प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की, आपल्या मुलाचे उत्तम पालनपोषण झाले पाहिजे. शिक्षण ते करियर पर्यंतच्या प्रवासात त्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. त्यासाठी हवी ती तडजोड करण्यास आई-वडिल तयार असतात. पण तुम्ही मुलासाठी ऐवढं सगळं करताना एखादी चुक तर करत नाहीयं ना? म्हणजेच तुम्ही मुलाला ओव्हर प्रोटेक्शन तर देत नाहीयं ना? मुलांच्या काळजीपोटी त्यांना प्रोटेक्शन देणे योग्य आहे. परंतु त्याचा अतिपणा केला तर विरुद्ध परिणाम मुलांवर होऊ शकतो. (Helicopter Parenting)
हेलिकॉप्टर पेरेंटिग म्हणजे नक्की काय?
काही आई-वडिल मुलांवर ऐवढं प्रेम करतात की, त्यांना काहीच गोष्टी करायला देत नाही. त्यांना ऐकटे बाहेर सोडत नाही, गार्डनला पाठवण्यासाठी घाबरतात, लहान-मोठं सामान आणण्यासाठी न पाठवणे अशा काही गोष्टी करतात. हे सर्व तुमच्या काळजीपोटी जरी असले तरी अशा प्रकारच्या हेलिकॉप्टर पेरेटिंगच्या नादात आपणच मुलामध्ये स्वत:हून काही निर्णय घेण्याची क्षमता कमी करतो.
ओव्हर प्रोटेक्शनच्या नादात कधीकधी त्यांच्याशी कठोर ही वागले जाते. याचा सुद्धा विरुद्ध परिणाम मुलावर होतो. अशी मुलं योग्य वयात आत्मनिर्भर होत नाहीत अशातच त्यांना भविष्यात काही समस्यांचा सामना करतात. मुलं स्वत:ला कमजोर समजू लागतात. ते आयुष्यात येणाऱ्या समस्यांना स्वत:हून हँन्डल करु शकत नाहीत.
हेलिकॉप्टर पेरेंटिगचे नुकसान
लक्षात ठेवा जेव्हा मुलं पडल्यानंतर पुन्हा उठून चालायला शिकत नाही तर तोपर्यंत ते काही गोष्टी करु शकत नाहीत. हिच गोष्ट पालनपोषणावर ही लागू होते. जर पालक मुलांना ओव्हर प्रोटेक्ट करत असतील तर मुलं कधीच आत्मनिर्भर होऊ शकत नाही. ते आपल्यावर ओढावलेल्या संकटांना हँन्डल करु शकत नाहीत. ते अधिकच अशा स्थितीत घाबरतात. अशी मुलं दुसऱ्यांना आपल्या मनातील काही गोष्टी खुलेपणाने सांगत नाहीत. त्यांना नेहमीच आपण अपयशी होऊ याची भीती वाटत असते. अशा मुलांचे मित्र ही फार होत नाहीत. ते इंट्रोवर्ट होऊ शकतात. कोणाशी ही अधिक बोलत नाहीत. त्यामुळेच त्यांना पुढे जाऊन नोकरी मिळवताना सुद्धा समस्या उद्भवतात. (Helicopter Parenting)
हेही वाचा- मुलांना शिकवा ‘या’ सवयी, आरोग्य राहिल सुदृढ
पालकांनी कुठे समतोल राखला पाहिजे?
हे तर खरं आहे की, पालकांपेक्षा अधिक प्रेम मुलांवर कोणीही करु शकत नाही. मात्र याच नादात मुलांचे आयुष्य हायजॅक करु नये. आयुष्यात समतोल राखणे फार महत्वाचे आहे. यासाठी सर्वाधिक महत्वाचे म्हणजे मुलांना एका वयानंतर ऐकटे सोडले पाहिजे. त्यांना स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ द्यावेत. जेव्हा त्यांना योग्य-अयोग्य काय हे कळेल तेव्हा ते काही गोष्टी करण्यापासून दूर राहू शकतात. परंतु पालकांनी यावर ही लक्ष द्यावे की, त्यांची संगत कशी आहे. घराबाहेरील लहान-मोठी काम करण्याची सवय त्यांना लावा. यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढला जाईल.