इराण हा कट्टरपंथीयांचा देश म्हणून ओळखला जातो. या देशात महिलांसाठी अत्यंत कडक नियम आहेत. विद्यमान इस्लामिक दंड संहितेनुसार येथे हिजाब न घातल्यास महिलांना दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा आहे. अर्थात संबंधित महिलेला हिजाब न घातल्यास आणि सार्वजनिक जागी डोक्यावरचे संपूर्ण केस झाकले न जातील, असा पोशाख घातल्यास १५ वर्षांपर्यंतही तुरुंगवास भोगावा लागू शकतो. इराणच्या या कायद्याविरोधात अनेक महिलांना आंदोलने केली, मात्र इस्लामिक रिपब्लिकन देशात ही आंदोलने कुठलिही दया न दाखवता संपण्यात आली. आत अनेक तरुणींचा बळी गेला, काहींना भर रस्त्यावर फासावर लटकवण्यात आले. पण याच कट्टर इराणचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे. त्यासाठी कारणीभूत ठरला आहे, वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ. जेव्हा इराणच्या महिला आपल्या सार्वजनिक हक्कासाठी आणि हिजाब बंदीच्या कडक कायद्याविरोधात लढा देत होत्या, त्याचवेळी इस्लामिक रिपब्लिकच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या अली शामखानी यांच्या मुलीचे शाही लग्न एका अलिशान हॉटेलमध्ये होत होते. (Iran)

हे अली शामखानी हे महाशय सर्वोच्च नेते खामोनी यांचे सर्वात जवळचे आणि विश्वासू आहेत. हेच अली शामखानी हिजाब सक्ती आणि हिजाब न घालणण्या-या महिलांना शिक्षा देण्यासाठी आग्रही असतात. या अली शामखानी महाशयांच्या मुलीच्या लग्नाचा व्हिडिओ समोर आल्यावर संपूर्ण इराणमध्ये संताप व्यक्त होत आहे. कारण जे अली महिलांना हिजाब घालण्याची सक्ती करतात, त्यांचीच मुलगी लग्नामध्ये स्ट्रेपलेस डिझायनर ड्रेसमध्ये दिसली. अली यांनी आपल्या मुलीला लग्नाच्या स्थळापर्यंत नेले. तेव्हा तिचे हात उघडे होते, शिवाय डिप नेकचा तिचा ड्रेस अंगाला चिटकला होता. सर्वसामान्य इराणी तरुणींना सार्वजनिक जागी फक्त केस दिसले की ठार मारण्याचे आदेश देणारे अली शामखानी आपल्या मुलीचे पाश्चात्य पेहरवातही कौतुक करतांना व्हिडिओमध्ये दिसल्यावर संपूर्ण इराणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. (International news)
इराणमध्ये सध्या महिला स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्याला कारण ठरले आहे, फातेमेह अली शामखानी हिच्या लग्नाचे. वर्षापूर्वी फातेमेहचे लग्न झाले, त्यात ती स्ट्रेपलेस ड्रेसमध्ये वावरत होती. ज्या इराणमध्ये महिलांना केस दाखवल्याबद्दल मारहाण केली जाते तिथे फातेमेहवर मात्र कौतुकाचा वर्षाव होत होता. १७ ऑक्टोबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आलेला हा व्हिडिओ काही तासांतच व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये, स्वतः अली शामखानी त्यांच्या मुलीला हॉटेलमध्ये घेऊन जाताना दिसत आहेत. इथे इऱाणचे सर्व सत्ताधारी आणि मान्यवर उपस्थित होते. त्यांनी टाळ्या वाजवून फातेमेहचे स्वागत केले. यावरून इराणी नेते स्वतः पाश्चिमात्य जीवनशैली स्विकारत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळेच इराणच्या जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. (Iran)
कठोर इस्लामिक नियम आणि हिजाब कायदा या देशात आहेत. पण याच देशातील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे जवळचे सहकारी अली शामखानी यांच्या मुलीने पाश्चात्य शैलीचा लग्नाचा गाऊन परिधान केल्यामुळे इराणी राजवटीविरुद्ध ढोंगीपणा उघड झाला आहे. ज्या व्हिडिओमधून हा सर्व प्रकार उघड झाला तो व्हिडिओ २०२४ मध्ये तेहरानमधील एस्पिनास पॅलेस हॉटेलमध्ये झालेल्या फातेमेह शामखानीच्या लग्नातला आहेत. लग्नात फातेमेह स्ट्रॅपलेस पांढरा गाऊन आणि पारदर्शक जाळीचा दुपट्टा घातला आहे. अर्थात केवळ मुलगीच नाही तर शामखानीची पत्नी देखील हिजाबशिवाय निळ्या लेस गाऊनमध्ये या व्हिडिओमध्ये दिसली. याशिवाय इराणच्या अनेक अधिकारी, राजकारणी आणि उद्योजकांच्या बायका हिजाबशिवाय दिसत आहेत. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये जे नेते दिसत आहेत त्यांनीच इराणमध्ये हिजाबचा कायदा अधिक कडक करण्याची वकीली केली आहे. (International news)

इथे अली शामखानी कोण आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, अली शामखानी हे तेच व्यक्ती आहेत, ज्यांनी इराणमध्ये महिलांवर हिजाब कायदा लागू करण्याचे आणि निदर्शकांवर कारवाई करण्याचे नेतृत्व केले होते. अली शामखानी हे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या खूप जवळचे आहेत. ते सध्या राष्ट्रीय संरक्षण परिषदेत खामेनी यांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. यापूर्वी, त्यांनी १० वर्षे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून काम केले आहे. अली शामखानी हे माजी संरक्षण मंत्री आणि क्रांतिकारी रक्षकांचे नौदल कमांडर देखील होते. ते अमेरिकेसोबतच्या अणुकराराच्या वाटाघाटींमध्येही सहभागी होते. २०२२ मध्ये, महसा अमिनी नावाच्या मुलीचा हिजाबवरून मृत्यू झाला. त्यावेळी देशभरातील महिला हिजाबविरोधी चळवळीत रस्त्यावर उतरल्या, तेव्हा हेच अली शामखानी इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रमुख होते. त्यांनी ही निदर्शने दडपण्याचे आदेश दिले. यावेळी अनेक महिलांना मारहाण देखील कऱण्यात आली. (Iran)
इराणमध्ये, प्रत्येक महिलेला, मग ती इराणी नागरिक असो वा परदेशी पर्यटक, सार्वजनिक ठिकाणी तिचे डोके झाकणे बंधनकारक आहे. महिलांनी त्यांचे केस दुपट्टा किंवा स्कार्फने झाकले पाहिजेत आणि शरीर झाकण्यासाठी सैल कपडे घालावेत हा कायदा आहे. हा कायदा १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर लागू झाला. १९८३ मध्ये, संसदेने अधिकृतपणे हिजाब न घालण्याबद्दल दंड निश्चित करणारा कायदा मंजूर केला आहे. सार्वजनिक ठिकाणी हिजाब न घालणाऱ्या महिलांना दंड, अटक किंवा तुरुंगवास भोगावा लागतो. त्याच इराणमध्ये नेत्यांच्या मुली मात्र पाश्चात्य पेहरावात दिसल्यामुळे खळबळ उडाली आहे. (International news)
=======
हे देखील वाचा :
Donald Trump : नो किंग्ज….ट्रम्प विरोधकांचे नवे शस्त्र !
======
इराणमधील बहुतेक लोक आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत आहेत. अनेक तरुण इतके गरीब आहेत की, त्यांना लग्न करणेही परवडत नाही. अशात अनेकवेळा लग्नसमारंभात इऱाणचे पोलीस धाड टाकून महिलांनी हिजाब घातला आहे का, याची पाहणी करतात. आणि ज्या महिलांनी हिजाब घातला नसेल, त्यांच्याकडून दंड वसूल करतात. अशा देशात शामखानी कुटुंबाने लग्न समारंभावर केलेल्या वारेमाप खर्चाबद्दल आणि फातेमेह शामखानीने घातलेल्या पोशाखाबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. (Iran)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
