Heart Health Care : सध्याच्या डिजिटल आणि बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात नागरिक फिजिकल अॅक्टिव्हिटी फार कमी करतात. लाइफस्टाइल अशी झाली आहे की, बहुतांशजण बसल्याबसल्याच कामे करतात. मोबाइलवरील एका क्लिकवर सर्वकाही दरवाज्यामध्ये गोष्टी येतात. यामुळे फिरण्याचा त्रास वाचत असला तरीही हृदयाच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरत आहे. कारण आपले शरिर सुस्तावले जातेय.
हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे की, दररोज व्यायाम करावा. यावेळी हलक्या स्वरुपाच्या व्यायामानेही संपूर्ण आरोग्य हेल्दी राहण्यास मदत होऊ शकते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
सायकलिंग करा
हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी सायकलिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये स्नायू मजबूत होतात. याशिवाय स्नायूंसाठी सायकलिंग एक उत्तम एक्सरसाइज आहे. सायकलिंगमुळे हृदयाच्या आजूबाजूला असणारे फॅट्स वाढले जात नाहीत. यामुळे हृदयासंबंधित आजारांचा धोकाही कमी होईल.
स्विमिंग
स्विमिंगमुळे कॅलरीज वेगाने बर्न होतात. तुम्हाला हृदयाचे आरोग्य राखायचे असल्यास स्विमिंग बेस्ट पर्याय आहे. यामुळे कार्डियक मसल्स फंक्शन उत्तम राहते.
जॉगिंग
जॉगिंग करणे संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. वजन कमी करणाऱ्या व्यक्ती जॉगिंग नक्कीच करतात. दररोज अर्धातास जॉगिंग केल्याने आरोग्य तंदुरुस्त राहण्यासह हृदयासंबंधित समस्या उद्भवत नाहीत.
डान्स
आनंदाच्या क्षणी अनेकांना डान्स करणे पसंत असते. डान्सशिवाय कोणतीही पार्टीची रंगत नाही. पण डान्स करणे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. (Heart Health Care)
स्किपिंग
स्किपिंग करणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरिरातील ब्लड सर्कुलेशन उत्तम राहते आणि हृदयासंबंधित आजार दूर होतात.
View this post on Instagram