Home » उन्हाळ्यात पायांना भेगा पडतायत? करा हे घरगुती उपाय

उन्हाळ्यात पायांना भेगा पडतायत? करा हे घरगुती उपाय

उन्हाळ्यात पायांना भेगा पडल्याने बहुतांशजण त्रस्त होतात. अशातच पायांच्या भेगा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता.

by Team Gajawaja
0 comment
Heel Cracking Remedies
Share

Heel Cracking Remedies : पायांना भेगा पडण्याची सर्वाधिक समस्या हिवाळ्यात सुरू होते. पण कडक उन्हामुळेही काही जणांच्या पायांना भेगा पडतात. अशातच पायात चप्पल घातल्यानंतर पायाच्या भेगा स्पष्टपणे दिसून आल्यानंतर आपलीच आपल्याला लाज वाटते. याशिवाय पायांची चमकही भेगांमुळे कमी होते. या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही पुढील काही उपाय करू शकता.

घरगुती उपाय काय कराल?
-उन्हाळ्यात पायांना भेगा पडण्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी कोरफडीचे जेल लावू शकता. कारण यामध्ये अँटी इंफ्लेमेंटरी आणि मॉइश्चराइजिंग गुण असतात.
-तुम्ही पायांच्या भेगांना मधही लावू शकता. मधामुळे त्वचा नरम होते.
-केळ मॅश करून पायांच्या भेगांना 15 मिनिटे लावून ठेवल्यास पाय मऊ होतात आणि भेगांची समस्या कमी होते.
-याशिवाय दह्याचा वापरही करता येतो. दह्यात लॅक्टिक अॅसिड असते जे डेड स्किन दूर करण्यास मदत करते. (Heel Cracking Remedies)

Heel Cracking Remedies

Heel Cracking Remedies

पायांना भेगा पडल्यास अशी घ्या काळजी
पायांना भेगा पडल्यास दिवसातून दोनदा मॉइश्चराइजर लावा. रात्री झोपण्याआधी पेट्रोलिअम जेली लावून त्यावर मोजे घाला. याशिवाय पायांच्या भेगांवर नारळाचे तेल, ऑलिव्ह ऑइल, बटर अशा काही नैसर्गिक मॉइश्चराइजरचा वापर करू शकता. या उपायांनी पायांना पडलेल्या भेगा दूर होऊ शकतात.

(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)


आणखी वाचा :
सनस्क्रिन लावल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात, जाणून घ्या अप्लाय करण्याची योग्य पद्धत
पांढरे केस होतील काळे, केवळ या टिप्स करा फॉलो
चेहऱ्यावरील हायपिग्मेंटेशनच्या समस्येवर करा ‘हा’ उपाय, उजळेल त्वचा

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.