Home » पर्वतांचा राजा आहे हे गिधाड, काबुल ते भूतानवर ठेवतो नजर

पर्वतांचा राजा आहे हे गिधाड, काबुल ते भूतानवर ठेवतो नजर

by Team Gajawaja
0 comment
Himalayan Vulture
Share

कानपूर मध्ये मिळालेल्या गिधाडाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अत्यंत दुर्लभ प्रजातिचा हा गिधाड ईदगादच्या एका स्मशानभूमीत आढळून आला आहे. सध्या त्याला पशू चिकित्सकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. कानपूरमध्ये तो भेटणे शक्य आहे कारण त्याला पर्वतांचा राजा असे म्हटले जाते. काबुल ते तिब्बेट आणि भूतान पर्यंतच्या पर्वतांमध्ये तो असतो. खास गोष्ट अशी की, तो कधीच स्वत:हून शिकार करत नाही तर मृत जनावरांनाच तो आपले भोजन बनवतो. (Himalayan Vulture)

दुर्मिळ आहे गिधाडाच्या हिमालयन गिफ्रॉनची प्रजाति
कानपुरमध्ये मिळालेला हिमालनय गिफ्रॉन ही एक गिधाडाची प्रजाति आहे. ते मुख्यत्वे पर्वतरांगांच्या क्षेत्रांमध्ये आढळून येतात. त्यांची चोच पिवळ्या रंगाची असते आणि शरिर सफेद रंगाचे असते. त्यांना एक लहान शेपटी सुद्धा असते. हे दुर्मिळ असल्याने त्यांना IUCN ने रेड सूचीत दाखल केले आहे.

१० वर्षांचा आहे कानपुरमध्ये मिळालेला गिधाड
कानपुर मध्ये मिळालेल्या गिधाडाला १५ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. डॉ. नासिर जैदी यांनी असे सांगितले की, हिमालयन गिधाडांना अन्य पक्षांपासून वेगळे ठेवले आहे. त्यांना मीटचा खिमा दिला जातो. क्वारंटीनचा काळ पूर्ण झाल्यानंतर त्याला सोडून दिले जाणार आहे. कानपूरमध्ये मिळालेला गिधाड हा १० वर्षांचा आहे. त्यांचे अधिकाधिक वय ३५ वर्ष असते. त्यांचे वजन ७ ते १२ किलो पर्यंत असते. तर एका दिवसात एक ते दीड किलो मांस खाऊ शकतात.

Himalayan Vulture
Himalayan Vulture

शिकार करत नाहीत हे गिधाडं
हिमालयन गिफ्रॉन गिधाड १२०० ते ५ हजार मीटर उंचीवर राहतात. ते सकाळच्या वेळेसच अधिक सक्रीय असतात आणि ते कधीच शिकार करत नाहीत. ते मैदानी क्षेत्रात मिळणे आश्चर्याची गोष्ट आहे. (Himalayan Vulture)

भारतात गिधाडांच्या ९ प्रजाति आढळतात
भारतात गिधाडांच्या ९ प्रजाति आढळून येतात.त्यामध्ये ओरिएंटल व्हाइट बॅक्स, लांग बिल्ड, स्लेंडर बिल्ड, हिमालयन गिफ्रॉन, रेडहेडेड, मिस्र, दाढी असणारे, सिनेरियस आणि युरेशियन गिफ्रॉनचा समावेश आहे. यामधील बहुतांश प्रजाति विलुप्त होण्याचा धोका आहे. खास गोष्ट अशी की, यामध्ये दाढी असणारे, लांब चोच, पातळ चोच, ओरिएंटल सफेद पाठ असणारे वन्यजीवन संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची-१ मध्ये संरक्षित आहेत. अन्य अनुसूची ४ च्या अंतर्गत संरक्षित आहेत.

हे देखील वाचा- झाडाल्या टांगलेल्या मृत बाहुल्यांची वस्ती, रात्र होताच बोलू लागतात

भारतात सुरु आहेत प्रयत्न
नुकत्याच राष्ट्रीय वन्य जीव बोर्डाने गिधाडांच्या संरक्षणासाठी गिधाड संरक्षण कार्य योजना २०२०-२०२५ साठी मंजूरी दिली आहे. या अंतर्गत गुरांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांवर गिधाडांसाठी विष बनणाऱ्या औषधांवर औषध नियंत्रकांनी बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश, त्रिपुरा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू येथे गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्रे स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.