Heath Care Tips : हाय कोलेस्ट्रॉल अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये शरिरातील वसा अत्याधिक प्रमाणात वाढला जातो. परिणामी हाय कोलेस्ट्रॉल जीवघेणाही कधीकधी ठरू शकतो. याशिवाय हृदयासंबंधित समस्या दसे की, हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोकचा धोका वाढला जातो. अशातच वेळीच हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येवर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे. जर तुमचेही शरिरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असल्यास तुम्ही घरच्याघरी एका ड्रिंकच्या मदतीने नियंत्रणात आणू शकता.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्या हे ड्रिंक
View this post on Instagram
साहित्य
-अर्जुन झाडाच्या सालीचा एक लहान तुकडा
-पाव चमचा दालचिनी पावडर
-एक लहान चमचा जीरे
-एक ग्लास पाणी
कृती
एका पॅनमध्ये पाणी टाकून त्यामध्ये सर्व सामग्री मिक्स करा. पाणी अर्धे होईपर्यंत उकळवून घ्या. ज्यावेळी पाण्याचा रंग बदलला जाईल तेव्हा ग्लामध्ये गाळून घ्या. हे पाणी तुम्ही दररोज सकाळी उपाशी पोटी पिऊ शकता.
फायदा काय?
अर्जुन झाडाची साल आणि दालचिनीपासून तयार करण्यात आलेल्या ड्रिंकमुळे शरिरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. खरंतर, अर्जुन झाडाच्या सालीमध्ये हायपोलिपिडेमिक असते, जे शरिरातील एलडीएल कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रणात करू शकते. यामध्ये अँटी इंफ्लेमेंटरी आणि अँटी ऑक्सिडेंट्स गुणधर्म असतात, जे ट्राय हाइड्रोक्सी, मोनो कार्बोक्सिलिक अॅसिड गुणधर्मांनी संपन्न असतात. यामुळेच वाढलेला कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय ब्लड शुगर ही नियंत्रणात राहू शकतो.
दरम्यान, कोलेस्ट्ऱॉल कमी करण्यासाठी केवळ ड्रिंकवर अवलंबून न राहता हेल्दी लाइफस्टाइल आणि डाएटची मदत घ्यावी लागेल. याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वरील ड्रिंकही पिऊ शकता.