Home » अटालांटिक समुद्र हिरवा तर हिंद महासागर निळा का दिसतो?

अटालांटिक समुद्र हिरवा तर हिंद महासागर निळा का दिसतो?

by Team Gajawaja
0 comment
Ocean
Share

सर्वसामान्यपणे पाण्याचा कोणताही रंग नसतो पण ते दूर पाहिल्यास आपल्याला ते निळ्या रंगाचे दिसते. समुद्र (Ocean)असो किंवा नदी पाण्याचा रंग हा निळाच असतो पण काही ठिकाणी हा रंग हिरवा सुद्धा दिसतो. जगातील दोन मोठे महासागरांच्या रंगांबद्दल बोलायचे झाल्यास त्यांची स्थिती सुद्धा अशीच आहे. अटलांटिक म्हणजेच प्रशांत महासागराचा रंग हा हिरवा तर हिंद महासागराचा रंग निळ्या रंगाचा दिसतो. पण असे का असेल तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात यामागील रहस्यमय कारण

जगात तीन प्रमुख महासागर आहेत. अटलांटिक, प्रशांत आणि हिंद महासागर. काही लोक आर्कटिक आणि अंटार्कटिक समुद्रांना सुद्धा महासागराच्या श्रेणीत ठेवतात. पण वास्तविक रुपात आर्कटिक सागर प्रशांत महासागरचाच एक भाग आहे. तर अंटार्कटिक दुसऱ्या समुद्रांच्या दक्षणि भागांपासून मिळून तयार झाला आहे. अटलांटिक महासागर जगातील सर्वाधिक मोठा महासागर आहे. तर मध्यसागर युरोप आणि अफ्रिकेला अमेरिकेपासून वेगळे करतो. ते दिसताना एकमेकांना चिकटलेल्या ग्लास सारखे दिसता. अफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या परसलेल्या काही भागांमुळे काही ठिकाणी याची रुंदी कमी दिसते. तसे हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रशांतपेक्षा अर्धा आहे.

रंगांमुळे सहज ओळखता येतात हे दोन्ही महासागर
हिंद महासागर आणि अटलांटिक महासागराला त्यांच्या रंगामुळे लगेच ओळखता येते. त्यांचा निळा आणि हिरवा रंग वेगवेगळा असल्याचे लगेच दिसून येते. त्याचसोबत हे दोन्ही महासागर एकत्रित मिळत असले तरीही त्यांचे रंग वेगळेच दिसतात. तर हिंद महासागर हा जगातील सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकावरील मोठा समुद्र आहे. पृथ्वीतलावर असलेल्या पाण्याचा जवळजवळ २० टक्के भाग हा यामध्ये आहे. उत्तरात हा भारतीय उपमहाद्वीप ते पश्चिम मध्ये पूर्व अफ्रिका, पूर्वेला हिंन्दचीन, सुंदा द्वीप समूह आणि ऑस्ट्रेलियाने घेरलेला आहे. जगात केवळ एकच महासागर आहे ज्याचे नाव हिंदुस्तानाच्या नावावर आहे. प्राचीन ग्रंथात त्याला रत्नाकर असे म्हटले आहे.

हे देखील वाचा- वास्तुकलेचा अद्भुत अनुभव! दिवसा शुभ्र दिसणारे हे मंदिर संध्याकाळी दिसते वेगवेगळ्या रंगछटांमध्ये…

Ocean
Ocean

दोन्ही महासागरांची (Ocean) खासियत अशी की त्यांचा रंग. खरंतर सूर्याचा प्रकाश जेव्हा या महासागराच्या पाण्यावर पडतो तेव्हा त्यात असलेले सप्तरंग हे पाण्यावर अधिक दिसतात आणि त्यामुळे पाणी सुद्धा त्याच रंगाचे दिसते. परंतु महासागरच्या पाण्यात कोणते पदार्थ मिसळले गेलेत यावरुन सुद्धा ठरविले जाते की, पाण्याचा रंग कसा असेल. सामान्य रुपात सर्व समुद्र आण नद्यांच्या पाण्यावर सूर्यप्रकाश पडतो तेव्हा पाणी निळेशार दिसते आणि परावर्तित होते. यासाठी आपल्याला पाण्याचा रंग हा निळा दिसते.

तर अटलांटिक महासागराबद्दल एक तथ्य आहे. त्याच्या लाटांवर अधिक हिरवी झाड आहेत. ही झाड नष्ट झाल्याने समुद्राच्या पाण्यात एक पिवळ्या रंगाचा पदार्थ मिसळतो. जेव्हा सूर्य प्रकाश या समुद्राच्या पाण्यावर पडतो तेव्हा पाण्याचा रंग हा निळा आणि पिवळा असा दिसतो. निळ्या आणि पिवळ्या रंगाचे एकत्रित येणे आपल्या डोळ्यांना हिरवे दिसते. याच कारणामुळे अटलांटिक महासागर हा हिरव्या रंगाचा दिसतो. पण पिवळ्या रंगाचे पदार्थ हे मध्यसागरात आढळत नाहीत. त्यामुळेच त्याचे पाणी हे फक्त निळ्याच रंगाचे दिसते. त्यामुळे जो कोणीही या महासागरांचे पाणी प्रथमदर्शी पाहिल तो हा कोणता महासागर आणि तो कोणता महासागर असल्याचे लगेच सांगेल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.