Home » Heropanti 2 Trailer: टायगर श्रॉफ पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, नवाजुद्दीन विलनच्या भूमिकेत

Heropanti 2 Trailer: टायगर श्रॉफ पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, नवाजुद्दीन विलनच्या भूमिकेत

by Team Gajawaja
0 comment
Heropanti 2 Trailer Tiger Shroff again in action mode, playing the role of Nawazuddin villain in info
Share

‘हिरोपंती’ (Heropanti) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) पुन्हा एकदा हीरोपंती चित्रपटासाठी पडद्यावर सज्ज झाला आहे. ‘हिरोपंती 2’ (Heropanti 2) या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांना त्याची एक झलक पाहण्याची उत्सुकता होती आणि अखेर त्यांची प्रतीक्षा संपली कारण चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकीची (Nawazuddin Siddiqui) व्यक्तिरेखा खूपच रोमांचक दिसत आहे. त्यासोबतच टायगर पुन्हा एकदा एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे, तारा सुतारियाची (Tara Sutaria) ॲक्टिग प्रभावी आहे. 3 मिनिटे 20 सेकंदाचा हा ट्रेलर मनोरंजन मसालाने भरलेला आहे.

नवाजची दमदार भूमिका

चाहत्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज 17 मार्च रोजी ‘हिरोपंती 2’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील लैलाची भूमिका साकारणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीच्या जबरदस्त अभिनयाने ट्रेलरची सुरुवात होते. या चित्रपटात नवाज एका मोठ्या गँगस्टरच्या भूमिकेत आहे, ज्याला पोलीस जगभर शोधतात, पण अपयश आल्यानंतर बबलू म्हणजेच टायगरला शोधण्याचे काम दिले जाते.

टायगरचे डायलॉग्स खूपच इंटरेस्टिंग आहेत. त्याच वेळी, या चित्रपटात त्याची प्रेमिका तारा सुतारियाची थोडीशी झलक आहे, परंतु लोकांना तिचा अभिनय आवडेल. टायगरच्या डान्सची काही झलक चित्रपटात पाहायला मिळाली आहे. तसेच चित्रपटाचे संगीतही भरभरुन साथ देतात. काही मिनिटांच्या ट्रेलरमध्ये ॲक्शन, इमोशन, प्रेम यांची झलक दाखवण्यात आली आहे.

====

हे देखील वाचा: ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट ‘शर्माजी नमकीन’चा ट्रेलर पदर्शित, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

====

टायगरचा हिरोपंती ईदला येणार भेटीला

हा चित्रपट टायगर श्रॉफच्या 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या हिरोपंती या डेब्यू चित्रपटाचा सिक्वेल आहे, ज्यामधून टायगरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यावेळी तारा सुतारिया चित्रपटात दिसत आहे. तर क्रिती सेनन पहिल्या भागात या चित्रपटाची हिरोइन होती. साजिद नाडियादवाला निर्मित ‘हीरोपंती 2’ हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजेच 29 एप्रिल 2022 रोजी चित्रपटगृहामध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे.

चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवरही प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, OTT प्लॅटफॉर्म Amazon ने Heropanti 2 चे पोस्ट थिएटर राइट्स विकत घेतले आहेत.

====

हे देखील वाचा: द काश्मीर फाईल्सः काश्मिरी पंडीतांच्या वेदनेची वादग्रस्त कथा…

====

अहमद खानने केले चित्रपटाचे दिग्दर्शन

अहमद खान यांनी या रोमँटिक ॲक्शन चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अहमद खानने यापूर्वी ‘बागी 2’ आणि ‘बागी 3’ मध्ये टायगरचे दिग्दर्शन केले आहे. टायगर श्रॉफ, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तारा सुतारिया यांच्याशिवाय या चित्रपटात अमृता सिंग महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपटात संगीत ए आर रहमानचे आहे, तर चित्रपटाची कथा रजत अरोरा यांनी लिहिली आहे. मात्र, चित्रपटाचा ट्रेलर खूपच रंजक दिसत असल्याने संपूर्ण चित्रपट तितकाच रंजक आहे की नाही हे पाहावे लागेल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.