कोलेस्ट्रॉल हा आपल्या शरिरातील एक महत्वपूर्ण पदार्थ असतो. कोलेस्ट्रॉलचा सामान्य स्तर 200 mg/dL पेक्षा कमी मानला जातो. याचे प्रमाण सामान्य ते अधिक झाल्यास तर हार्ट अटॅक, स्ट्रोकसह अन्य काही जीवघेणी स्थिती निर्माण होऊ शकते. प्रत्येक वर्षी हाय-कोलेस्ट्रॉलच्या कारणास्तव काही लोकांनी आपला जीव गमावला आहे. आजच्या काळात कोलेस्ट्रॉल हा महारोगासारखा पसरत चालला आहे आणि सर्व वयोगटातील लोकांना होतोय. याच कारणास्तव लोकांनी सावध राहणे फार गरजेचे आहे.(High cholesterol symptoms)
आता प्रश्न निर्माण होतो की, कोलेस्ट्रॉलची समस्या वेगाने का वाढत आहे. यामागील कारणं असे की, कोलेस्ट्रॉलची लक्षण ही सुरुवातीला कळून येत नाही आणि जेव्हा गंभीर स्थिती निर्माण होते तेव्हा कळते. काही लोक याबद्दल निष्काळजीपणा ही करतात. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणे अत्यंत मु्श्किलीचे काम नाही. लहान-लहान गोष्टींकडे लक्ष दिल्यानंतर तुम्ही तो अगदी सहज नियंत्रणात ठेवू शकता. कोलेस्ट्रॉल वाढण्यामागील सर्वाधिक मोठे कारण अयोग्य लाइफस्टाइल आणि अनहेल्दी डाएट.
कोलेस्ट्रॉलची लक्षण दिसत नाहीत
मायो क्लिनिकच्या रिपोर्टनुसार, कोलेस्ट्रॉल वाढल्याची कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. याच कारणास्तव सुरुवातीला हाय कोलेस्ट्रॉलबद्दल कळणे मु्श्किल होते. जेव्हा तो मर्यादेपेक्षा अधिक वाढतो तेव्हा तो झाल्याचे कळते. लक्षण दिसत नसल्यामुळेच त्याला साइलेंट किलर असे म्हटले जाते. कारण ते नकळत वाढतो आणि व्यक्तीचा जीव घेऊ शकतो. याचे निदान रक्ताची चाचणी करुन करु शकतो. या समस्येपासून बचाव करण्यासाठी लोकांनी वेळोवेळी आपली रक्ताची चाचणी करणे गरजेचे आहे. (High cholesterol symptoms)
तर इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, मेथीच्या पानांमध्ये काही पोषक तत्वे असतात. त्याचसोबत रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्याची क्षमता असते. यामध्ये फॉलिक अॅसिड, राइबोफ्लेविन, कॅल्शिअम, लोहन, कॉपर, पोटेशियम, मॅग्नेशियम, विटामिन ए,बी, बी६ सारखी तत्व भरपूर प्रमाणात असतात.
हे देखील वाचा- तुमच्या मुलाचे वेगाने वजन वाढत असेल तर ‘या’ टीप्स जरुर फॉलो करा
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात कसा ठेवाल?
-प्रत्येक दिवशी ३० मिनिट फिजिकल अॅक्टिव्हिटी करा
-हेल्दी डाएट खा आणि जंक फूड पासून दूर रहा
-स्मोकिंग आणि अल्कोहोल पासून दूर रहा
-आपले वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा
-वेळोवेळी आपली रक्ताची चाचणी करुन घ्या