हंगामा झाला आहे. ब्लॉक इंकचे शेअर्स २० टक्क्यांनी खाली कोसळले आहेत.
सप्टेंबर २०२२ मध्ये हिंडनबर्ग रिपोर्ट जारी केल्यानंतर स्टॉक मार्केट खाली कोसळल्याने गौतम अदानी यांची संपत्ती १५० अरब डॉलरवरुन ५३ अरब डॉलर झाली होती. त्यांना फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीतील टॉप ३५ च्या लिस्टमधून बाहेर केले होते. यामुळे अदानी ग्रुपला जवळजवळ १२० अरब डॉलर पेक्षा अधिक नुकसान सहन करावे लागले होते. वाढत्या कर्जाबद्दल चिंता वाढण्याव्यतिरिक्त २४ जानेवारीला हिंडनबर्ग रिसर्च स्टडीने ऑफशोर टॅक्स हेवन आणि स्टॉत हेरफेरचा बेकायदेशीर वापर करण्याचा सल्ला दिला होता. (Hindenburg Report)
गुजरातच्या टाइकून आणि त्यांच्या ग्रुपवर निशाणा साधल्यानंतर आता हिंडनबर्ग रिपोर्टने आणखी एक मोठा खुलासा करण्याचे संकेत दिले आहेत. २३ मार्चने हिंडनबर्ग यांनी एक ट्विट केले. त्यात एक नवा रिपोर्ट लवकरच आणि एक मोठा रिपोर्ट असे म्हटले होते.
हे देखील वाचा- डोनाल्ड ट्रंप यांच्यावर आरोप लावणारी डेनियल्स कोण?
हिंडनरबर्गच्या ट्विटनंतर. तर विरोधकांनी आपले संपूर्ण लक्ष हे अदानी ग्रुप आणि नरेंद्र मोदी सरकारयांच्या मध्ये कथित संबंधावर केंद्रित केले होते. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी फेब्रुवारीत दावा केला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंडनबर्ग-अदानी वादाबद्दलच्या प्रश्नांवर उत्तर देण्यास नकार दिला होता.