Hemis Festival : भारताच्या हिमालयाच्या कुशीत वसलेले एक लहान आणि सुंदर प्रदेश म्हणजे लद्दाख. हा प्रदेश आपल्या निसर्गासह संस्कृतिसाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. लद्दाखला प्रत्येक वर्षी लाखोच्या संख्येने पर्यटक भेट देतात. येथील खाण्यापिण्यापासून ते पोषाख परिधान करण्याची पद्धत वेगळी आहे. अशातच लद्दाखमधील हेमिस फेस्टिव्हलला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
हेमिस फेस्टिव्हल प्रत्येक वर्षी तिब्बेटीयन धर्मातील चंद्र मास त्से-चू-के च्या दहाव्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हेमिस उत्सव दोन दिवस असतो. हा उत्सव बुद्ध धर्माचे गुरु पद्मसंभव यांच्या जयंतीचे प्रतीक आहे. या सणासाठी हेमिस मठाला विविध रंगी कपडे आणि फुलांनी सजवले जाते.
लद्दाखमधील स्थानिक नागरिक आपल्या पारंपारिक पोषाखात हेमिस मठात एकत्रित जमतात. चेहऱ्यावर मुखवटे, ढोल, झांजच्या तालावर ठेका धरतात. याशिवाय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. या दिवशी मठाचे लामा खास पोषाख परिधान करतात.
लद्दाखला मिनी तिब्बेट असे म्हटले जाते. भारतात बुद्ध धर्म मानणारे बहुतांशजण याच क्षेत्रात राहतात. याच कारणास्तव हेमिस सण लद्दाखमधील सर्वाधिक मोठा आणि महत्वपूर्ण सण आहे. हेमिस सणावेळी देश-विदेशातून पर्यटक बुद्ध धर्माबद्दल अगदी जवळून जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. हेमिस सण लद्दाखचा इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि मनोरंजनाचे मिश्रण आहे. सण बुद्ध धर्माचे संत पद्मसंभव यांच्या जयंतीच्या रुपात साजरा केला जातो. संत पद्मसंभव यांना तिब्बेटमध्ये गुरु रिनपोछे नावाने ओखळले जाते. जे बुद्ध धर्माचे आध्यात्मिक गुरु होते. असे मानले जाते की, त्यांनी 8व्या शतकात लद्दाखला वाईट आत्मांपासून वाचवले होते. हेमिस सण लद्दाखमधील वाईटावर चांगल्याचा विजयच्या रुपात साजरा केला जातो. (Hemis Festival)
हेमिस फेस्टिव्हलची तयारी
लद्दाखचे नागरिक हेमिस फेस्टिव्हलच्या काही आठवड्यापासून त्याची तयारी सुरु करतात. यावेळी सादर केली जाणारी नृत्ये यांचा सराव केला जातो. हेमिस मठ सजवले जाते. सणासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात. सणावेळी संपूर्ण हेमिस गोम्पा शहर उत्सवाचा आनंद लुटताना दिसतो.