हिंडनबर्गच्या एका रिसर्च रिपोर्टने भारतातील शेअर मार्केट आणि अदानी ग्रुपची स्थिती खराब केली आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी आणि शुक्रवारी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होत जगातील तिसऱ्या क्रमांकावर असलेले सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती हे सातव्या क्रमांकावर येऊन पोहचले आहेत. या रिपोर्टने दोन दिवसामध्ये सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या कंपन्यांचे ४ लाख १० हजार कोटींहून अधिक नुकसान झाले. या रिपोर्ट्समुळे अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स ही खाली कोसळले गेले.(Hindenburg Report)
अदानी ग्रुपचे शेअर्स आणि त्यामध्ये झालेली घट
शुक्रवारी बंद झालेल्या मार्केटमध्ये अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅल, अदानी ट्रांन्समिशन शेअरमध्ये २० टक्के घट झाली. या व्यतिरिक्त अदानी एंटरप्राइजेस १८ टक्के, अंबुजा सीमेंट १६ टक्के, अदानी पोर्ट्स १४ टक्के, एसीसी १२ टक्के, अदानी विल्मार व अदानी पॉवर ५-५ टक्क्यांनी घट होत बंद झाला.
हिंडनबर्ग रिसर्च काय आहे?
हिंडनबर्ग रिसर्च ही एक अमेरिकेतील गुंतवणूक कंपनी आहे. जी Nathan Anderson या एका व्यावसायिकाने सुरु केली होती. याची स्थापना २०१७ मध्ये झाली होती. कंपनी दावा करते की, ते फॉरेंसिक फाइनेंशियल रिसर्चमध्ये एक्सपर्ट आहे. त्यांच्याकडे काही दशकांचा अनुभव ही आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, ही कंपनी असामान्य सुत्रांकडून मिळालेल्या माहितीवर तपास करते, जे शोधणे अत्यंत कठीण असते. कंपनीची सुरुवात याआधी त्यांनी Harry Markopolos यांच्यासोबत ही काम केले होते. ज्यांनी Barine Madoff च्या पोंजी स्किमचा पर्दाफाश केला होता.
हिंडनबर्गच्या रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले आहे की, जगातील तिसऱ्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असलेल्या अदानी यांनी कशा प्रकारे कॉर्पोरेट इंडस्ट्रीची सर्वाधिक मोठी फसवणूक कशी केली आहे. रिपोर्टमध्ये अदानी ग्रुपवर फसवणूक करुन कंपन्यांचे मार्केट वॅल्यूला मॅनिप्युलेट करण्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. तर लावण्यात आलेले आरोप नक्की कोणते आहेत ते पाहूयात.
-अदानी ग्रुपच्या कंपन्यांनी शेअर्सच्या किंमती मॅनिप्युलेट केल्या आणि अकाउंटिग फ्रॉड केला आहे.
-अदानी ग्रुपने परदेशात काही कंपन्या निर्माण करत टॅक्स बचतीचे काम केले आहे.
-मॉरिशस आणि कॅरेबियन बेटावर टॅक्स हॅवन देशात काही बनावट कंपन्या आहेत. ज्यांचा अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये हिस्सेदारी आहे.
-अदानी यांच्या लिस्टेड कंपन्यांवर फार मोठे कर्ज सुद्धा आहे. ज्यांनी संपूर्ण ग्रुपला एका अस्थिर आर्थिक स्थितीत टाकले आहे.
-उच्च मुल्यांकनाच्या कारणास्व कंपनीच्या शेअर्सच्या किंमती ८५ टक्क्यांपर्यंत अधिक सांगितल्या जात आहेत. (Hindenburg Report)
हे देखील वाचा- फरार क्रिप्टोक्वीन रुजा, FBI च्या हातूनही निसटली
हिंडनबर्ग कंपनीने लावलेल्या आरोपांमुळे अवघ्या दोन दिवसातच अदानी ग्रुपला फार मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. यामुळे अदानी ग्रुपवर काय परिणाम झाले ते पाहूयात.
-२५ जानेवारी ते २७ जानेवारी दरम्यान दोन दिवसातच अदानी ग्रुपच्या मार्केट कॅपिटलाइजेशनमध्े ४ लाख १० हजार कोटींचे नुकसान झाले. २५ जानेवारीला मार्केट कॅप जवळजवळ साडे १९ लाख रुपये होता. जो कमी होऊन साडे १५ लाख कोटी रुपये झाला. म्हणजेच २५ टक्क्यांनी घट झाली.
-अदानी एंटरप्राइजेज लिमिटेडचा २० हजार कोटी रुपयांचा फॉलो-ऑन पब्लिक ऑफ म्हणजेच एफपीओ शुक्रवारी उघडला. याची प्राइस बँन्ड ३११२ ते ३२७६ रुपये प्रति शेअर ठरला होता. मात्र रिपोर्ट्सच्या परिणामामुळे यापूर्वी केवळ १ टक्केच सब्सक्राइब झाला होता.
-फोर्ब्सच्या लिस्टमध्ये अदानी ग्रुपचे मालक गौतम अदानी तिसऱ्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर आले. २५ जानेवारीला त्यांचे नेटवर्थ ९ लाख ७१ हजार ५०० कोटी रुपये होते. जे २७ जानेवारीला ७ लाख ८६ हजार ४०० कोटी रुपये झाले. म्हणजेच ४८ तासांमध्ये १ लाख ८५ हजार कोटी रुपये पाण्यात बुडाले.