Home » High Heels घालत असाल तर तुम्ही वेदनेला देतायत आमंत्रण, वेळीच घ्या काळजी

High Heels घालत असाल तर तुम्ही वेदनेला देतायत आमंत्रण, वेळीच घ्या काळजी

by Team Gajawaja
0 comment
High Heels
Share

बहुतांश महिला आपण स्टाइलिस्ट आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी हाय हिल्स (High Heels) घालणे पसंद करतात. यापूर्वी फक्त मॉडेल आणि अभिनेत्र्या हाय हिल्स घालायच्या पण सध्याच्या काळात प्रत्येकाकडून त्याचा वापर केला जात आहे. हाय हिल्स तुमचे व्यक्तिमत्व वाढवतातच. हाय हिल्स घातल्याने महिलांची उंची वाढल्यासारखी वाटतेच पण सुंदर दिसण्यासाठी पार्टी, शॉपिंग किंवा ऑफिसमध्येपण हिल्स घालणे पसंद करतात. परंतु तास तासभर हिल्स घातल्यानंतर ते काढल्यानंतर पाय दुखू लागतात. मात्र तुम्ही सुद्धा हाय हिल्स घालत असाल तर काही गोष्टींकडे वेळीच लक्ष द्या. अन्यथा तुम्हीच वेदनेला आमंत्रण द्याल.

पायांवर सातत्याने दबाव पडल्याने समस्या अधिक वाढू शकते. कारण तुम्हाला माहिती नसेल हाय हिल्स घालून पाय दुखण्याची समस्या दिवसागणिक वाढू लागल्यास सर्जरी सुद्धा वेळ पडल्यास करावी लागते. त्यामुळे हाय हिल्स घालण्याची आवड असेल तर काही गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.

-पाय दुखतात
तास् न तास हाय हिल्स घातल्यामुळे तुमची कंबर आणि पाठ दुखण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये खेचल्यासारखे ही वाटते. या व्यतिरिक्त टाचाही भयंकर दुखण्याची शक्यता असते

High Heels
High Heels

-गुघडे दुखू शकतात
हाय हिल्स घातल्याने तुमच्या पाठीच्या कण्यावर दबाव पडतो. त्याचा थेट परिणाम गुडघ्यांवर होऊ लागतो. सातत्याने हाय हिल्स घालत्याने गुडघ्यांमध्ये वेदना होण्याची समस्या सुरु होऊ शकते.

हे देखील वाचा- डबल चिनच्या समस्येला ‘या’ व्यायामाने करा गुडबाय!

-फ्रॅक्चरचा धोका वाढू शकतो
तज्ञांच्या मते, नेहमीच हाय हिल्स (High Heels) घातल्याने तुमच्या पायांच्या हाडांवर, कंबरेवर किंवा हिप्सवर त्याचा प्रभाव होते. त्याचसोबत तुमचे पॉश्चर सुद्धा खराब होते. हाय हिल्स घातल्याने हाडांमध्ये फ्रॅक्चरचा धोका वाढण्याची संभावना असते.

-पाठीच्या कण्यावर परिणाम होण्याची शक्यता
हाय हिल्स घातल्याने आपण सुंदर जरी दिसत असू तरीही त्याचा थेट परिणाम तुमच्या पाठीच्या कण्यावर ही होतो. कारण पायांवर सात्याने दबाव पडण्यासह पाठीचा कणा ही आपल्याला ताठ ठेवूनच चालावे लागते. अशातच तुम्ही ज्या वेळी बसता तेव्हा तुम्हाला थोडे रिलॅक्स वाटते. मात्र पुन्हा जेव्हा उठता आणि चालू लागता तेव्हा पाठीचा कणा हा हलका हलका दुखू लागतो.

मात्र हाय हिल्स जरी घालायचे असतील तरीही पायांची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. हाय हिल्स असेल तर त्यामधील कुशन हे मऊ असावे. जेणेकरुन तुमच्या टाचांवर त्याचा अधिक परिणाम होणार नाही. काही वेळेस चप्पल घातल्याने तुमच्या पायांवर त्याचे वळ उटतात. हेच वळ तुम्हाला नंतर त्रास देऊ शकतात. त्यामुळे ज्या वेळी तुम्ही हाय हिल्स किंवा कोणत्याही चप्पल घेण्याचा विचार कराल त्यात तुम्ही कंन्फर्टेबल आहात का ते पहा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.