Home » अदानीनंतर ‘या’ कंपनीसंदर्भात हिंडनबर्गने जारी केला रिपोर्ट

अदानीनंतर ‘या’ कंपनीसंदर्भात हिंडनबर्गने जारी केला रिपोर्ट

२०२३ च्या सुरुवातीला शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्गच्या एका रिपोर्टमुळे अदानी ग्रुपचे शेअर मोठ्या प्रमाणात खाली कोसळले गेले होते.

by Team Gajawaja
0 comment
Hindenburg report
Share

२०२३ च्या सुरुवातीला शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्गच्या एका रिपोर्टमुळे अदानी ग्रुपचे शेअर मोठ्या प्रमाणात खाली कोसळले गेले होते. जवळजवळ 20-30 टक्क्यांनी ते शेअर्स खाली आले होते. भले ही अदानी ग्रुपने त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचे खंडन केले होते. मात्र तेव्हा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला होता. मात्र हिंडनबर्गचा रिपोर्ट केवळ अदानीच नव्हे तर त्याने अन्य काही प्रसिद्ध कंपन्यांचे सुद्धा काही रिपोर्ट्स जारी केले होते. अशातच पुन्हा एकदा हिंनडबर्गने आणखी एका कंपनीच्या विरोधात रिपोर्ट जारी केला आहे. (Hindenburg report)

हिंडनबर्ग रिसर्चने यंदाच्या वर्षी अदानी ग्रुपसह कंपन्यांच्या विरोधात रिपोर्ट सादर केले. त्यामध्ये कार्ल इकान आणि जॅक डोर्सी सारख्या व्यक्तींची नावे होती. आपल्या आताच्या ताज्या रिपोर्टमध्ये हिंडनबर्गने कजाकिस्तान मधील रिटेल ब्रोकरेज फर्म, फ्रीडम होल्डिंह कॉर्पवर आपल्या नव्या रिपोर्टमध्ये फसवणूकीचे आरोप लावले आहेत.

कजाकिस्तान स्थित रिटेल ब्रोकरेज फर्म, फ्रीडम होल्डिंग कॉर्पवर असा आरोप लावण्यात आला आहे की, ती कंपनी रशियात बिझनेस करते, जे खरंतर त्यांच्या नियमांच्या विरोधात आहे. कंपनीचा रेवेन्यू चुकीचा आहे आणि त्यांनी लोकांचा पैसा जोखिम असणाऱ्या बाजारात लावला आहे. फ्रीडम फायनान्स रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर कथित रुपात रशिया-आधारित ग्राहकांना आपल्या सेवा देण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय नियमांपासून बचाव करत आहे. हा रिपोर्ट आल्यानंतर दोन दिवसात कंपनीचा मार्केट कॅप ३४.२ करोड डॉलरने कोसळला आहे.

अदानी ग्रुपला बसला होता मोठा फटका
हिंडनबर्ग रिसर्चने २४ जानेवारीला जारी केलेल्या आपल्या रिपोर्टमध्ये अदानी ग्रुपच्या शेअरच्या किंमतीसह छेडछेडा केल्यासंदर्भात काही गंभीर आरोप लावले होते. त्यानंतर ग्रुपच्या सर्व कंपन्यांचे शेअर कोसळले गेले होते. परिस्थिती अशी सुद्धा झाली होती की, गौतम अदानी यांना काही कंपन्यांमधील आपली भागीदारी विक्री करावी लागली. हिंडनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टमुळे अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये फार मोठा चढ-उतार झाल्याने मार्केट कॅप १९.२ लाख कोटींनी कमी होत १० लाख कोटी रुपयांवर पोहचला होता. (Hindenburg report)

जॅक डॉर्सीसह या कंपन्यासुद्धा टार्गेटवर
अदानी समूहाच्या नंतर हिंडनबर्ग रिसर्चने ट्विटरचे फाउंडर जॅक डोर्सी यांना निशाणा केले होते. हिंडनबर्गने २३ मार्चला डॉर्सी यांच्या मोबाईल पेमेंट कंपनी ब्लॉक संदर्भात एक रिपोर्ट जारी केला होता. त्यात कंपनीवर ग्राहक आणि सरकारला फसवल्याचे म्हटले होते. या रिपोर्टनंतर कंपनीचा मार्केट कॅप ८.७ अरब डॉलरने खाली कोसळला होता.

हेही वाचा- पाकिस्तानातील असे हुकूमशाह जे नेहमीच भारताविरोधात कट रचायचे

अदानी समूह आणि जॅक डॉर्सी यांच्या कंपनीवर रिपोर्ट जारी केल्यानंतर हिंडनबर्गने अमेरिकेतील अरबपती इनवेस्टर कार्ल इकान आणि नाइजेरियनची अॅग्री फिनटेक ग्रुप टिंगोला आपला रिपोर्ट जारी केला. या रिपोर्टमध्ये लावण्यात आलेल्या आरोपांनंतर दोन्ही कंपन्यांचे मार्केट कॅप ५० टक्क्यांनी कोसळले गेले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.