प्राचीन इजिप्तमधील ग्रीसमधील टॉलेमिक राजवंशाची राणी क्लियोपात्रा (Cleopatra) ही आजच्या काळातही तेवढीच लोकप्रिय आहे. इजिप्तच्या या राणीचा उल्लेख जगातील सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये केला जातोच, शिवाय क्लिओपात्रा ही दैवी सौदर्यांचीही राणी होती. या सौदर्यासोबत तिला प्रचंड विद्वतेचेही वरदान होते. सौदर्य आणि हुशारी या दोघांच्या बळावर तिनं प्राचिन इजिप्तवर राज्य केलं. प्राचीन इजिप्तवर राज्य करणारी ती शेवटची महिला फारो होती. याच क्लिओपात्राचा मृत्यू कसा झाला आणि तिचा मृतदेह नेमका कुठे आहे, यावर आजही संशोधन सुरु आहे.
काहींच्या मते क्लिओपात्रानं (Cleopatra) स्वतःचा पराभव दिसू लागल्यावर विषारी सापांच्या विषानं आत्महत्या केली. तर काहींच्या मते क्लिओपात्राचा खून करण्यात आला. हे कोडे उलगडण्यासाठी अनेक संशोधक प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्या हाती कधीच यश आले नाही, त्याचे कारण म्हणजे, क्लिओपात्राची कबर नेमकी कुठे आहे, याचाच शोध अद्याप लागलेला नाही. मात्र आता एवढ्या मोठ्या शोधानंतर इजिप्तच्या रहस्यमय राणीची कबर मिळाल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. क्लिओपात्राची कबर सापडली असून त्यातील अस्थिंचे परिक्षण करुन तिच्या मृत्युचे कोडे सोडविणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
इजिप्शियन राणी क्लिओपात्राची कबर मिळाल्याची बातमी पुढे आली आहे. क्लियोपात्रा ही इजिप्तची प्रभावी राणी होती. तिच्या अकाली मृत्यूनंतर तिची कबर नेमकी कुठे आहे, हे गुप्त ठेवण्यात आलं. परिणामी क्लियोपात्रा आणि तिचा मृत्यू हे कोडं कधीही सुटलं नाही. पण अलिकडे तिच्या कबरीचा शोध लागला असून क्लियोपात्राच्या आयुष्यावर नव्यानं प्रकाश टाकला जाईल, असी चर्चा आहे.
इजिप्तचे पुरातन वास्तूंचे माजी राज्यमंत्री झाही हवास यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. झाही हवास हे स्वतः इजिप्तच्या राणीचे अस्तित्व शोधण्यासाठी उत्खनन तज्ञ कॅथलीन मार्टिनेझसोबत 11 वर्षापासून काम करीत आहेत. अलेक्झांड्रियाच्या पश्चिमेला असलेल्या तपोसिरिस मॅग्ना नावाच्या मंदिर परिसरात यासंदर्भात मोठी शोध मोहीम चालू आहे. त्यातच एक कबर मिळाली असून ती इजिप्तची सम्राज्ञी क्लियोपात्राची असल्याची माहिती आहे.
मार्टिनेझ हे एक पुरातत्वशास्त्रज्ञ, असून ते 2005 पासून क्लियोपात्राच्या (Cleopatra) कबरीचा शोध घेत आहेत. गेल्या वर्षापासून त्यांची ही मोहीम अधिक वेगानं होऊ लागली. त्यात तापोसिरिस मॅग्ना येथे त्यांना 4,281 फूट लांबीचा बोगदा मिळाला. या बोगद्याला काळजीपूर्वकरित्या पुन्हा साफ करण्यात आल्यावर त्यातून आश्चर्यरित्या माहिती पुढे आली आहे. तसेच हा बोगदा जिथे संपतो, तिथेच क्लियोपात्रा आणि तिचे पती मार्क अँटोनी यांच्या कबरी असल्याचा संशय आहे. आता या सर्व जागेला नव्यानं खोदण्यात येत आहे.
क्लियोपात्रा (Cleopatra) हे नाव इजिप्तच्या इतिहासात कायम आदरानं घेण्यात येते. काहींच्या मते क्लियोपात्राचा मृत्यू हा विषाच्या प्रयोगानं झाला होता, तिच्या मृत्यूची बातमी बाहेरच्या जगाला कळू नये म्हणून तिचा मृतदेह लगेच ती रहात असलेल्या राजवाड्याच्या बाजुलाच पुरण्यात आला. आता तो सर्व भाग पाण्याखाली गेला असून क्लियोपात्राचे अवशेष मिळण्याची कुठलीही आशा नाही.
=============
हे देखील वाचा : भारताला धमकी देणारा पन्नू आहे तरी कोण ?
=============
मात्र मार्टिनेझ यांच्या शोधामुळे पुन्हा क्लिओपात्रा (Cleopatra) जिवंत झाली आहे. क्लियोपात्रानं इजिप्तवर 51 BC ते 30 BC पर्यंत राज्य केले. रोमन सम्राट ऑगस्टसने आक्रमण केल्यावर क्लियोपात्राचा रहस्यमयी मृत्यू झाला. काहींच्या मते क्लिओपात्रानं प्राणघातक कोब्रा साप चावून घेत आत्महत्या केली होती. दुसर्या सिद्धांतानुसार, तिनं विषारी चाकूनं आपल्या शरीरावर वार करुन घेतले. त्यातच तिचा मृत्यू झाला.
ती स्वतःला इजिप्शियन देवी, इसिसचा अवतार मानत असे. तत्कालीन इजिप्तच्या राजघराण्याच्या प्रथेनुसार तिचा विवाह तिच्याच भावाबरोबर झाला होता. त्यामुळे राजघराण्यातील वारसा हक्कांचे वाद होऊ नयेत, हा उद्देश होता. क्लिओपात्रा (Cleopatra) सर्व भावांडात कतृत्ववान होती. तिनं, रोमन सेनापती ज्युलियस सीझरशी संपर्क स्थापित केला आणि इजिप्तच्या सिंहासनावर आपली पकड मजबूत केली. तिला सिगिरियन नावाचा मुलगा झाला. तिचे सौदर्य दैवी होते. अवघ्या 34 व्या वर्षी क्लिओपात्राचा मृत्यू झाला तरी ती कायम काव्य, नाटक, चित्रपट आणि कथा, कादंब-यातून जिवंत राहिली आहे. आताही याच क्लिओपात्राची कबर मिळाल्याची बातमी आल्यावर तिच्या चाहत्यांनी या जागी गर्दी केली आहे.
सई बने