सध्याचे धावपळीचे आयुष्य आणि अयोग्य गोष्टींच्या सवयींमुळे जगभरातील लोकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यापैकी कार्डिएक अरेस्ट आणि हृदयविकाराच्या झटक्यांची प्रकरणे दररोज समोर येत राहतात. बहुतांश लोकांना कार्डिएक अरेस्ट आणि हार्ट अटॅक यांच्यामधील फरक समजत नाही आणि ते गोंधळून जातात. खरंतर हार्ट अटॅक आणि कार्डिएक अरेस्ट येणे या दोन्ही गोष्टी वैद्यकिय आपत्कालीन स्थिती आहे. ज्यामध्ये व्यक्तीच्या हृदयावर अत्यंत वाईट पद्धतीने प्रभाव पडतो. या दोन्ही स्थिती एकच नाहीत. हृदयविकाराचा झटका येण्यामागील कारण असे की, हृदयापर्यंत रक्तपुरवठा होत नाही किंवा त्यामध्ये अडथळा येते. तर हृदय जेव्हा काम करणे बंद करते त्या स्थितीला कार्डिएक अरेस्ट असे म्हटले जाते. अशातच आम्ही तुम्हाला कार्डिएक अरेस्ट आणि हार्ट अटॅक संबंधितची काही महत्वाची माहिती देणार आहोत.(Heart Attack & Cardiac Arrest)
कार्डिएक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमधील फरक
मेडिकलन्यूजटुडे डॉट कॉम यांच्या नुसार, हार्ट अटॅक आणि कार्डिएक अरेस्ट हा हृदयासंबंधित आजार आहे. यामध्ये जेव्हा तुमच्या आर्टिरिजमध्ये रक्ताचा पुरवठा होत नाही किंवा तो थांबतो आणि ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने ते बंद पडते त्या स्थितीत हार्ट अटॅक येतो. दुसऱ्या बाजूला कार्डिएक अरेस्ट मध्ये हृदय अचानक काम करणे बंद करते. अशा स्थितीत व्यक्तीला काहीही होऊ शकते.
कार्डिएक अरेस्ट म्हणजे काय?
कार्डिएक अरेस्ट नेहमीच अचानक येतो. ज्याचे काही खास संकेत मिळत नाहीत. यामध्ये हृदय शरिरातील रक्ताचे पंपिंग करणे बंद करतो आणि व्यक्ती बेशुद्ध पडतो. या स्थितीत व्यक्तीला लगेच उपचार न मिळाल्यास व्यक्ती काही मिनिटांमध्ये सुद्धा मृत पावतो. कार्डिएक अरेस्ट बहुतांश हार्ट अटॅक आणि असमान्य हार्ट बीटच्या कारणास्तव येतो.
कार्डिएक अरेस्टची लक्षण
-कार्डिएक अरेस्टचे सर्वात प्रमुख लक्षण म्हणजे बेशुद्ध पडणे
-काही वेळेस व्यक्तीला कार्डिएक अरेस्टपूर्वी काही संकेत मिळतात जे पुढील प्रमाणे आहेत
-असामान्य हार्ट बीट
-डोके दुखणे किंवा चक्कर येणे
-छातीत दुखणे
-श्वास घेण्यास समस्या
-उलटी होणे किंवा भीती वाटणे
कार्डिएक अरेस्ट नंतर
-व्यक्तीचा श्वास बंद होतो किंवा तो सामान्य प्रमाणे श्वास न घेणे
-दीर्घ श्वास घेणे किंवा श्वास घेताना तोंडातून आवाज काढणे
-पूर्णपणे बेशुद्ध पडणे
हे देखील वाचा- भारतात किडनी ट्रांसप्लांटचे काय आहेत नियम?
हृदयविकाराचा झटक्यात काय होते?
आजकाल प्रत्येक दिवशी हजारो लोकांना हृदयविकाराच्या झटक्याचा सामना करावा लागतो. ब्लड क्लॉटिंग असल्याने किंवा हृदयात रक्ताच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे अशी स्थिती उद्भवते. हार्ट अटॅक बहुतांश करुन कोरोनरी आर्टरिज मध्ये ब्लॉकेजच्या कारणास्तव येतो. जो हार्टला गंभीर नुकसान पोहचवून व्यक्तीसाठी धोकादायक ठरु शकतो. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो.(Heart Attack & Cardiac Arrest)
हार्ट अटॅकची लक्षण
-भीती वाटणे किंवा छातीत दुखणे
-श्वास घेण्यास त्रास
-घाम फुटणे
-हार्ट बीट वेगाने चालणे
-हात, पाठ, मान, जबडा आणि पोटात दुखणे
-चक्कर येणे