सध्या देशातील काही राज्यात भीषण उन्हाळा सुरु झाला आहे. लोकांचे हिट वेवमुळे फार मोठे नुकसान होत आहे. हिट वेव म्हणजेच उष्माघातामुळे गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. हिट वेवमुळे हिट स्ट्रोकची समस्या वाढते. ही एक अशी स्थिती आहे, ज्यावर लगेच उपचार न केल्यास व्यक्तिचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. अशातच बेस्ट आहे की, घरातून बाहेर पडताना काही गोष्टींची जरुर काळजी घेतली पाहिजे. तर हिट स्ट्रोक पासून बचाव करण्यासाठी पुढील काही टीप्स तुमच्या कामी येतील. (Heat Stroke)
–स्वत:ला हाडट्रेड ठेवा
उन्हाळ्याच्या दिवसात खुप वेळ उन्हात रहात असाल तर स्वत:ला हायट्रेड ठेवणे फार गरजेचे आहे. कारण शरिरातून अत्याधिक घाम निघून जात असतो. अशातच शरिरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास तर हिट स्ट्रोकची समस्या उद्भवू शकतो. त्यामुळे जेवढे होईल तेवढे पाणी प्या अथवा पाणीदार फळांचे सेवन करा.
–उशिरापर्यंत बाहेर राहू नका
काही लोक अशी सुद्धा असतात की, जी कोणत्याही कामाशिवाय बाहेर फिरत राहतात. जर तुमचे अगदीच फार महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा. अन्यथा घरात थांबा. घरातून बाहेर जाताना तुमचे शरिर पूर्णपणे झाका. स्कार्फ, फुल्ल हँन्डचे शर्ट अथवा टीशर्ट घाला. आपल्यासोबत लिक्विड पदार्थ, एलेक्ट्रोलाइट्स, खाण्यापिण्याच्या गोष्टी सुद्धा ठेवा. खाल्ल्याशिवाय घरातून बाहेर पडू नका. यामुळे हिट स्ट्रोकची समस्या उद्भवू शकते.
-सैल कपडे घाला
उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सुती आणि सैल कपडे घाला. अधिक घट्ट कपडे घालणे टाळा. यामुळे अधिक घाम येतो आणि शरिराला हवा सुद्धा लागत नाही. या व्यतिरिक्त अधिक गडद रंगाचे कपडे घालू नका.
-मसालेदार पदार्थ खाऊ नका
उन्हाळ्याच्या दिवसात अधिक तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. स्ट्रिट फूड म्हणून मिळणारे पदार्थ तर अजिबात या काळात खाऊ नका.कारण यामुळे फूड पॉइजनिंगची शक्यता उद्भवते. कारण रात्री उशिरा पर्यंत ठेवलेले पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसात खराब होण्याची दाट शक्यता असते. हिट स्ट्रोकच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी घरीच तयार करण्यात आलेले पदार्थ खा.(Heat Stroke)
हे देखील वाचा- उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवणारा आहार जाणून घ्या..
-सनस्क्रिन लावा
उन्हाळ्याच्या दिवस त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रिन जरुर लावा. अन्यथा सनबर्न किंवा त्वचा टॅन होण्याची अधिक शक्यता असते. अशातच बेस्ट आहे की, घरातून बाहेर निघण्यापूर्वी कमीत कमी १५-२० मिनिटे आधी सनस्क्रिन लावा. यामुळे सुर्याच्या घातक किरणांपासून तुमच्या त्वचेला कोणतेही नुकसान पोहचणार नाही.